थोडं मनातलं : नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story






style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


आपल्या प्रिय बायकोचा हात हातात घेऊन चालता चालता
तो म्हणाला, "मला एकदा तुझे बूट घालून चालायचंय."

ती म्हणाली..
"नको रे, सोपं नाही ते...
तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना,
आपला प्रवास सुखात चालला आहे ना."

त्याचा हट्ट म्हणून तिच्या बुटा मधला त्याचा प्रवास सुरु झाला.
हिरवळीवर चालता चालता
अचानक खडे टोचू लागले.
करियरसाठीचा विरोध,
नोकरीची वणवण,
लग्न ठरल्यावरची द्विधा,
माहेर सुटल्याचं दुःख,
आयुष्याचा संघर्ष, 
पायाला जाणवू लागला..
गरोदरपणातील अस्वस्थता
बाळंतवेणा...
आणि नंतर तो गोंडस स्पर्श..
रात्रीची जागरण,
नोकरीतली ओढाताण...
तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी
सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न
त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड,
कधी टोमणे, कधी कौतुक, 
जबाबदाऱ्यांचे ओझं
जाणवत होतं थोडं, थोडं
केवळ तिचे बूट घालून सुद्धा
काही अव्यक्त सल देखील आता
टोचत होते पायाला,
कधी चटके देखील बसले..
त्याने झटकन बूट काढले
म्हणाला, "कसं चाललीस एवढं?" 

ती हसली, म्हणाली, "तुझ्यासाठी....आपल्या लेकरासाठी....आपल्या संसारासाठी...!"

👨‍👩‍👧👧🏻😘😘😍😍🥰🥰❤️

____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या