(संजय धनगव्हाळ)
*******************
जून महिना सुरू झाला म्हणजे प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट बघतं असतो आणि आषाढसरी सुरू झाली म्हणजे सणावाराला सुरूवात होते. पुजापाठ,पारायणे हरिपाठ,भागवतकथा, उपास,व्रतवैकल्ये सुरू होतात मंदिरात गर्दी होते भावभक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळायला लागतो.घराघरात प्रसन्नता वाटते.देवपूजा, भजन,कीर्तन,अभंग,
आरती भावगीतांनी मन प्रसन्न होवून मणसा माणसात नवचैतन्य संचारते प्रार्थनेमुळे एक नवि उर्जा,नवे बळ मिळते.चेहऱ्यावरच्या भावमुद्रा आनंदाने फुललेल्या दिसतात. देवपूजा किंवा देवाची प्रार्थना करणे ही आपली वडिलोपार्जित परंपरा आहे.अर्थात भारतीय संस्कृतीत हिंदु धर्मात पुजापाठला खूप महत्त्व आहे.आणि ही परंपरा आपल्या देवदेवता, ऋषीमुनीपासून तर आजतागायत ती अखंडपणे सुरून आहे.खरे पाहता माणसाची दिनचर्या ही देवपूजा केल्याशिवाय होत नाही.दिवस उगवताच स्नानापर्ण करून देवापुढे नतमस्तक होतो मग आपल्या रोजनिशी कार्याला किंवा कामाला सुरूवात करतो.व्यापार व्यवसाय करणारेही मंदिरात जावून देवाच दर्शन घेतात तसेच कामाच्या ठिकाणी पुजा करण्याची औपचारिकता पाळतात.खर पाहता देवाचे नामस्मरण केल्याशिवाय कोणीच बाहेर पडत नाही हीच श्रद्धा,मनातील अंतर्भाव आहे.अंतरिक प्रार्थना आहे.प्रार्थनेशिवाय कोणीही पुढे जात नाही.म्हणजे मोटरसायकल,कार,
हातगाडी, चालवणारे,आधी त्या वाहनाला नमस्कार करतील मगच गाडी पुढे नेतील,दुकानात शिरताना आधी दुकानाच्या उंबरठ्यावर डोकं डेकवून मग दुकानात प्रवेश करतील.म्हणजे घरून निघताना माणूस श्रद्धा घेवूनच बाहेर पडतो त्याच्यासोबत ईतर कोणी नसले तरी देवावरचा विश्वास आणि त्यावरची श्रद्धा त्याच्या सोबत असते म्हणून प्रत्येकजण आत्मविश्वासाने आपल्या दैनंदिन कार्याला सुरूवात करतो.
खरचं देवळात जावून देवाच दर्शन घेणे, देवपूजा करणे किंवा देवाला नमस्कार करणे यात काहींना कमीपणा वाटतो.या विज्ञानाच्या युगात कुठून आला देव आशी पुष्टी जोडतात.पण जेथे विज्ञान आहे तेथे देव असतो हे विसरून चालणार नाही,कारण या श्रुष्टीचा निर्माताच परमेश्वर आहे.विज्ञान निर्माण करणाराचं परमेश्वर आहे तेव्हा तिथे माणसाच अहंकार चालतं नाही.माणूस कितीही हुशार असला तरी त्याच्या मेंदूवर देवाचेच नियंत्रण असते.जर का त्या देवाचे नियंत्रण सुटले तर मग कायं माणूस नियंत्रणात राहत नाही तो वेडा होतो.तेव्हा या पृथ्वीवर ज्या काही घडामोडी होतात त्यावर त्या देवाचे नियंत्रण असते म्हणून कर्ताकर्विता तो ची एक परमेश्वर आहे.. त्याच्यामुळेच माणूस सुखसुविधांचा उपभोग घेतो,सुखात राहतो मजेत जगतो.कारण त्याच्या मर्जीशिवाय झाडाचं पाणही हालतं नाही.तेव्हा देवाला पुजणारे कमी असले तरी देव भजणारे खूप आहेत. मग ती कोणत्याही जातीधर्माची आसुदे प्रत्येकजण आपलआपल्या धर्मानुसार प्रार्थना करत असतात आपआपल्या धर्मातील देवांचे नामस्मरण करून पुजापाठ विधी करत असतात थोडक्यात प्रत्येक माणूस हा धार्मिक आहे अध्यात्मिक आहे.म्हणून धार्मिक भावनेतून आपण प्रार्थना करत असतो कारण
प्रार्थनेत अदभूत शक्ती असते.हिच शकती माणसाला जगवत असते प्रार्थना माणसाला यशाचा मार्ग दाखवून विजय मिळवून देत असते.प्रार्थना जगायला आणि लढायला शिकवते.आपल्या श्रेयाच यशाचं,विजयाच महत्त्व आपण प्रार्थनेला देतो आपल्या जिवनात ज्याकाही घडामोडी होतात जो काही बदल होतो तो फक्त प्रार्थनेमुळेच.उदाहरण द्याच झाल तरं पंतप्रधान पदाची शपथ घेतल्या नंतर संसदेत प्रवेश करण्याधी संसदेच्या पायरीवर नतमस्तक होवून प्रार्थना केली आणि आपल्या विजयाच सार श्रेय प्रार्थनेला देवून मगचं नरेंद्र मोदी दालनात दाखल झाले.तसेच कुठलिही शस्त्रक्रिया करण्याधी डॉक्टर देवाला प्रार्थना करतात किंवा मनोमनी देवाच नामस्मरण करतात मगचं आपल्या कामाला सुरुवात करतात. या जगात असा एकहीनाही की जो कोणतही काम करण्याधी प्रार्थना,किंवा देवाला नमस्कार करतं नसेल. प्रत्येकजण प्रार्थना करत असतो. याचा अर्थ प्रार्थनेत किती ताकद असते.माणूस कसाही असला तरी माणसात बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य प्रार्थनेत असते. प्रार्थनेशिवाय माणसाचा दिवस सुरू होत नाही.हात जोडून देवा समोर उभे राहून प्रार्थना केल्याशिवाय कोणाचेही पाय घराबाहेर पडत नाही.अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झेपे पर्यंत प्रार्थना करून आपले जगणे कसे असावे याची रूपरेषा स्वतःला सागंत असतो.म्हणजे आपल्या मनातील भावभक्ती,श्रद्धा,व्यथा,
वेदना,धार्मिकता जेकाही असेल ते विनंतीपुर्वक देवासमोर प्रार्थना करून स्वतःशीच संवाद साधताना आपल्या भावना मनापर्यंत पोहचतात त्यातून निर्माण होणाऱ्या लहरींच प्रार्थनेत रूपांतर होते आणि त्यातून मनाला शांती मिळते.
प्रार्थनेतून काय नाही होवू शकतं.आहे त्या परिस्थितीत कसे जगायचे हे जाणून घेण्यासाठी देवाचीच कृपा असते,समस्यांचा सामना करण्यासाठी प्रार्थनेतूनच माणसाला बळ मिळत असते. अपला अहंकार,आपला स्वभाव,आपले वागणे,बोलणे आपली श्रीमंती,गरीबी सारकाही बाजुला ठेवून प्रार्थनेतून आपण देवाला उच्च स्थान देत असतो. प्रार्थनेमुळे मनातील भिती नाहीशी होते.प्रार्थनेतूनच आपण देवाजवळ सुख समाधानची मनोकामना करत असतो.प्रार्थनेतून माणसाचं मनोबल वाढते,आत्मविश्वास वाढवतो.न होणार कामही प्रार्थनेमुळे होत असते.एक सकारात्मक ऊर्जा प्रार्थनेतून मिळत असते.बाहेरकुठे जाताना मंदिर दिसले की क्षणभर थांबून आपसूकच आपले हात जोडले जातात कारण आपल्या स्वभावात आणि संस्कारात प्रार्थनेचा भाव असतो म्हणून आपण प्रार्थना करतो.
भारतीय संस्कृतीत मनुष्य हा प्राचीन काळापासून प्रार्थना करत आला आहे. अडीअडचणी मधून वाचण्यासाठी,भीतीपासू न सुटका होण्यासाठी
प्रार्थनेला महत्त्व देतो.
माणूस हा देवभक्त असतो.म्हणून प्रार्थनेतून परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच प्रार्थना.आपल्या आयुष्याच्या मार्गात कुठल्याही अडचणी येवू नये,सर्वकाही सुखासीन रहावे अशी भावना या प्रार्थनेत असते.उदात्त भावनेतून केलीजाणारी प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ मानलीजाते.भगवंताने आपल्या सर्व ईच्छा पुर्ण कराव्यात यासाठीच प्रार्थना करण्यामागचा उद्देश आहे. एकूणच काय तर आपले जीवन आनंदी आणि प्रसन्न रहावे म्हणूननच प्रार्थना करायची असते.एकाग्रतेने केलेली प्रार्थना निश्चितच पुर्ण होते.श्रद्धेने जिवनाला आधार मिळतो संकटांशी सामाना करण्याच बळ प्रार्थना देते म्हणून आपल्या जीवनात प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद,प्रार्थना हा मनाचा आधार आहे. एखाद्यादिवशी प्रार्थना नाही केली तर आपल्याला काहीतरी हरवल्यासारखे वाटते.मन दुर्बल होते.म्हणून माणूसं प्रर्थनेशिवाय एकदिवसही राहूशकतं नाही कारण प्रार्थना केल्यावर कोणत्याही परिस्थितीत, घटनेत,प्रसंगात सामोरे जाण्यासाठी अंतरिक शक्ती प्राप्त होते.
प्रार्थना ही समस्त मानवजातीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे.'तोषोनी मज द्यावे पसायदान हे.....' संत ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना आजदेखील मनाला उर्जा देते.म्हणून प्रार्थनेत एक अदभूत शक्ती आहे.
९४२२८९२६१८
0 टिप्पण्या