विशेष लेख : स्वराज्य ते सुराज्य !. Marathi Audiostory in mp3 Chatrapati Shivaji Maharaj


























स्वराज्य ते सुराज्य!.

केवळ इतिहासात रमणे हा मानवी घात आहे. इतिहासाचे जतन संवर्धन आणि संगोपन हे जागृत मानवी समाजाचे लक्षण आहे. तर इतिहासाचा अभ्यास करून, त्याची वर्तमानाशी सांगड घालत जिद्द, आणि कठोर परिश्रमाच्या बळावर उत्तम भविष्यकाळ घडवणे. हे नवंमेशी प्रतिभेचा " सुशिक्षित आणि सुसंस्कृत मानवी समाजाचे प्रेरणादायी लक्षण आहे.





style="display:block; text-align:center;"

data-ad-layout="in-article"

data-ad-format="fluid"

data-ad-client="ca-pub-7384059194066495"

data-ad-slot="7297264882">


यापैकी व्यक्ती आणि समाज म्हणून आपण नेमके सध्या स्थितीत कोठे आहोत? हा प्रश्न आजच्या मंगल दिनी प्रत्येकानेच आपल्या अंतर्मनात विचारायला हवा. कारण आज जण कल्याणकारी राजा ' छत्रपती शिवाजी महाराजांची 391 वी जयंती|  आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा घेऊन महाराजांनी रयतेचया मन-मनात स्वातंत्र्याची पणती पेटवली. पुढे याच स्वातंत्र्य पणतीचे सोळाशे 74 साली  राज्याभिषेकाच्या रूपाने स्वातंत्र्याची प्रेरणादायी मशालीच्या रूपात परिवर्तन झाले. महाराजांनी निर्माण केलेली हीच स्वराज्य सिंहासनाच्या रूपाने रायगडावर स्थापन झालेली स्वातंत्र्याची प्रेरक मशाल अखंड भारत वर्षाची मुक्तता आणि सुराज्य असा ध्यास घेऊन पुढे शेकडो वर्ष कालक्रमणा करत राहिली. आणि याच प्रेरणेतून भारतीयांनी अथक संघर्ष आणि मेहनतीच्या बळावर 1947 साली स्वातंत्र्य मिळवले. पण सुराज्य आले काय?? स्वराज्य स्थापना मागे दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांचइ  इच्छा, तदनंतर सावरकर आणि खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधी आधी राष्ट्रव्यापी महापुरुषांची हीच अंतस्थ इच्छा होती, की येथे सुराज्य स्थापन व्हावं. आता सुराज्य तर सोडाच पन स्वराज्य ही  कुठे भारतवर्षात सद्यस्थितीत दिसत नाही, याच अनुषंगाने सद्यस्थितीचे केलेले हे सिंहावलोकन.
       - शिक्षण आणि संस्कृती चा रास.
कोणत्याही सभ्य समाजाचा पाया त्यातील मानवी समुदायावर जन्मजात झालेल्या संस्कारआनवरच ठरतो. पण आज हेच आदर्श संस्कार लोक पावत चालले की काय अशी शंका येते. कारण आताची  पिढी  कॉन्व्हेंट मध्ये जाऊन शिक्षण घ्यायला लागली, त्यामुळे तिचा रामायण,महाभारत,ज्ञानेश्वरी,भगवद्गीता. इतकच काय तर पूर्वी रोज घराघरातून सायंकाळी ऐकू येणाऱ्या *शुभम करोति शी सुद्धा दुरान्वये संपर्क राहिला नाही. आणि तंत्रज्ञानावर मजबूत पकड असणाऱ्या, या पिढीच्या पालकांना त्याची गरजही वाटत नाही ही बाब अधिक क्लेशदायक. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या परमपवित्र पसायदान ज्ञानोबाराय यांनी अपनआस दिलं पण आजच्या पिढीस त्याचा गंधही नाही. मग अशा स्थितीत संस्कार करणाऱ्या साहित्याशी आताच्या पिढीचा संपर्क होत नसल्यामुळे त्यांच्यावर संस्कार कुठून होणार?  आणि संस्कार नाहीतर संस्कृतीचा ऱ्हास निश्चित.
आताच्या भारतीय शिक्षणाबद्दल तर आनंदी आनंदच म्हणावा लागेल. सेमी इंग्लिश किंवा पूर्णपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढून परकीय समाज आणि संस्कृतीचा ठसा येथील बालकांच्या मनावर ठसवण्याचइ दुर्दैवी कार्य शासन संमतीने सुरू आहे. सध्याची येथील विद्यापीठ ज्ञान निर्मितीची केंद्रे नसून केवळ ज्ञान हस्तांतरणाची स्थळे झाली आहेत, त्यामुळे एखाद्या विषयात पदवी घेतलेला इथला युवक त्याच विषयाशी संबंधित कृती करण्यास पदवी घेऊनही अक्षम असतो.


style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">



शिवकाळात संस्कार होत होते त्यामुळेच सभ्य समाज आणि आदर्श रयतेची निर्मिती झाली.  मग अशा आदर्श रयतेचइच  छत्रपती शिवरायांना स्वराज्यस्थापनेच्या कारणी मोठी साथ लाभली. शिवकाळात रयतेला कदाचित पाठ्यपुस्तके शिक्षण मोठ्या प्रमाणावर मिळाला ही नसेल, पण तिच्या मौलिक शिक्षणाचा पाया अगदी मजबूत होता. यामुळेच स्वराज्यात गुन्हेगारी, लाचखोरी, किंवा इतर अन्य गुणे अगदीच अल्प प्रमाणात होते.
    - रोजगार आणि आर्थिक साक्षरता.
महाराजांच्या स्वराज्याचे ब्रीद होते. 'सर्वांस पोटास लावणे आहे. आणि याच साठी स्वराज्यातील रयते करीता महाराजांनी उपजीविकेच्या शक्य तितक्या संधी उपलब्ध करून दिल्या. आज स्वरांच्या कडून स्वराज्याचा विचार करताना याच उपजीविकेच्या संधी आकुंचन पावत चालल्याचे दिसून येतात. सध्याच्या लोकनियुक्त राज्यकर्त्यांची ही नैतिक जबाबदारी ठरते की त्यांनी येथील जनतेला रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून द्याव्यात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी चलनासाठी विविध नाणी सार्वजनिक वापरात आणली. रयत नेहमी आर्थिक दृष्ट्या सुद्धा सक्षम कशी राहील याचाच प्रयत्न केला. आज आपण अनोख्या आर्थिक संकटातून परिभ्रमण करतो आहोत, अशा वेळी शिवरायांच्या अर्थविषयक धोरणांचा, देखील अभ्यास करून राज्यकर्त्यांनी शक्य त्या प्रमाणात ते अमलात आणायला हवेत.
     - कृषी धोरण.
शिवकाळात शेती मध्ये अनेक सुधारणा घडून आल्यात. छत्रपती शिवाजी महाराज हे  प्रथम राज्यकर्ते आहे की ज्यांनी स्वराज्यातील शेतजमिनीची मोजदाद केली. शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांना अगदी पावलोपावली राज्यकर्ता म्हणून शिवरायांनी साथ दिली. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हे संकट तेव्हाही शेतकऱ्यांवर होतच, या कारणांमुळे एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं इतिहासात कुठे वाचायला मिळत नाही.

या उलट आताची शेती आणि आपल्या शेतकरी बांधवांचे दुःख तर आपण जाणताच.   आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट देशद्रोही ठरवलं जातं आहे, आणि तइही येथील लोकनियुक्त प्रधान सेवकाकडून. हा प्रकार कधीच भूषणावह नाही.


style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


    - स्थापत्यशास्त्र आणि सद्यस्थिती.
शिवकालीन स्थापत्य कलेचे अप्रतिम नमुने म्हणजइ, स्वराज्याच  वैभव अर्थात स्वराज्यातील गड किल्ले. सातत्याने बदलणारी नैसर्गिक स्थिती, परक्यांचे कित्येकदा झालेले आक्रमण, अशा संकटांना तोंड देत साडेतीनशे वर्षांनंतर आज देखील महाराजांच्या काळात उभारण्यात आलेले गड-किल्ले बहुतांशी सुस्थितीत असल्याचं दिसून येतं. त्याकाळी काही इंजिनीअरिंगचा शास्त्रशुद्ध शिक्षण नव्हतं, तरीदेखील इतके अप्रतिम स्थापत्य शैली विकसित झाल्यास आपणास पहावयास मिळते. या उलट आता गल्लोगल्ली इंजिनिअर असून सुद्धा १०-१५ वर्षात बांधलेली इमारत ढासळते मग आशा इंजिनिअर चा आणि त्यांच्या स्थापत्य शास्त्रातील शिक्षणाचा काय फायदा? शिवकालीन स्थापत्य कलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. शिवकालीन स्थापत्य कलेच्या या वैभवाचं, अर्थात स्वराज्याची संपत्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या आपल्या या गडकिल्ल्यांचा जतन आणि संवर्धन करणे ही देखील शासन आणि समाज म्हणून आपणा सर्वांची जबाबदारी आहे. गड-किल्ल्यांवर ती कोणत्याही अनैतिक प्रकार न करनअ, आणि इतर कोणी करत असेल तर त्यास तसे न करू देणे ही शिवरायांच्या स्वराज्याचे पाईक म्हणून आपणा सर्वांचीच नैतिक जिम्मेदारी आहे.
पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. महिनाभरापूर्वी काही माथेफिरू युवक दारू पार्टी करायला पन्हाळ्यावर गेले होते, काही जागृत शिवप्रेमींच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत बदमाशांना पन्हाळ्याहून हाकलून लावले. पण या  बदमाशांच्या गावातील गावकऱ्यांनी नंतर या शिवप्रेमींना गाठून त्यांना एका खोलीत कोंडून मारले. असे मद्यपी बदमाश आणि त्यांचं समर्थन करणारे बुद्धी भ्रष्ट गावकरी हेच खरे आताच्या सुराज्याच्या अडथळ्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. शिवरायांच्या स्वराज्यापासून गांधीजींच्या स्वप्नातील स्उराज्यापर्यंतची वाटचाल करत असताना अशा प्रवृत्तीच्या लोकांचा बिमोड करणे ही काळाची गरज आहे.
एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या स्वराज्याचा केवळ अभ्यास करण्यात पुरेसे नाहीतर त्याचे जास्तीत जास्त अनुसरण करणे योग्य आहे. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पैसा आणि संपत्ती या बद्दल आताच्या समाजाचे विचार. राम राज्याच्या किंवा सुराज्याच्या दिशेने जाण्यासाठी खचितच भूषणावह नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचया सह इतर सर्वच महापुरुषांच्या जयंत्या वाचून नव्हे तर नाचून साजरी करण्याची रूढ झालेली ही विचित्र परंपरा आपण खंडित करायला हवी. कारण आपणास नाचणारा नव्हे तर वाचणारा समाज हवा आहे, ज्याच्या ज्ञानाच्या बळावर आपण विश्वशांती निर्माण करू शकतो. जात,धर्म,पंथ,भाषा,प्रांत,इत्यादी भेद नष्ट करून, शिवरायांच्या आगर गांधीजींच्या स्वप्नातील "सुराजातील सअब्य आणि सुसंस्कृत. वैभव संपन्न समाजाची निर्मिती करूया.
©सुरज पाटिल.
१९.२.२०२१.

🎯ता नांदगाव. जी नाशिक.
🙏.. 🚩छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या जयंतीच्या आपणास सर्वास अगदी मनस्वी सकारात्मक सदिच्छा.
🙏#शिवराय मनामनात.
🚩# शिवजयंती घराघरात.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या