आयुष्याचा प्रवास एकट्याने करताना..... Marathi Audiostory mp3

 आयुष्याचा प्रवास एकट्याने करताना..









style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">



...


किती कठीण असत ना सगळं असून एकट राहणं,फारच जास्त..

दुःखाचा अंकुश मनावर ठेऊन आलेला दिवस काढणं आणि जगणं,असो.

मिळेल ते खायचं भेटेल तिथे राहायचं 

आहे त्यात समाधान मानायचं आणि आलेला दिवस ढकलत राहायचं.


ते चुलीपुढे बसून ताटात वाढलेलं मुकाट्यानं खातात

त्यांचे सदरे फाटके असतात  आणि मुडपून टीप घातलेली असते धोतराला कुठेतरी - कुठे ठिगळ असतात,

खिन्न असतात नेहमी  झोपेतसुद्धा 

ते कधी स्वतःचं अस्तित्व जाणवून देत नाहीत 

खंगलेले  होते.

रानडुकरांचे कळप जसे पिटाळून लावावे तसे घरच्यांनी निर्दयी मनाने पिटाळून लावलेलं हे आजोबा आज आमच्या हॉस्पिटल मध्ये येऊन पोहोचले त्याच करण पण तसच होत,

दबक्या पावलाने मध्ये येत म्हणाले डाक्टर साहेब पोटात दुखतंय आणि जरा पडसं पण आहे, माझ्याकडे पैसे नाही बघा,अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तर हे बाबा तिथे आले होते तस ते बाहेरच असतात करण घर नाही ना दार नाही मग आश्रय कुठे तर जिथे दोन वेळेचं जेवण भेटेल तेच यांचं घर.


चूक की बरोबर या पलीकडे पण एक जग असत, जिथे फक्त शांतता असते,आधी दुनिया खूप पुढे चाललीये,लोक फार वेगाने धावत आहेत , पण आता आपण माघे राहू याची आता भीती, भय काहीच वाटत नाही.

होतो तो फक्त पश्चाताप करण आयुष्य झिजवल आहे डांबरी ची खडी फोडून आणि बाराशी खांदुन,पण आता काय या सगळ्यातून सावकाश चाललेलं कधी पण बरं वाटत पहा.

कदाचित दुनियेच्या पाठीमाघे राहूनच दुनिया चांगली पाहता येते,आता फक्त पुढे जाणाऱ्याला  वाट करून द्यायची,आणि आपलं आयुष्य रस्त्याच्या कडेने चालत काढायचं,ना हसायचं ना रडायचं फक्त आपलं जय हरी विठ्ठल म्हणत चालायचं असच त्यांच्या मनात आलं असेल कदाचित....


बोलताना बाबा च्या डोळ्यात पाणी आलं आणि तेव्हा समजलं की जेव्हा ओठ आणि शब्द काहीच सांगू शकत नाहीत की माझं हृदय किती दुखावलं आहे तेव्हाच डोळ्यातून पाणी येत.

शेवटी काय तर प्रारब्ध....

बाबा ला गोळ्या फ्री मध्ये दिल्या पैसे दिले तर ते त्यांनी घेतले नाही.आणि कार्ड दिल काही अडचण वाटली तर फोन करा जमेल ती मदत करू हा शब्द त्यांना पराकोटीचा धीर देणारा वाटला...

असेच कडू गोड अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात..


पोस्ट या साठी टाकली की या अनुभवातून आणखी कोणाची तरी आपण मदत करावी 


                                    ✍️             

                    डॉ रामप्रसाद श्रीराम राऊत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या