निराशा.. आत्महत्या करू नको | Audio Poem | Dr.Madhav kurde

 “निराशा..!

 जीवन हे अनमोल आहे महत्व तयाचे जाणून घे 

मानव जन्म पुन्हा नाही वहीत मनाच्या लिहून घे !


 अपयश हीच आपल्या यशाची पायरी असे 

अशा अपयशातूनच उज्वल यशाचा मार्ग दिसे ! 


काट्यातही त्या गुलाबाचे लावण्य तू पाहून घे 

जीवनातील चढ-उताराचा सामना तू करुन घे !


  जीवन तुझे जगला आजवर स्वत:कडे निरखून बघ 

राहिलेले जीवन तुझे कुटुंबासोबत जगून बघ ! 


जीवन हे सुंदर आहे निराश तू होऊ नको 

'तू सुंदर जीवनाचा आस्वाद घे आत्महत्या तू करु नको...

 

 डॉ. माधव कुद्रे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या