मला देव शोधायचा होता ... Mla dev shodhay cha hota || marathi audiostory mp3

 











www.FMmarathi.in






style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


मला देव शोधायचा होता

 कसा दिसतो पहायचा होता .


 मी ऐकलं होतं अनेकदा

तो निर्गुण निराकार आहे 

पण इथे प्रत्तेक गल्लोगल्ली* 

त्याचं *एक दुकान* आहे ....


 *मी गेलोय त्या दुकानांमध्ये* अनेकदा

जिथे त्याला *कैद करुन* ठेवले होते

त्याला *भेटण्याचे चार्जेस* म्हणून 

एक *दानपात्र* ही ठेवले होते ....


 *मी* काही रक्कम त्या दानपात्रामध्ये

 *अनेकदा टाकली* पण

त्याला *भेटण्याची संधी* मात्र 

 *प्रत्तेक वेळेस हुकली* .....


 *दर* वेळेस असंच व्हायचं 

त्याला भेटायचं राहुन जायचं 

दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने

 *मी दुसरं दुकान गाठायचं ..* .


 *असाच भटकत* असताना एके दिवशी

रस्त्यात *अपघात* झालेला दिसला

 *मी* *धावलो, त्याला* दवाखान्यात नेले

आणी म्हणून कदचित त्याचा *जीव वाचला* ......


 *शुद्धीवर* आल्यावर तो इसम

माझ्याकडे पाहुन बोलला

 *साहेब माणुसकी हरवलेल्या* या जगात 

मला *तुमच्यात देव* *दिसला* .....




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


 *देव* ........ 

 *माझ्यात ........... !!* 

 *मी भानावर आलो** 


 *नाभीतील कस्तुरीच्या* सुगंधाने 

वेडावलेल्या हरीणा प्रमाणे

मी *ज्याचं अस्तित्व* *चराचरात* 

म्हणजे *माझ्यातही* आहे

त्याला *गल्लोगल्ली* शोधत होतो ...


 *माझा शोध संपला होता* 

 *मला देव समजला* *होता* .......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या