थोडं मनातले : मन प्रसन्न असले की ... Man prasann asle ki | Marathi audiostory in mp3


मन प्रसन्न असले की, मनुष्याच्या अंगी बारा हत्तीचे बळ येते,

पण बारा हत्तीचे बळ साठवून,

मन प्रसन्न करणे अवघड आहे,

नव्हे अशक्य आहे.

आपण माझ्या विधानाशी,

सहमत असाल, हो ना.?

*मानवी मन म्हणजे शक्तीचा एक स्रोत आहे. फक्त त्याला उत्प्रेरीत करता आले पाहिजे. एक प्रकार आहे बाह्यप्रेरणेचा.* 

*आणि एक आहे अंत:प्रेरणेचा.* 

*आपणा सर्वांना एक अनुभव नक्कीच आहे की, बाह्यप्रेरणा नेहमीच तात्कालिक असते, स्मशान वैराग्यासारखी.* 

*पण अंत:प्रेरणा प्राप्त झाली, तर मात्र कल्पनातीत चमत्कार घडू शकतात.* 

*अंत:प्रेरणा होण्यासाठी, मनाला त्याचा ध्यास लागणे अत्यावश्यक.!!* 

*कोणतीही गोष्ट किमान दोनदा घडते,* 

*एकदा मनात आणि एकदा प्रत्यक्षात.*

*प्रत्येक मनुष्य वेगळा आहे, त्यामुळे त्याच्या मनाची स्थिती, क्षमता,* 

*विचार करण्याची पद्धत, स्वभाव, वेगवेगळा आहे. मनाला प्रसन्न करण्याचे,* 

*प्रसन्न राखण्याचे मार्गही,* 

*भिन्न भिन्न आहेत. आपापल्या मतीगतीनुसार, प्रत्येकाने ते शोधावेत असे सुचवावेसे वाटते.* 

*आपले विचार सर्वस्वी हवामानावर अवलंबून नसतात.* 

*तसं असतं तर कडाक्याच्या थंडीत सर्वजण कामधंदा न करता,* 

*घरात बसून राहिले असते.* 

*पण तसे तर होत नाही.* 

*याचाच अर्थ आपले विचार,* 

*हे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतात. ते बहुतांशी स्वतंत्र असतात. खरंतर ते आपल्याच हातात असतात.* 

*बाहेरच्या वातावरणाचा किती परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा,* 

*हे सुद्धा आपल्याच हातात असते.* 

*आपण ठरवलं तर आपले विचार आपण खात्रीपूर्वक बदलू शकतो.* 

*तसेच मोकाट विचारांना काबूत आणणे, हे सुद्धा आपल्याला प्रयत्नांती नक्कीच शक्य आहे. भरकटणाऱ्या विचारांना थांबविणे, म्हणजेच स्वतःला सावरणे होय.* 

*मनुष्य अस्वस्थ होतो,* 

*तो त्याच्या विचारांमुळेच,* 

*आणि शांत होतो, तो सुद्धा त्याच्या विचारांमुळेच,* 

*कोणते विचार निवडायचे, याचे स्वातंत्र्य मनुष्याला असते.* 

*प्रत्येक वस्तूची निर्मिती, प्रथम विचारात होते, आणि मग भौतिक रुपात.* 

*आजवर आपण जे पाहिले, त्याची निर्मिती प्रथम विचारात झाली आहे,* 

*नि मग प्रत्यक्षात झाली आहे. आपले अंतर्मन बघू शकत नाही, पण आपण जी दृश्ये त्यास दाखवितो,* 

*ती ते खरी मानते, आणि तशी स्थिती ते आपल्या मनात निर्माण करीत असते.* 

*आपण जे विचार पेरीत असतो,* 

*तेच अनंत पटीने वाढून, परत येत असतात. एक फळात किती बिया आहेत,* 

*हे आपण सांगू शकतो, पण एका बीमध्ये किती फळ आहेत,* 

*हे सांगणे कठीण असते.* 

*फक्त योग्य विचार निवडणे,* 

*ते प्रसारित करणे, आणि त्यानुसार आचरण करणे, जर मनुष्याला जमले, तर आपण सर्व समस्यांवर मात करु शकतो.* 

*हे जग जसे आहे, तसे आपल्याला दिसत नाही, तर जसे आपले विचार असतात, तसे ते आपल्या नजरेस दिसत असते.*

*एखाद्या फळ्यावर आधीच बरेच काही लिहिले गेले असेल,* 

*तर त्यावर पुन्हा लिहिणे,* 

*हे काही शहाणपणाचे लक्षण नव्हे!* 

*त्यासाठी तो फळा कोरा करणे गरजेचे.* 

*मनाचेही तसेच आहे.* 

*मनाचा फळा कोरा करण्यासाठी,* 

*रामबाण उपाय सर्व संतांनी सांगितलेला आहे.* 

*अखंड नामस्मरण...!!*


               🙏🏻🌹🙏🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या