autoplay="autoplay"
src="https://drive.google.com/uc?export=download&id=1WpZQ3z6O-VjPNmFkjiA4BazNX35WqC5I">Your browser does not support the
audio
element.crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
'सफर खूबसुरत है, मंजिल से भी'
- अक्षयकुमार शिंदे
लोकसत्ता.
किती सुंदर शब्दांत त्या गीतकारानं आणि ते गाणाऱ्या गायकानं त्याच्या प्रिय व्यक्तीसोबतच्या प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो सांगतोय, की आपला हा प्रेमाचा प्रवास खूप सुंदर आहे. मुक्कामाला पोहोचण्यापेक्षा..... ते ठिकाण कधी येईल याची वाट पाहू नका, तर त्या प्रवासातल्या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या.. वाह! क्या बात है। या एका ओळीत मला माझ्या जगण्याचं तत्त्वज्ञान मिळालं, असे म्हणायला हरकत नाही.
ते गाणं ऐकत असताना सहज विचार आला, की आपल्या आयुष्याचा प्रवास कसा चालू आहे? इथून पुढचा प्रवास कसा असेल? खडतर की सुखदायक ? सोबत कोणी असेल की आपणच आपले सारथी ? आपण जर अटीतटीच्या, सुख, दुःखाच्या क्षणी खचलो तर सावरायला कोणी येईल की येणारच नाही? अशा वेळी आपण मागील अनुभवांवरून स्वतःची जी काही तत्वे तयार केली ती उपयोगी पडतील, की नवीन काही निर्माण होतील वर्तमानकाळातील अनुभवावरून?
माझं स्वतःचं आयुष्यांविषयी साधं सरळ व सोपं तत्वज्ञान म्हणा किंवा विचार आहेत. मी जीवन हळूहळू शिकतोय. लोकांना काही देणं-घेणं नसतं तुम्ही कुठपासून ईथपर्यंत आलात.
आयुष्य ते नाही, जिथे आपल्याला जगाचा विचार करून जगावं लागतं. आयुष्य ते आहे, जिथे तुमचं मन काय म्हणतंय ते जगायला मिळणं, त्यासाठी स्वतःवर काम करा आणि मनः शांती अनुभवा, हे अर्थात आलं ते आयुष्य अनुभवत असताना.
थोडा वेळ दिला, की गोष्टी नीट होतात. आपल्याकडे तेवढा संयम हवा हे लक्षात ठेवा. माझा एक मित्र आहे- प्रशांत तिवारी, त्यानं एकदा असंच बोलता बोलता खूप छान तत्त्व सांगितलं, *'स्वतः मध्ये हवा तेवढा छान बदल करावा. आलेला प्रत्येक दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस असल्यासारखं जगावं.* खरंच होतं त्याचं, 'सफर खूबसुरत है, मंजिल से भी' याची प्रचीतीही त्यामुळे मिळत गेली कायम..
- अक्षयकुमार शिंदे
• akshayradha555@gmail.com.
लोकसत्ता.
0 टिप्पण्या