हनुमान जन्म या निमित्ताने..
एक अंजना नावाची अप्सरा होती. ती स्वर्गात इंद्र दरबारात काम करायची. तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होऊन आणि तिला बोलावून हव ते मागायला सांगतात. तेव्हा अंजना सांगते कि, 'हे देवा तुम्ही मला मिळालेल्या शापापासून माझी मुक्ती करून द्या.' तेव्हा ब्रम्हाजीने विचारल्यावर अंजनाने सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालक रुपामध्ये खेळत असतांना तिने एक वानराला तपस्या करताना बघितले. तीला ते फार मजेशीर वाटले म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले. त्यामुळे त्याची तपस्या भंग झाली. त्या ऋषिनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला शाप दिला कि ती कोणाच्या प्रेमात पडली तर त्याच क्षणी ती वानर बनेल.'
तेव्हा तीने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली कि त्यांनी त्याचं शापापासून मुक्ती करावी. तेव्हा त्या ऋषीनी तिला सांगितल कि, 'मी हे शाप मागे घेऊ शकत नाही.तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानर मुखी माणूस असेल.'
हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात कि, 'हे अंजना मी तुला या शापापासून मुक्त करू शकत नाही. पण तुला एक सांगतो कि तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा. तेथे तुला तुझे पती भेटतील. तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्ती साठी भगवान शिवाची उपासना कर पुत्र जन्म झाल्यावर तुला या शापापासून मुक्तता भेटेल.'
अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते. एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो. ती त्याच्या प्रेमामध्ये पडते. त्या माणसाने तिच्याकडे पाहताच क्षणी अंजनाचे वानरमध्ये रुपांतर होते. हे बघून अंजना रडू लागते. तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपुस करू लागतो. तेव्हा अंजना तिच्या शाप बद्दल सांगते आणि त्याच्या कडे बघते तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो. तेव्हा तो मनुष्य सांगतो कि तो माणूस नाही आहे. तो वानरांचा राजा केसरी आहे. त्याला भगवान शिव कडून वरदान भेटलं आहे.त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले.
अंजना आणि केसरीने जंगलात लग्न करतात. आणि ते तेथे एकत्र राहू लागतात. भगवान ब्रम्हा ने सांगितल्या सारख अंजनाने पुत्र प्राप्ती साठी भगवान शंकराची पूजा करते. तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात कि ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळे ऋषीने दिलेल्या शापापासून तीची मुक्तता होईल.
एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडेअयोध्येचा राजा दशरथ पृत्रप्राप्ती साठी यज्ञ करत असतो. तेव्हा अग्नीदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रुपात राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नींना द्यायला सांगतो. राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौसल्याला पायस देत असतांना एक घार थोड पायस घेऊन उडते . ती उडत वनातून जात असतांना अचानक वादळ सुटते. हे वादळ वायुदेव घडवून आणतात. वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिव मंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातात पडते. भगवान शिवाचे प्रसाद समजून अंजना ते पायस प्राशन करते..
काही दिवसानंतर अंजनाने एक वानर मुखी पुत्राचा जन्म होतो. हे बघून राजा केसरी खूप आनंदित होतो. पुत्रजन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते.
*हनुमन्त जन्माची घटना*
सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे. म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. .
*मारुतीला हनुमान का म्हंटले जाते ?*
एके दिवशा मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो. त्याला तो एका फळासारखा वाटतो. म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो. सूर्यदेव मारुतीला येतांना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो. पण बालक मारोती सूर्याकडे उडत जातो .हे बघून घाबरून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो. तेव्हा इंद्रदेव मारुती जवळ जाऊन त्याला समजावयाचा प्रयत्न करतो कि, ' हे फळ नाही. ते सूर्य प्रकाश देणारा सूर्य आहे. तू जेथून आला आहे तेथे परत जा.' पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो.
हे बघून इंद्र क्रोधीत होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो. त्यामुळे हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वी वर पडतो. पृथ्वीवर भ्रमण करत असतांना वायूदेवला मारुती बेशुद्ध पडलेला दिसतो. हे बघून तो क्रोधीत होतो आणि विचारतो हे कोणी केला पण कोणाकडून उत्तर भेटत नाही म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो. त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहणे थांबते. त्यामुळे पृथ्वीवर पशु प्राणी मानव मरू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रम्हा कडे जातात आणि त्यांना सगळी हकीगत कथन करतात. तेव्हा ब्रम्हदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा ब्रम्हदेव मारुतीलाआरोग्यसंपन्न करतात आणि मारुतीला वरदान देतात कि कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव वर देतात कि आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्याच्या हनु ला वज्र ने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हंटले जाईल.
*हनुमंताचा रंग शेंदरी का आहे ?*
एकदा सीता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते. तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. सीता सांगते कि रामाचे आयुष्य वाढण्यासाठी त्या शेंदूर लावतात. हनुमान रामाचा परम भक्त. म्हणून हनुमान सर्व अंगालाच शेंदूर लावतात. म्हणून हनुमंताचा रंग शेंदरी आहे.
*हनुमंताला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात?*
हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरत त्यांना बाण मारतो तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते .तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात.
0 टिप्पण्या