आयुष्य जगताना ... Aayushya Jagtana mp3 audiostory in marathi














style="display:block; text-align:center;"

data-ad-layout="in-article"

data-ad-format="fluid"

data-ad-client="ca-pub-7384059194066495"

data-ad-slot="7297264882">



 आयुष्य जगताना बरेचदा किंवा वयाच्या एका विशिष्ट टप्प्यात अचानक एक रितेपण , एक पोकळी निर्माण होते.  


काहीवेळा एखादि घटना,एखादी व्यक्ती, एखादं नातं ह्याला कारण असत किंवा नसतही पण ते साचलेपणं मात्र घट्ट दाटलेलं रहातं. 


बरेचदा आपल्याला स्वतः ला पण समजत असतं चुकतयं काहीतरी सुधारायला हवं पण नेमकं काय ते समजत नाही.


आपल्याला स्वतः ला पण प्रश्न पडतो की " मी आयुष्यात इतकं काही सहन केलय, लढलेय ,झगडलेय मग आता सगळ नीटस चालू असताना का होतय मला अस?"


ह्याच कारण लहानपणा पासून आपलं प्रोग्रामिंग झालयं आयुष्य म्हणजे संघर्ष, आयुष्य म्हणजे लढाई, ते असेल तरच खर जगणं. त्यामुळे आयुष्यातल्या एखाद्या टप्प्यावर जेव्हा मोठा संघर्ष, मोठे प्रश्न संपतात त्यावेळी आपल्याला रिकामं वाटायला लागतं. 


 मग आपल्याला सांगितलं जात की " बघ इतरांच आयुष्य कस संघर्षाने भरलेल आहे, त्यामनाने तू सुखी आहेस." मग आपल्याला अजूनच गिल्ट वाटायला लागतो. अजूनच कोशात जायला लागतो आपण.  


पण आज जे संघर्ष करता आहेत तो तुमचा आधीच करून झालेला आहे भले त्याचा प्रकार वेगळा असेल आत्ता तुम्ही बघत असलेल्या संघर्षानेक्षा.


पण आयुष्य म्हणजे फक्त संघर्ष नव्हे, सतत लढणं, काहीतरी मिळवण्यासाठी पळत राहणं म्हणजेच आयुष्य जगणं नसत. 


तर एका संघर्ष काळानंतर शांतता, समाधान अनुभवणं, केलेल्या संघर्ष बद्दल स्वतः ला धन्यवाद देणं, मिळालेलं समाधान, शांती आत खोलवर झिरपू देणं हे पण आयुष्य असतं ह्याचा स्विकार करायला हवा.  


खूप काम केल्यानंतर व्यवहारीक दृष्ट्या काही न करणं पण तितकच गरजेच असतं हे समजून घ्यायला हवं.


संघर्ष थांबवणं म्हणजे जगणं सोडणं नव्हे तर खर्या अर्थाने जगणं समजून घेणं. माणूस म्हणून व्यक्ती म्हणून स्वतः ला पारखत जोखत, जोपासत जाणं हा पण जगण्याचा एक प्रकार आहे हे झिरपवता यायला हवं स्वतः मध्ये.  


एखादी व्यक्ती किंवा एखादं नातं आयुष्यातून मागे सुटलं तरिही आपला प्रवास सुरूच ठेवायचा असतो. ह्या जगात अगदी दोन जवळच्या व्यक्तींचा प्रवासही माणूस म्हणून स्वतंत्र असतो. आपला प्रवास आपण समजून करायचा असतो. आपले श्वास चालू आहेत म्हणजे आपल्या जगण्याचं उद्दिष्ठ अजून जिवंत आहे फक्त ते आपल्या नजरेला दिसत नाहीये आणि ते शोधण्याचा प्रवास म्हणजे पण जगणं असतं. 


जगणं, जगण्याचे पैलू समजून घेता आलं पाहीजे. बस इतकचं......


Science stories

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या