सावली माणसाची ... Savli Mansachi | मंगेश शिवलाल बरई | New Marathi Poem | आयुष्यावर कविता | Audio Poem






style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


सावली माणसाची...

सावली माणसाची...
आयुष्यभर त्याच्यासोबत चालणारी,
सुख-दुःखात साथ निभावणारी,
जिवाभावाची सखीच...

सावली माणसाची...
स्वच्छ प्रकाशात स्पष्ट दिसणारी,
अंधारात माञ...
काही काळासाठी साथ सोडणारी,

सावली माणसाची...
त्याच्या वयाबरोबर वाढणारी,
त्याचं आस्तित्व दाखवणारी ,
कधी कधीतर...
त्याच्यात अस्तित्वात हरवणारी,

सावली माणसाची...
माणसातली माणुसकी जपणारी,
त्याच्या नजरेत,
त्यालाच असते सावरणारी,

सावली माणसाची...
असली काळाबरोबर दिशा बदलणारी,
तरीही...
आयुष्यभर त्याच्यासमोर चालणारी.



मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी,

 पंचवटी, नाशिक-४२२००३.









Audio poem, audio story, Marathi Audiobook
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या