crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
एकदा तथागत बुद्ध एका गावात येणार अशी खबर पोहोचली सगळी नगरी त्यांच्या स्वागताला सज्ज झाली. गावात एक चांभार होता. त्याला मात्र ही खबर मिळाली नाही. तो नेहमी प्रमाणे दिवसभराचं काम करून रात्री घरी जाऊन झोपला. सकाळी उठून पाहतो, तो त्याच्या घरामागच्या तलावात एक सुंदर कमळ फुललं होतं. ते पाहून तो खूप चकित झाला. तो काही कमळांचा हंगाम नव्हता.
असं अवकाळी फुललेलं कमळ म्हणजे थोडेफार पैसे कमावण्याची संधी हे लक्षात घेऊन त्याने ते लगेच तोडून घेतलं, तो नगराच्या बाजाराकडे निघाला. बाजारात पोहोचण्याच्या आधीच त्याला शहरातला सगळ्यात धनाढ्य सावकार वाटेत भेटला. त्याने कमळाचं फूल पाहून विचारलं, या मौसमात कमळ विकायलाच निघालायस ना? तर मलाच दे.
सेवकाला त्याने आज्ञा केली, पाच मोहरा दे त्या फुलाच्या. चांभार चकित झाला कमळ बे-मौसमी होतं, त्यामुळे महागात महाग एखाद मोहरे पर्यंत किंमतीला विकलं जाईल, असा त्याचा अंदाज होता. थेट पाच मोहरा.
तेवढ्यात मागून आवाज आला, "थांबा. ते फूल माझं आहे सावकाराने जी काही किंमत सांगितली असेल त्याच्या पाचपट किंमतीला मी ते घेतोय" हा आवाज होता नगराच्या प्रधानाचा. त्याच्या आपल्या कानांवर विश्वास बसेना. एका मोहरेच्या जागी पंचवीस मोहरा सावकार चिडला, म्हणाला, "प्रधान जी किंमत द्यायला तयार असतील, त्याच्या दुप्पट किंमत मी देईन."
पाठोपाठ आणखी एक आवाज आला, "उगाच वाद घालत बसू नका. या फुलाच्या बदल्यात त्याने काय हवं ते मागावं. ते त्याला मिळेल. पण फूल मलाच मिळायला हवं." हा आवाज साक्षात सम्राटाचा होता. तिन्ही धनवंतामध्ये वाद सुरू झाला की, "फुलावर कोणाचा अधिकार आहे?"
चांभाराने भीत भीत विचारलं, "पण, या फुलामध्ये असं काय खास आहे?"
ते तिघे म्हणाले, "फुलात काही खास नाही. आज भगवान बुद्ध गावात येणार आहेत. त्यांच्या पायावर वाहण्यासाठी हे फूल हवं आहे."
चांभार म्हणाला, "तसं असेल, तर मला हे फूल विकायचं नाही. बुद्धाच्या पायावर ते मीच वाहीन."
ते तिघेही धनवंत बुद्धाला भेटले आणि त्यांनी हा चमत्कार सांगितला, "एक चांभार, दारात आलेलं ऐश्वर्य, राजपाट नाकारू कसा शकला?"
बुद्धाने चांभाराला विचारलं, "असं तू का केलंस?"
तो म्हणाला,
"मला त्या फुलाची खरी किंमत आधी पासून माहिती होती. पण स्वत:ची किंमत माहिती नव्हती, ती आजच समजली."
*"स्वतःची किंमत स्वतःला झाली की ती व्यक्ती मौल्यवान ठरते."*
crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
0 टिप्पण्या