तुम्ही संत माय बाप
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥अवतार तुम्हां धराया कारणें ।उद्धराया जन जड जीव ॥२॥वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥
0 टिप्पण्या