'आयुष्य म्हणजे आरसा'
संजय धनगव्हाळ
*****************
माझ्या मते आयुष्य म्हणजे एक आरसा,त्यात आपण आपलं प्रतिबिंब बघताना आपण काय आहोत,कसे आहोत,कसे जगतो,हे सगळ आपल्याला त्या आरशात पाहिल्यावर कळतं. म्हणजे स्वतःची प्रतिमा जेव्हा आपण आरशात बघतो तेव्ह आपल आयुष्य कोणत्या वळणावर चाललय हे आरसा आपल्याला सांगत असतो.तेव्हा जेकाही करायच ते जरा जपून,सावकाश,सबुरीनेच करायचं कारण अनेकांच्या नजरा आपल्यवर असतात हे विसरूनये.अर्थात आयुष्य म्हणजे नेमकं काय याचा उलगडा लवकर होत नाही. आयुष्य हे गुंतागुंतीच असल्यामुळे सोडवणे जेव्हढं अवघड असते तेव्हढेच जगणेही कठीण असते.पण माणूस आयुष्य अनेक तऱ्हेने जगत असतो.प्रत्येक माणसाच जगण,वागण निराळे असते.परिस्थिती म्हाणा किंवा ऐपतीप्रमाणे म्हणा त्यानुसार माणसाचे जगणे असते.काही माणस विचार करून जगतात जे आहे ते उद्यासाठी ऱ्हावू द्यावे म्हणून तो आजचं जगण अर्ध्यावर सोडातं असतो तर काही माणसे ईतके स्वच्छंदी असतात की उद्याचा विचार आज कशाला!डोळ्यासमोर आनंद दिसतं असताना नैराश्याने का जगायचं आनंदाने जगायचना!. अर्थात आयुष्यात जे काही करायच ते चांगलचं करायचं आणि असा प्रत्येकाचा प्रामाणिक हेतू असतो.काही अपवाद सोडला तरं अन्यथा प्रत्येकजण आयुष्याला सुरेख सुदंर बनविण्याच्या प्रयत्नात असतात.
आयुष्यात सर्वच माणसे आपल्या सारखीही नसतात व समविचारीही नसतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात त्यांचा स्वभावही त्याप्रमाणे असतो.म्हणजे माणसाने आपल्या स्वभावानुसान न वागत नम्रतेने वागलात तर मनभेद होण्याची शक्यता कमी असते.पण काहींचा काहीकरता स्वभाव बदलतं नाही त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचे वागणे असते अर्थात त्यांच्या वागण्या बोलण्याचा भाव त्यांच्या स्वभावात आलेला असतो म्हणून त्याप्रमाणे ते वागत असतात.तेव्हा मन जुळवून घेण्याची कला ज्याजवळ असते अशा माणसला विरुद्ध स्वभावाच्या माणसांना आपलस करून घेण्यास काही अवघड नसते. माणसाच्या स्वभावाची नाड समजली की आपल वागण बोलण पाहून कालांतराने त्याच्यातही बदल झाल्याचे दिसुन येते.काहीतर,मी असा आहे पटलं तर बोला नाहीतर चालते व्हा,अशा प्रकारचा तिरसटपणा त्यांच्या अंगी असल्यामुळे संबंधित व्यक्तीला नाईलाजाने माघार घेवून त्याच्या पासून दुर रहाणेच बरे असते.कारण काहींचा स्वभाव त्यांच्या मनावर स्थिर झालेला असतो म्हणून तो त्याचं वागणे सोडेल ही अशक्य गोष्ट असते. अशा माणसांचे व्यक्तीशः संबधही फारसे कोणाशी चांगले नसतात आणि अशांना कोणी जवळही करत नाही. आणि आपण असे का वागतो,बोलतो याचा उलगडाही त्यांना सहजासहजी होत नाही म्हणून आयुष्य म्हणजे नेमकं काय हे ज्याल कळाल तो माणूस मनमौजी असतो.तो कसलाच विचार करत नाही.ना परिस्थितीचा ना परिणामांचा,आयुष्य कसे सुदंर करता येईल या विचारांनी तो जगतं असतो.आपण नेहमीच म्हणतो की आयुष्य एकदाच मिळते पुन्हा नाही,तेव्हा जेकाही करायचं ते याच जन्मात करून मोकळे व्हायचं म्हणून माणसं आयुष्यात जगण्याचा पुर्ण आनंद घेत असतात.मग हा आनंद कशात असतो? आपल्या चेहऱ्यावरचं हसु दुसऱ्याच्या चेहऱ्यावर देण्याच्या समाधानात आपला आनंद आहे. देण्यासारखे खुप असले तरी देवू शकत नाहीत,किमान हसण्याचा आनंद जरी देता आला तरी संबंधित व्यक्तीचे आयुष्य आनंदाने भरून जाते, चेहऱ्यावर हसु फुलते, सर्वच नाही पण जरास दुःख जरी दुर करता आले तरी त्या दुःखाच्या गर्दीत सुखाला जायला वाट मिळते.एकदा मिळालेल्या आयुष्याला सुंदर करायच आहे ना!मग गरजवंताला मदत करण्याचा प्रयत्न करावा एखाद्याची अडचण सोडवावी ओळख नसतानाही मदतीचा हात देण्यात जो आनंद आहे तो कुठेच नाही.कारण समोरचा आपल्या हाताचा आधार घेवून उभा ऱ्हाणार असतो. आपल्या सहारे तो त्याची विस्कटलेली घडी सरळ करणार असतो अडचणीतला माणूस मदत करणाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा बघतो ना तेव्हा त्याला मदत करणारा परमेश्वरच वाटतो कारण ज्याच्या मनात एखाद्याविषयी सहानुभूती वाटते आणि मागचा पुढचा विचारन करता त्याला आधार देतो तेव्हा तो त्याच्यासाठी परमेश्वरापेक्षा कमी नसतो.म्हणून
आयुष्य असेच असावे की प्रत्येकाला ते सुदंर दिसावे.
आपली वाट पाहिली गेली पाहिजे असे आयुष्य असावे.ज्याचं कोणी नाही त्याचा पाठराखी होवून त्याची काळजी घेतली गेली पाहिजे.मी आहे ना बस तुमच्या एव्हढयाशा सांगण्याने सुध्दा एखाद्याला जगण्याची उर्जा मिळते.चालनाऱ्या माणसाने थांबल नाही तर थावलं पाहिजे मनातली ईच्छाशक्ती जागृत केली की माणूस आपोआप धावायला लागतो.मनातल ओळखता आले म्हणजे मन आपसूकच हलके होते.प्रत्येक माणसाच्या मनावर काहीना काही दडपण असतेचं अशा माणसाच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे अश्रु पुसून उमेदीचा मार्ग जरी दाखवला तरी त्याला जगण्याचं बळ मिळते. जातपात भेदभाव विसरून माणुसकीने जवळ करून
हाकेला होकार देणारे व्यक्तीमत्व असले की सुदंर आयुष्य जगायला कोणाच्याही कौतुकाची गरज लागत नाही. दुःखाचे वाटेकरी नका होवू पण दुःखाच निवारण कसे होईल एव्हढ जरी केले तरी दुःखात असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या किती किती लहरी उसळतील!त्यांचे हसु त्यांचा आनंद पाहून स्वतःला किती समाधान वाटेल याची काही परिसीमाच नसते. एखाद्याच्या आयुष्याचे भले किंवा कल्याण होणाल्या आपण जर कारणीभूत असणार आहोत तर तो क्षण आपल्या आयुष्यातील दुग्धशर्करा योग समजवा की आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात सुवर्ण सकाळचा उदय झाला यापेक्षा सुदंर आयुष्य काय असणार आहे.आयुष्याला सुदंर कसे करायचे हे आपल्या हातात असते.मंदीरात जावून तासंतास पुजापाठ करायची आणि मंदीरातून बाहेर पडल्यावर दारू पिऊन धिंगाणा घालायचा किंवा उगाच भांडण करायची नाहीतर चोविसतास काहीतरी कुरघोडी करुन बरेवाईट अपशब्द बोलून तिरस्काराचे धनी व्हायचे याला आयुष्यचं नाहीतर जगणे ही म्हणतं नाही.
चांगली संगत,चांगली माणसं,चांगले विचार चांगले वाचन,चांगले बोलणे,आणि चांगला मार्ग याच्याचमुळे आपले आयुष्य सुदंर होत असते. वाईट मार्गामुळे माणसाच्या आयुष्याची वाताहतच होते.
प्रत्येक माणूस आपल्यासाठी अनोळखी असतो आणि ओळखीतून तो आपला होतो.आपल्याशी नात जोडतो आणि त्या आपलेपणाच्या नात्यात जेव्हा गोडवा येतो तेव्हा तो आपल्या आयुष्याचा एक भाग बनतो.त्याची प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्याशी जोडली जाते तेव्हा जे आपले होतात आपण त्यांच्या सुख दुःखाचा हिस्सा होवून त्याचे आयुष्य सप्तरंगी करण्याच प्रयत्न केला की आपले आयुष्य आपोआप सुदंर होते. तेव्हा आयुष्य म्हणजे काय?असा प्रश्न पडतं नाही किंबहुना आरशात पाहून आपण काय आहोत,कसे आहोत,कसे जगतो असे मनात घुटमळणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज पडत नाही.आपल्या जवळच्या व्यक्तीला आपल्या शेजारी बसुन आपल्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्या मनात साठवलेल्या वेदना मोकळ्या करताना रडता आले पाहिजे असे माणसाचे आयुष्य असावे.आयुष्यावर काय बोलायचं आयुष्यावर खूप बोलता येईल आयुष्याबद्दल एव्हढचं सागंता येईल की आपल्या कार्य कर्तृत्वाचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे असे आयुष्य असावे,आपल्याला पाहून धावत येवून मिठी मारली पाहिजे,आपल्याला पाहून गहिवरून जाताना आपल कोणीतरी आलं याचा अभिमान वाटेल असं आयुष्य असलं पाहिजे.कर्तृत्वशुन्य माणसापुढे न झुकणारा माणूसच स्वतःच्या आयुष्याला सुदंर करू शकतो आणि तोच त्याच्या शुध्द सात्विक सुरेख सुदंर आयुष्यात अटकेपार क्रांती करतो. कारण आपल्या सुदंर आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो.तेव्हा फक्त जन्माला येवून उपयोग नाही.जन्माला आल्यावर छान जगता आलं पाहिजे आपले जगणे चांगले असेल तर आपल्या सुदंर आयुष्याच्या देदीप्यमान प्रकाशाने सारे विश्व प्रकाशमय होते एव्हढे मात्र निश्चित.
संजय धनगव्हाळ
९४२२८९२६१८
0 टिप्पण्या