अभंग : ऊठ ऊठ पंढरीनाथा | mp3 abhang download | marathi song

       🌻 आनंदी पहाट 🌻    

     !! मनाचिये वारी पंढरीची !!





style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


  विठुरायाला भक्तांच्या विनवणीची

🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹

    हरीच्या भजनें हरीचे भक्त
    हरीचे भक्त ।
    झाले विख्यात भूमंडळीं ॥
    तरोनि आपण तारिले आणिका ।
    वैकुंठनायका प्रिय झाले ॥
    ज्यांचे ध्यानी मनीं हरी ।
    राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥
            ......संत निळोबा

        पिंपळनेरच नाहीतर शिरुर.. पारनेर या अहमदनगर जिल्ह्यातील गावाची ओळख आहे संत निळोबांच्या गुरुभक्तीमुळे.
        संत निळोबांची पालखी यंदाच्या मनाचिये वारीत आहे. संत निळोबा हे गुरुभक्तीचे आदर्श. असिम श्रद्धा आणि विश्वास या बळावरच जग चाललेय. संत निळोबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य.. निस्सिम भक्त. तुकोबांचे जीवन.. विठ्ठल भक्ती आणि अभंग ऐकून त्यांनी शिष्यत्व पत्करले. त्यांचे तुकोंबांवर एवढे प्रेम की ते म्हणतात..
     तुका ध्यानी, तुका मनी ।
     तुका दिसे जनी वनी ।
     तुका तुका म्हणोनी ।
     निशिदिनी बोलावे ॥
        निळोबांचे गुरुप्रती असलेले हे प्रेम, निष्ठा आणि भक्ती यामुळेच संत तुकोबांना वैकुंठाहून त्यांना दर्शन देण्यास यावे लागले अशी आख्यायिका आहे.
        पंढरीची वारी ही बलाढ्य सेनेप्रमाणे दिंड्या.. पताका.. टाळ.. मृदुंगासह जोषात हरिभजन करीत वाटचाल करतेय. या वारीत अनेक संत उपस्थित आहेत. हे संत भक्तांच्या मनात विठ्ठल भक्ती जागवतात. भक्तांची दुःख दूर करतात, त्यांना सन्मार्गाला लावतात.. जगात त्यांचा मान वाढवतात. या संतांच्या सुसंगतीने.. संस्काराने.. आदर्शाने हे भक्त पण विठ्ठलास प्रिय होतात.
        आज पुन्हा तेच मन आनंदी करणारे दृश्य डोळ्या समोर येतेय. सर्वच संत पंढरीला निघालेत. अंतरंगी एकच ध्यास आहे तो विठ्ठल दर्शनाचा.. भेटीचा.
        वारकऱ्यांच्या दिंड्या.. संत महात्मे यांच्या पायी वारीत ऊन.. वारा.. पाऊस याची चिंता नाही. होईल तशी निवास, भोजनाची सोय मान्य. त्याचाही मोठा आनंद आहे. ते तर टाळ.. मृदुंगासोबत हरीनामात हे एवढे गर्क की खाण्यापिण्याचे भान नाही. त्यांना दिसतेय ते पांडुरंगाचे सावळे रुप. मनाने ते पंढरीला केव्हाच पोहोचलेत.
        हे विठ्ठला.. आमची नित्त्यनेमाची काकड आरती ही झालीय.. हे देवा उठा आता..! पहाट झालीय. तो चंद्रमाही दूर गेलाय, चांदण्याही लुप्त झाल्या आहेत.. झाडावरच्या कळ्यां फुलून त्यांची फुले झालीत, त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतोय, अन् त्या पाखरांनीही दिनचर्या आरंभलीय. ती भीमानदी दुथडी भरुन वाहत तूझ्या अभ्यंगस्नानासाठी सिद्ध आहे.
        हो.. आणि देवा.. तुमच्या दर्शनासाठी कोण कोण येत आहेत ते ? जगतगुरु तुकोबा, ज्ञानोबा माऊली, संत नामदेव, एकनाथ, सोपानदेव, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई ते भक्तश्रेष्ठ चोखामेळा किती किती म्हणून नावे सांगू..
        हे वारकरी भक्त म्हणजे षडरिपूवर विजय प्राप्त करणारे. त्यांनी मनोभावे केलेल्या काकड आरती मध्ये सगळ्या आस वासना भस्म झाल्यात. या वारीतील संतमहात्म्यानी सर्वांच्या मनामधे भक्तीची.. समतेची.. एकात्मतेची ज्ञानज्योत प्रज्वलीत केल्याने देशवासीयांचे जीवन उजळणार आहे.
        तेव्हा देवा.. पंढरीनाथा आता उठा.. दर्शन देत देशवासीयांची नित्य पहाट आनंदी करा..🙏
     
🌻🌷🔆🛕🌞🛕🔆🌷🌻

  ऊठ ऊठ पंढरीनाथा
  ऊठ बा मुकुंदा
  उठ पांडुरंगा देवा 
  पुंडलिक वरदा

  अस्त पातलासे चंद्रा,
  तारका विझाल्या
  फुलत फुलत वेलीवरच्या
  कळ्या फुले झाल्या
  जाग पाखरांना आली,
  जाग ये सुगंधा

  पात्र पाणियाचे हाती_
  उभी असे भीमा
  दर्शनास आले तुझिया
  ज्ञानदेव, नामा
  भक्तराज चोखामेळा
  दुरून देई सादा

  देह-भाव मिळुनी केला
  काकडा मनाचा
  निघून धूर गेला अवघ्या
  आस-वासनांचा
  ज्ञानज्योत चेतविली ही
  उजळण्या अवेदा

🌺🔆🛕🌸🙏🌸🛕🔆🌺

  गीत : ग. दि. माडगूळकर
  संगीत : सुधीर फडके
  स्वर : सुधीर फडके

  







🌻🥀🌸🔆🛕🔆🌸🥀🌻

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या