देव पाहला पाहला
देव पावला पावला ।
माझ्या हाकेला सतत
देव धावला धावला ।।
दुःख खुरपत नेतो
विळा घेऊनिया हाती ।
नष्ट दारिद्र्य करण्या
नित्य उठतो प्रभाती ।।
केले लहानाचे मोठे
माझ्या जागत्या देवाने ।
जन्मां आलो म्हणूनिया
जग पाहतो सुखाने ।।
तीर्थ अन्य नाही कुठे
घरामध्ये साक्षात्कार ।
माझ्या देवाच्या हाताने
घडतात चमत्कार ।।
झोपडीत सुख आहे
खरे देव असताना ।
काय मिळणार देव
दगडात पाहताना? ।।
बाप विठ्ठल माणतो
आई खरी रखुमाई ।
देव घरी असताना
कुठे शोधणे विठाई? ।।
©️®️शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळीता.दारव्हा, जि.यवतमाळमो.८८०५८३६२०७
1 टिप्पण्या
🧡🧡🧡🧡
उत्तर द्याहटवा