crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
जीवनाचे कठोर सत्य काय आहे.?
जीवनात मरण आहे,
म्हणून जीवन व जग सुंदर आहे,
जीवनात प्रेम व माणुसकी आहे,
मरण आहे,
म्हणून जीवनसागराचं पाणी,
गढूळ होत नाही.
मरण नसेल,
तर माणुस माणसाला खायला उठेल,
जीवनात दु:ख आहे,
म्हणून माणुसकी आहे,
सुखाला चव आहे.
सहानुभूती व करूणा आहे.
या जगात लोकोपयोगी,
कार्य करणारी माणसं अमर होतात.
या जगात दुनिया त्याच्यावर नेहमीच फिदा होते,
की जो दुनियेचे मनोरंजन करतो,
तो दुनियेतील काही जणाचे दुःख व कष्ट कमी करतो,
दुनियेला हसवतो,
सेवा करतो.
मेल्यावर माणसे व नातेवाईक,
त्याच्यासाठी आतुन खुप रडतात,
व दुःखी होतात,
की ज्याने जीवापाड प्रेम,
व सेवा केलेली असते.
कठीण काळात सोबत केलेली असते.
या जगात चांगल्याला,
व माणुसकीला ही किंमत,
आणि महत्व आहे.
या जगात दु:ख, अडचणी,संकटे आहेत,
म्हणूनच संघर्ष करण्याचीही संधी आहे.
या जगात सकारात्मकतेला खूप महत्त्व आहे.
या जगात मुर्खपणाचे हसे होते.
म्हणून हुशार व्हावे,
व जन्मभर शिकत रहावे.
या जगात जीवन आनंददायी,
व सकारात्मक करणारी माणसे ही खूप आहेत.
या जगात जितकी कठोर सत्ये आहेत,
त्याच्या विरुद्धही काही कठोर सत्ये आहेत,
उदा...
या जीवनात कायमस्वरूपी काही नाही म्हणतात,
पण उर्जा ही कायमस्वरूपी आहे,
ती कधीही नष्ट होत नाही,
उलट परावर्तीत होते.
मग ती कोणतीही उर्जा असो,
मेल्यानंतर शरीर नष्ट होईल,
पण उर्जा नाही.
उर्जेलाच आपण आत्मा म्हणतो,
ती पंचमहाभुतात मिसळुन जाते,
व नवीन भौतिक गोष्टीत इच्छेनुरूप परावर्तीत होते.
या जगात वाईट शक्तीबरोबरच,
चांगली शक्तीही आहे,
या जगात मानवी मुर्खपण,
व अडाणीपण,
व ego, selfishness,
हे दुःखाचे कारण आहे.
वाईटाचे कारण आहे.
निसर्गनियम हे कठोर,
व त्रिकालबांधीत सत्ये आहेत,
पण हे नियम समजून घेवून वागणारे,
व जीवन जगणारे लोक,
आनंदी व समाधानी असतात.
वेळ ही मौल्यवान गोष्ट आहे,
ज्याने वेेळ जिंकली त्याने जग जिंकले...!!
*be positive and very live,
*long by possitivity
🙏🏻🌹🙏🏻
crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
0 टिप्पण्या