crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
संघर्ष....
संदीप कॉम्प्युटरवर मेल चेक करत होता त्याचं पूर्ण लक्ष कॉम्प्युटर स्क्रीनवर होतं. अचानक त्याला त्याच्या डाव्या हाताला चटका बसलेला जाणवला तत्क्षणी त्याने हात जोरात झटकला त्यामुळे नुकताच शिपायाने टेबलावर आणुन ठेवलेला चहाचा कप समोर ठेवलेल्या फाईलीवर सांडला आणि कप टेबलाखाली पडला, त्याचे दोन तुकडे झाले. संदीप ने शिपायाला जोरात हाक मारली. शिपाई धावत आला. शिपायाला झाला प्रकार लक्षात आला त्याने लगेच स्वीपर ला बोलावले. इतक्यात तेथून नविनच जाॅईन झालेले कुलभूषण सर म्हणजे संदीपच्या डिपार्टमेंटचे प्रोजेक्ट मॅनेजर तिथून मिटिंगला चालले होते. त्यांनी विचारलं संदीप "ईज देअर एनी प्रॉब्लेम?" संदीप म्हणाला "नो सर नथिंग रॉंग." पण सरांनी तो फुटलेला कप पहिला. ते संदीपच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी खिशातून पांढराशुभ्र रुमाल काढला आणि फायली वरचा चहा पुसला आणि खाली वाकून फुटलेल्या कपचे दोन्ही तूकडे उचलले. ते पाहून संदीप खजील झाला. इतक्यात स्वीपर धावत आला त्याने साहेबांच्या हातातून कपाचे तुकडे घेतले व तो फरशी पुसू लागला.
कुलभूषण सरांनी संदीप ला जाताजाता सांगितलं "कॅरी ऑन विथ युवर वर्क, डोन्ट गेट वरीड". संदीप मनातल्या मनात पार चरफडला तो विचार करू लागला सरांना काय गरज होती रुमालाने चहा पुसायची व खाली पडलेला कप उचलायची. ही मोठी माणसं अशीच वागतात, यांना दुसऱ्यांना कमी लेखण्या मध्ये मजा येते, हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले लोक, यांना काय माहित किती मेहनत करून आम्ही शिकलो आमच्या आई-वडिलांनी किती कष्ट घेतले म्हणून आम्ही आज येथे आहोत नाहीतर हे लोक कुठून तरी वशिला लावून किंवा पैशाच्या जोरावर मोठ्या पोस्टवर जॉईन होतात आणि आमच्यावर रुबाब दाखवतात. चारचौघात आमची हेटाळणी करतात. याच विचारात संदीप दिवसभर होता कधी एकदा सुट्टी होते आणि मी घरी जातो असे त्याला होऊन गेले. तसे पण आज शुक्रवार होता म्हणजे पुढील दोन दिवस विकेंड ची सुट्टी होती. त्याने दुसऱ्या दिवशीचा मस्त प्लॅन आखला होता. सकाळी तो मित्रां बरोबर ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जाणार होता, त्यानंतर चिल्ड बिअर चा आस्वाद घेत सर्वजण होटेल मध्ये जेवणार होते.
शनिवारी सकाळी संदीप उशिरा उठला कारण क्रिकेटचा प्लॅन कॅन्सल झाला होता. मग आवरून तो मित्रांकडे गेला. तो आईला सांगून गेला मी दुपारी बाहेरच जेवणार आहे संध्याकाळी येईन त्याने तो दिवस ठरल्याप्रमाणे मित्रां बरोबर घालवला.
संदीप संध्याकाळी घरी आला तो चहाची वेळ झाली होती. बाबांनी मस्त बटाटे वडे आणले होते. त्याच्या आवडीचे, जे बाबा नेहमी एका हातगाडी वाल्याकडुन आणत असत. ते त्याला फार आवडत असत.
crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
चहा प्यायला सगळे एकत्र बसले सोबत खमंग वडे होतेच अचानक बाबा काहीतरी आठवल्या सारखा म्हणाला, अरे आज तर गंमतच झाली मी वडे आणायला गेलो आणि पाहतो तर काय नेहमीच्या वडे वाल्याच्या ठिकाणी एक ब्रेन्डेड वेस्टर्न कपडे घातलेली तरुण मुलगी चक्क वडे तळत होती आणि एक जीन्स घातलेला तरुण बादलीमध्ये पाणी घेऊन रिकाम्या प्लेट विसळत होता. मी त्या मुलीला विचारले अरे माऊली दिसत नाही कुठे बाहेर गेलाय का? ती म्हणाली बाबा येतीलच लवकर, हे पहा आलेच आणि तिने रस्त्याच्या पलीकडे बोट दाखवले. तीने दाखवलेल्या ठिकाणी नजर फिरवली पाहतो तर काय माऊली आणि त्याची बायको एका नव्याकोऱ्या होंडा सिटी गाडी मधून उतरत होते पुढे गाडी चालवायला पांढऱ्या कपड्यातील शोफर होता. मला काहीच कळेना इतक्यात माऊली मला पाहून धावत जवळ आला. मी त्याला विचारले अरे काय बाबा, तू तर मोठा माणूस झालास. होंडा सिटी मधुन फिरतो. तो म्हणाला काय साहेब काय गरीबाची चेष्टा करताय? ही गाडी माझी नव्हे माझ्या जावयाची आहे तो पहा तिकडे प्लेट धुतो आहे त्याची. त्याला नको करू म्हटलं तरी ऐकत नाही.
मी माऊलीला विचारलं हा काय प्रकार आहे ? मला समजेल असं सांग बाबा. माऊली म्हणाला साहेब सांगतो, बसा.
त्याने सांगितलं हा कुलभूषण दहा बारा वर्षाचा असताना माझ्या गाडीवर आला आणि म्हणाला काही काम मिळेल का? मी त्याला विचारले अरे बाबा कुठून आलास? तूझे आई बाप कुठे आहेत तो म्हणाला आई बाबा लहानपणीच वारले. मी इकडे आजी कडे राहतो. ती धुणीभांडी ची कामं करते. पण आता आजीला काम होत नाही. म्हणून तिला मदत करावी, म्हणून मी काम शोधत आहे. मी त्याला म्हटलं, अरे तु लहान आहेस, काय काम करणार? तो म्हटला तुम्ही सांगाल ते काम करीन. मला त्याच्या फाटक्या कपड्या कडे बघून त्याच्या गरिबीची जाणीव आली. मग मी त्याला प्लेट धुवायच्या कामासाठी ठेवून घेतला. तो फारच इमानेइतबारे काम करायचा. टंगळमंगळ मुळीच करायचा नाही. त्याच वेळी माझी मुलगी ही साधारण त्याच्याच वयाची होती. ती गाडीवर संध्याकाळी यायची आणि तिचा अभ्यास करत साईडला बसलेली असायची. ती अभ्यास करताना कुलभूषण तीच्या पुस्तकांकडे सारखा पाहात असायचा. तो तिला नेहमी वेगवेगळे प्रश्न विचारत असायचा. एक दिवशी आमची मुलगी कविता त्याला म्हणाली, अरे तू स्वतः का नाही शिकत? कुलभूषण म्हटला मला कोण शिकवणार ? त्यांने असं म्हटल्यावर कविता मला म्हणाली बाबा याला शाळा शिकायची आहे आणि आपण गाडी संध्याकाळी लावतो तर हा सकाळच्या शाळेत जाऊ शकतो तुम्ही याला शाळेत घाला ना.
मग मी विचार केला हा मुलगा हुशार आहे. अशी छोटी मोठी कामे करून त्याच आयुष्य वाया जाईल. त्यापेक्षा चार बुकं शिकला तर काहीतरी आयुष्यात पुढे त्याला करता येईल. म्हणून मी त्याला सरकारी शाळेत घातला. तो जोमाने अभ्यासाला लागला. हळूहळू त्याची प्रगती दिसू लागली. तो तिच्यापेक्षा दोन इयत्ता पुढे असलेल्या कविता ची पुस्तके पण वाचू लागला. आणि असं करता करता ही दोन्ही मुलं मोठी झाली आणि आम्हाला गाडीवर सुद्धा मदत करू लागली. मधल्या वेळेत कुलभूषण ची आजी पण वारली. त्याला काहीच ठावठिकाणा नसल्यामुळे तो आमच्याकडेच राहू लागला. मग त्याने ग्रॅज्युएशन केलं.
काॅलेज च्या फी करता जोड काम म्हणून तो सकाळी पेपर टाकायचा रात्री उशिरा एका ठिकाणी मुलांचे क्लासेस घ्यायचा. अशा पद्धतीने त्याने स्वतःच्या कॉलेजची फी ची सोय केली आणि त्याला काॅलेज कॅम्पस मधुनच एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. हळूहळू त्याने प्रगती केली, परदेशी गेला आणि आता तो एका कंपनीत मोठा मॅनेजर आहे. त्याचबरोबर माझी मुलगी ती पण त्याच कंपनीत कसली तरी हेड आहे.
मी माझ्या मुलीकरता मुलगा शोधत होतो. अचानक माझ्या लक्षात आलं कि अरे याच्यापेक्षा चांगला जावई आपल्याला कुठून मिळणार? म्हणून मी या दोघांचं लग्न लावून दिलं. ही दोघं छान संसार करीत आहेत आणि गंमत म्हणजे दर शनिवार रविवारी मला मदत करायला हे दोघे येतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल साहेब हि वडे तळते आणि हा प्लेट धुतो. मागच्याच आठवड्यात त्यांनी ही नवीन गाडी घेतली आणि आज मला दाखवायला आले आणि म्हणाले "आई बाबा तुम्ही जाऊन मस्त चक्कर मारून या तोपर्यंत आम्ही गाडी सांभाळतो." म्हणून गेलो होतो साहेब. माऊलीचे हे सगळं बोलणं ऐकून मी तर चाटच पडलो म्हटलं हा वडे तळणारा माणूस किती भाग्यवान आहे आणि त्याचा जावई आणि मुलगी किती मोठ्या मनाचे आहेत.
मग मी माऊलीला विचारलं अरे मग मला हे मागे कधी दिसले नाहीत? त्यावर तो म्हणाला हे दोघेही पाच वर्षे अमेरिकेत होते. पण आता आम्ही म्हातारे झालो व आमच्याकडे कोण लक्ष देणार म्हणून अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतात परतले . मागच्या महिन्यातच आले आहेत म्हणून तुम्हाला कधी दिसले नाही.
मी त्याला म्हणालो अरे मग आता तु ही गाडी बंद का करत नाही? ही दोघे एवढे कमवतात मग तुला काम करायची गरज काय?
यावर तो म्हणाला नाही साहेब, जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत आपल्याला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. तो असे म्हटल्यावर मी निरुत्तर झालो.
हे सांगत असतानाच बाबांनी वडे प्लेट मध्ये काढून प्लेट संदीप च्या पुढे सरकवली आणि बायकोला चहासाठी हाक मारली. बाबा संदीप कडे बघून म्हणाले, मला त्या गोष्टीचं एवढं आश्चर्य वाटले की मी त्या दोघांचा वडे तळताना आणि भांडी धुत असतानाचा फोटो घेतला. हा पहा तो फोटो असं म्हणून बाबांनी मोबाईल संदीप कडे वळवला. संदीपने मोबाईल वर नजर टाकली आणि त्याचं डोकं गरगरायला लागलं कारण प्लेट विसळणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा प्रोजेक्ट मॅनेजर कुलभूषण मोरे होता व बडे तळणाऱ्या त्यांच्या डिपार्टमेंट ऑफ हेड कविता मॅडम होत्या. c.p.
crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
0 टिप्पण्या