आसवांचा पसारा... | योगेश चाळके | Gazal in mp3




 



















style="display:block; text-align:center;"

data-ad-layout="in-article"

data-ad-format="fluid"

data-ad-client="ca-pub-7384059194066495"

data-ad-slot="7297264882">





गझल

    मुक्तासुत अर्थात योगेश चाळके


थोडा खुळ्या सुखांचा थोडा जुन्या व्यथांचा

.मी कोंडला पसारा...डोळ्यात आसवांचा..


केव्हाच घेतले मी असते मुठीत अंबर

पण शाप आड आला तेव्हा कळ्या फुलांचा


कित्येकदा छताला मी टाचणार होतो...

बेभान रौद्र तांडव...थांबेच ना ढगांचा


केली उगाच घाई आयाळ कापण्याची

आला पुन्हा जमाना परतून रानट्यांचा


येशील का पुन्हा तू हृदयात आज माझ्या

बघ डाव मांडला मी..अलवार भावनांचा


समजावणार आहे मीही मनास माझ्या

 रिचवून टाक प्याला... घायाळ आठवांचा


जाईन त्या दिशेला...ठेवीन आठवे मी

जडला मला नव्याने सत्संग वादळांचा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या