जेथे नाम , तेथे मी आहेच ...





।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।

🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩

🌸  प्रवचने  ::  १५ फेब्रुवारी  🌸

जेथे  नाम ,  तेथे  मी  आहेच .

मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ, मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते; 

कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो.

 

समजा तुम्ही यात्रेला गेला आहात; पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत ? 


त्याप्रमाणे, तुम्हांला जर कुणी विचारले की, 'तुम्ही नेहमी कुठे असता', तर आम्ही नेहमी विषयातच असतो, असेच सांगावे लागेल. 

ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना ? 

मग तुमचा गुरू कुठे आहे असे जर कुणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना ? म्हणून, जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच; जो नामस्मरण करतो त्याच्या मागेपुढे मी उभा आहे.


शास्त्री-पंडित म्हणतात की, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. 'ब्रहम सत्यं जगत्‌ मिथ्या' हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते. पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. 

जग मिथ्या आहे असे ते म्हणतात. पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. 

कर्मठ लोक म्हणतात की, 'आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार'; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. 

फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे. पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खतपाणी घालून वाढवितात; आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. 


वैदिक कर्माने चित्तशुध्दी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुध्दी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते. 

नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिककर्माच्या सुरूवातीला "ॐ केशवाय नम:" असे म्हणतात, ते नाम नव्हे काय ? 

वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे; अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे.


४६.   रामनाम  हे  ॐकाराचेच  स्वरूप  आहे .  ते  सर्व  कर्मांचा  आणि  साधनांचा  प्राण  आहे .


।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।

‼️श्रीराम समर्थ‼️🙏🙏

🌸श्री सद्गुरु  ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जन्मोस्तवा प्रित्यर्थ सर्व साधक परिवारास हार्दिक शुभेच्छा🌸💐💐

_____________________________________

              🌺प्रवचनाचा विषय🌺

🔴🔴नामाचे त्रिकालबाधित श्रेष्ठत्व❗🔴🔴

_______________________________________


*🔘नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय.🔘*


 *💢नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते.💢*


*☀️अनेक रूपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे, ही केवढी विलक्षण लीला आहे❗खरोखर, तुम्हाला मी काय सांगू ! बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे, अजून नामाचे माहात्म्य संपत नाही. नामाचे माहात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे.☀️*


*✳जो नामात 'मी' पणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या माहात्म्याची कल्पना आली. असा पुरूष नामाविषयीं मौन तरी धरील, कारण त्याचे माहात्म्य कोणालाच सांगता येणार नाही; किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे माहात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही, आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही.✳*


*❄नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते.❄*


*💮नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे, कसे ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ॐकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे.💮*


*🏵नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते; पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती, वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते.🏵*


*♦️पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे.नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे.♦️*


*💠नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत्‌ म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, नाम हे साक्षात्‌ भगवंताकडे पोहोचवते.💠*


 *🔸️नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे.🔸️*


 *🔹️नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते.🔹️*


*⭕नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात, कारण या दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे, आणि नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय, भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल❓⭕*


*¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*

*🌲आजचे बोधवचन: प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे,त्याच्या स्मरणात राहावे, आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे.🌲*

*¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤*

*🩸प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🩸*


*♻श्री राम जय राम जय जय राम♻🙏🙏*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या