माफ करा, पण मी तुमच्याशी लग्न करु शकत नाही!"
तिला आपल्या फेमिली सह पहायला आलेल्या मोहनला एकांतात बोलतांना नेहाने संगितले.....
का? मोहनने काहीश्या नाराजीने विचारले.
"कारण मी दुसऱ्या कोणावर प्रेम करतेय म्हणून. खरतर तु माझ्या टाईपचा नाहीस.त्यामुळे तर शक्यच नाही. आणि तसही माझा अरेंज मेरेजवर अजिबात विश्वास नाही! त्यामुळे नो चान्स समजल?" नेहा काहीश्या आवेशात म्हणाली....
"अग! पण आपण एकमेकांना आधीपासून ओळखतो.आणि आपल्या फेमिलीचे देखिल एकमेकांशी चांगले संबध आहेत!" मोहन विनंती स्वरूपात म्हणाला.....
"हो! पण आपली नुसती ओळख आहे... प्रेम नाही? मी दुसऱ्यावर वर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करेन!"
" मग आता काय सांगु मी घरच्यांना?"
"सांग ना, मला मुलगी पसंत नाही म्हणून!"
"वा! म्हणजे तुला माझ्याशी लग्न करायचे नाही. आणि मीच जाऊन सांगु की, मला मुलगी पसंत नाही म्हणून!
.......
"मुलगी छान आहे! आम्हांला अगदी पसंत आहे. आता नवीन प्रथेप्रमाणे त्यांना एकांतात एकमेकांशी जरा बोलु द्या मग अडचण नको". समीरचे वडील म्हणाले.....
"माफ करा मात्र मी तुमच्याशी लग्न करु शकत नाही! कारण मी आधीच एका मुलीवर प्रेम करतो. आणि मी तीच्याशीच लग्न करेन.आणि तसही मला अरेंज मेरेजवर अजिबात विश्वास नाही!" समीर म्हणाला....
"मग आता?" मीरा नाराजीने म्हणाली.
"काही नाही तुम्ही सांगुन टाका मला मुलगा पसंत नाही म्हणून!. आणि तसही तुम्ही ग्रामीण भागातल्या एकदम संस्कारी टाईपच्या आहात त्यामुळे नो चान्स! तुम्ही मला नकार द्या सिंपल!"' समीर बेफिकीर पणे म्हणाला.
" समीर अरे! बघ काहीतरी कर लवकर... घरचे फार फोर्स करत आहेत लग्नासाठी" नेहा तक्रारींच्या स्वरूपात म्हणाली...
"हो ग! मलाही त्या दिवशी ऐका काकूबाई टाईप मुलीला पाहायला नेल होत मम्मी पप्पांनी. त्यांच्या गावाकडच्या एखाद्या जुन्या मित्रा कडे. मी त्या काकूबाईला मला नकार द्यायला संगितले!"
"खरंच! मी देखिल त्या गावंडळ मोहनला तसंच करायला संगितले. ए!,आपले विचार किती जुळतात ना?" नेहा म्हणाली...
"हो ना! म्हणुन तर आपण एकमेकांवर प्रेम करतोय.अग! विचार जुळले की, आपोआप प्रेम होतेच!"
*आपले आई बाबा अरेंजमेरेज करून कसे एकत्र राहतात कोणास ठाऊक?...लग्न झाल आणि विचार जुळले नाही तर?आता देखिल ही लोक अरेंज मेरेज करायला सांगतात... येडफट!"नेहा शहाणपणा दाखवत म्हणाली*..
"चला,चला! घाई करा. अक्षता वाटा लवकर आणि सगळ्या नातेवाईकाना बोलवा पटकन नाहीतर मुहूर्त टळेल!" पंडित बडबड करत होते.....
"चला,चला! लवकर... आणि ते तुमचे बाकीचे दोन साक्षीदार कुठे आहेत? बोलवा त्यांना लवकर..त्यांच्या सह्या लागतील पेपरवर"....वकील साहेबांची बडबड सुरू होती...
"शुभमंगल सावधान!"
"मुलाने मुलींच्या गळ्यात हार घाला! मुलीने मुलाच्या गळ्यात हार घाला. आता मुलाने मुलीच्या गळ्यात मंगळ सुत्र घाला!"
मंगळ सुत्र घालताना सगळ्या नातेवाईक मंडळीनी टाळ्या वाजवल्या. व मीरा - मोहनला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या......
"चला एकमेकांच्या गळ्यात हार घाला.आता या पेपर वर दोघांनीही सह्या करा.आता साक्षीदारांची सही करा!"
*साक्षीदार दोन मित्रांनी सह्या करून नेहा-समीरला शुभेच्छा दिल्या. कर्तव्य म्हणून वकील साहेबांनी देखील शुभेच्छा दिल्या. आणि एक कार्ड काढुन समीरच्या हातात देत म्हाणाले*...
" हे माझ्या ऐका वकील मित्राचे कार्ड आहे... एड. घरफोडे.... घटस्फोट स्पेशालिस्ट!"
"अरे वा!.... अगदी त्यांच्या प्रोफेशनला शोभेल असच नाव आहे त्यांचे!"विनोद करून समीरने कार्ड त्याच्या पर्स मधे ठेवले.
"त्याची काही गरज पडणार नाही वकील साहेब!" समीर हसत म्हणाला......
पळुन लग्न केल्यामुळं दोघांच्या घरचे कोणी आले नव्हते.कोर्ट मेरेज केल्यावर समीरच्या मित्राने त्याला एका वन रूम किचन फ्लॅट ची चावी दिली.व म्हणाला "जो पर्यंत तुमचा संसार सुरळीत होत नाही तो पर्यंत तुम्ही तेथे रहा! भाड्याचे नंतर बघु!"
नेहा व समीरने त्याचे मनापासून आभार मानले....
लग्नाची पाहिली रात्र...... छान पैकी फुलांनी पलंग सजला होता... सगळ्या खोलीभर अत्तर आणि फुलांचा सुगंध पसरला होता..... त्या पलंगावर दागिन्यांनीं नटलेली नववधू बसली होती..... लग्नाच्या पहिल्या रात्री काय काय आणि कस कस घडते याच वर्णन चित्रपटात पाहुन व आपल्या सखींकडुन ऐकून तीची छाती धडाधडत होती.... लग्नाची पाहिली रात्र म्हणजे नववधू साठी एक अविस्मरणीय अनुभव ...... अस ती आज पर्यत ऐकत आली होती.....आज मात्र या सगळ्याचा अनुभव ती आज प्रतेक्ष घेत होती.... दरवाजा वाजला तीची धडाधड आणखी वाढली...... तो जवळ आला... तीच्या समोर बसला..... त्याचा हात तीच्या घुंगट जवळ आला.... त्याने जेव्हा घुंगट काढले.... तेंव्हा ती लाजुन चूर चूर झाली ....ती एखाद शब्द बोलणार इतक्यात त्याने तिच्या ओठांवर हात ठेवत तो म्हणाला.....
" आज एक शब्द बोलायचा नाही. आज आपल्या लग्नाची पाहिली रात्र.आज फक्त आणि फक्त प्रेम! समजल?"मोहन मीराला लाडीक स्वरात म्हणाला.....
आज लग्नाची पाहिली रात्र.... पाहिली रात्र किती रोमेंटिक असते ना?..... चित्रपटात किती मस्त सीन दाखवलेला असतो..... पलंग फुलांनी सजवलेला असतो... ती दूध घेऊन येते... मग दोघंही एकमेकांचे उष्ट दूध पितात नवरा नववधूचे घुंगट काढतो वैगरे वैगरे....
पण लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही होईल आणि आपल्यावर खोलीची साफसफाई करण्याची वेळ येईल? अस नेहाला स्वप्नात देखिल वाटलं नव्हते. त्या खोलीची रात्री उशिरा पर्यंत साफसफाई करून नेहा वैतागली....
"अग! जाऊ दे ना,माझ्या मित्राने आपल्याला हा छोटा का होईना पण तात्पुरता दिला ना फ्लॅट!" समीर नेहाला समजावत म्हाणाला.....
"हो! पण किती दिवसांपासून हा बंद असेल? किती कचरा आहे सगळीकडे? नशीब निदान जेवण तरी पार्सल आणलय नाहीतर ते देखिल आता बनवायला लागल असते!"
नेहाने सगळ्या फ्लॅटची बऱ्यापैकी साफसफाई केली... तशी समीरने देखिल मदत केली तिला. हे सगळं करतांना ती फार थकली आणि कंटाळली. पार्सल आणलेली तीची आवडती बिर्याणी त्यांनी मनसोक्त खाली.आता तिच्यात भांडी घासण्याची ताकत राहिली नव्हती.तीन ती सगळी भांडी तशीच मोरीत जमा करून ठेवली. व बेडवर जाऊन पाडली.....
काही वेळाने समीर तेथे सिगरेट ओढत आला.... "समीर!....काय हे?... निदान आज तरी नको ना?"......" ठीक आहे सॉरी!".....
आता दोघांनीही एक शब्द न बोलता... लग्नाच्या पहिल्या रात्री तो अविस्मरणीय असा अनुभव घेतला......घट्ट मिठीत ते सगळं जग विसरले... ही रात्र कधी संपूच नये... अस त्यांना वाटत होत....
" तुला किती वेळा संगितलय मला त्या सिगरेटचा त्रास होतोय म्हणून!" नेहा रागात म्हणाली... तिचे रागाचे आणखी एक कारण म्हणजे ती साफसफाई करून वैतागली होती. तोच राग ती समीरवर काढत होती.समीर तिच्या जवळ बसला.... त्याने तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला..... तसं नेहाने त्याचे हात झटकले व म्हणाली... "समीर काय हे? मी किती थकलेय! आणि हा रोमांस आपल्या साठी काही नवीन आहे का? याच्या आधी आपण किती वेळा हा अनुभव घेतलाय!..तु झोप गपचूप! आख्या दिवसाची धावपळ आणि ही साफसफाई करून मी फार थकलीय रे!"अस सांगुन नेहाने चादर तिच्या तोंडावर ओढली......
सकाळी उठल्यावर लग्नाच्या पहिल्या रात्रीचा आनंद मीराच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होता.... ती रात्रीचा मनमुराद घेतलेल्या अविस्मरणीय आनंदाचा विचार करत खुदकन हसली.....
ती बेडवरून खाली उतरली.... कालच्या साफसफाईच्या थकव्याने तिला चांगली झोप लागली होती.मात्र आता उठून ती रात्रीची भांडी घासावी लागणार...म्हणून काहीशी हिरमुसली......
रात्रीच्या आनंदाने तिला कामाचा हुरूप आला होता... ती किचन मध्ये पोहचली..... तिने मोहन व घरच्या घरच्यांसाठी चहा बनवला..... चहा अतिशय अप्रतिम बनला होता.... सगळ्यानी नवीन सूनबाईच कौतुक केले.... याचा तिलाही मनस्वी आनंद झाला...
नेहाने काहीश्या वैतागून भांडी घासली व समीरसाठी चहा केला....
"काय ग! कसला चहा बनवला आहेस तु?"
"का?... काय झाल?"
"तुच पिवून बघ म्हणजे समजेल!"... समीर म्हणाला.....
तिने चहा चाखला... "अरे! बाप रे!!... साखर टाकायला विसरलेच की!...सॉरी ह!.. घरी मम्मीच चहा बनवायची ना!...म्हणून"
"इट्स ओके!... पण या पुढे लक्षात ठेव!"
नवीनच लग्न झाल्यामुळे नातेवाईकांनी घर भरले होते.... त्यांचे एकत्र बसुन... विनोद...कोट्या.. यांच्या मुळे घरात प्रसन्न वातावरण.....त्यांत महिला मंडळाची नावे घेण्यात..
नवीन सूनबाईला सामील करून थट्टा मस्करी. त्यांत जे कोणी लग्नाच्या दिवशी न आलेले नातेवाईक, मोहनचे मित्र...त्यांनी आणलेल्या भेटवस्तू... सगळं चालुच होत.... यामुळे मीरा आनंदी होती.....
तिला मनोमन वाटले."असली मजा तो सब के साथ आता है।".....
नवीन लग्न केले..... तरी समीरच्या त्या दोन मित्रांशिवाय त्यांना कोणी विचारले देखिल नाही...... कारण दोघांनीही घरच्यांच्या इच्छे विरुध्द लग्न केले होते.त्यामुळे... ना आई वडील.... ना नातेवाईक.... कोणी कोणी... आल नाही..... ....
दिवस जात राहिले... लग्नानंतर जस जसा त्यांचा स्वभाव उलगडत गेला तसं त्यांच्यात विश्वास वाढला..... विश्वास वाढला की,प्रेमही आपोआप वाढते....
दिवस जात राहिले....लग्नानंतर जस जसा त्यांचा स्वभाव उलगडत गेला..तसा त्यांच्यातील विश्वासही कमी झाला.. एकदा का विश्वास कमी झाला की, प्रेमही आपोआप कमी होते..
आज मीराने ती गोड बातमी मोहनला सांगीतली..... आपण बाप होणार हे समजताच त्याने मीराला उचलून फिरवले..... पतीच्या आनंदात आनंद मानणारी मीरालाही खूपच बरं
वाटलं.......
*आपण सेटल झाल्या शिवाय बाळाचा विचार करायचा नाही अस दोघांनीही ठरवले होते.... त्यामुळे मुलाचे सुख काय असते या गोष्टी पासुन दोघंही दूर होती...... त्यांचेही कदाचित बरोबर असेल*..... *म्हणतात ना... "जैसी जिसकी सोच*।"....
जेंव्हा पासुन ही बातमी समजली तेंव्हा पासुन घरात आनंदी आनंद.... मग ते डोहाळे जेवण असो किंव्हा... आणखी काही... सगळं सगळं... छान पैकी सुरू होत.....
घरात नवीन पाहुणा आणि तो आपला दोघांचा असणार... या विचाराने त्यांचे प्रेम द्विगुणीत झाले.....
समीरच्या नोकरीने कसंबसं घर चालायचं म्हणून आता नेहाने देखिल जॉब करण्याचा विचार केला.... तसही ती एकटीच घरी बोर होत असे.....
आज अतिशय आनंदाचा दिवस होता.. कारण मोहनच्या घरी गोंडस अशी लक्ष्मी आली होती......
नेहाच्या जॉब करण्याने... त्यांच्या गरजा तर भागू लागल्या मात्र... गैरसमज देखिल वाढत गेले ...नेहाला घरी यायला कधी कधी बराच उशीर होत असे.... समीरने फोन केला की, ती बॉस सोबत कुठेतरी कामा निमित्त असे..... परत घरी स्वयंपाक... यावरून आता रोजची कीटकीट असे..... बॉस प्रकरणा वरून तर गैरसमजाची जागा आता... संशयाने घेतली... आणि घरात एकदा संशयकिडा घुसला.... तर सारे घर पोखरून टाकतो..... सध्या त्यांच्या आयुष्यात तेच चालले होते....
आज लग्नाचा पहिला वाढदिवस त्यांत नवीन पाहुणीच आगमन... घरात अगदी प्रसन्न वातावरण.... मोहनने केक आणला होता.... नवीन पाहुणीच्या साक्षीने केक कापला... मोजकेच पण छान सेलिब्रेशन झाले....
लग्नाचा पहिला वाढदिवस म्हणून समीरने छान केक व नेहाची आवडती बिर्याणी घेतली .... आज नेहाला मस्तपैकी सरप्राईज देऊं असा विचार करत तो घरी आला......नेहा अजुन आली नव्हती..... त्याने फोन केला तर तिचा फोन बंद दाखवत होता.... रात्रीचे नऊ वाजले त्याने पुन्हा फोन लावला... आताही फोन बंदच येत होता..... समीरचा ..आता पुर्ण मुड ऑफ झाला.... काही वेळाने दारावरची बेल वाजली... समीरने दरवाजा उघडला........
"काय ग हे? किती फोन करतो तुला. तर तूझा फोन बंद! एक फोन तर करायचा ना?... उशीर होईल म्हणून!"
"अरे! काहीनाही बॉसची ऐका क्लायंट बरोबर महत्वाची मीटिंग होती... डिस्टर्ब नको म्हणून त्यांनीच फोन बंद करायला सांगितला होता. जेवलास तु? कारण मी त्यांच्या बरोबर जेऊन आले!" नेहाचे वाक्य ऐकून समीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली...... कारण आजची काय काय स्वप्न पाहिली होती त्याने.... नेहाला सरप्राईज देता देता.... त्यालाच सरप्राईज मिळाले होते..... झाल....त्या मुद्यावर त्यांची वादा वादी चालु झाली.......
*काही वेळाने त्याचे स्वरूप जोरदार भांडणात झाले..... नेहाने कपडे बदलले आणि आणि रागा रागाने चादर ओढून झोपली......समीरने इतक्या प्रेमाने आणलेला केक तसाच राहिला*......
*समीरने ....त्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या केक कडे पाहत... आपल्या पाकीटातील ते एड. घरतफोडेचे कार्ड काढले.... आणि त्या कार्ड कडे पाहत.....पाहत तो तसाच उपाशी झोपला*..........
*लेखन : चंद्रकांत घाटाळ*..
*
७३५०१३१४८०
.
0 टिप्पण्या