Life-Changing कथा : हत्ती आणि डुक्कर | marathi mp3 Audiostory

 





















style="display:block; text-align:center;"

data-ad-layout="in-article"

data-ad-format="fluid"

data-ad-client="ca-pub-7384059194066495"

data-ad-slot="7297264882">






Life-Changing कथा :  त्ती आणि डुक्कर.


एक हत्ती नदीत आंघोळ करून रस्त्याने चालला होता.

जेव्हा तो एका पुलाजवळ आला तेव्हा त्याला विरुद्ध दिशेकडून चिखलाने पूर्णपणे भरलेले डुक्कर दिसले.


हत्ती शांतपणे एका बाजूला सरकला, त्या घाणेरड्या डुकराला पुढे जाऊ दिले आणि पुढे आपला प्रवास चालू ठेवला.


चिखलाने माखलेले डुक्कर नंतर आपल्या मित्रांना गर्विष्ठपणे बोलले,


*“बघा मी किती मोठा आहे; हत्तीसुद्धा मला घाबरत होता आणि मला जाऊ देण्यासाठी एका बाजूला सरकला होता.”*


ही News ऐकून काही हत्तींनी त्याच्या मित्राला विचारले की,तू असं कारण्याचे कारण काय? हे भीतीपोटी केलंस काय?


हत्तीने हसून उत्तर दिले, *“मी डुकराला माझ्या पायाखालून सहज चिरडून टाकू शकलो असतो, पण मी स्वच्छ होतो आणि डुक्कर खूप घाणेरडे होते."*


ते चिरडल्याने माझा पाय घाण घाण झाला असता आणि मला ते टाळायचे होते. म्हणून मी बाजूला झालो.”


*सारांश:*

 *विकसित झालेले मन नकारात्मकतेशी संपर्क टाळेल, ते केवळ भीतीपोटी नव्हे तर नकारात्मकतेपासून दूर राहण्याच्या इच्छेमुळे.*


*तुम्हाला प्रत्येक मतावर, प्रत्येक टिप्पणीवर किंवा प्रत्येक परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.*


*तुमची लढाई हुशारीने निवडा...*

*प्रत्येक गोष्ट तुमचा वेळ आणि लक्षवेधून घेण्यायोग्य असेलच असे नाही *

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या