एक चुकीचे कर्म तुमच्या ९९ चांगल्या कर्मावर पाणी फिरवते | Audio story | with FMMarathi.in

 एक चुकीचे कर्म तुमच्या ९९ चांगल्या कर्मावर पाणी फिरवते !

कधी कधी जीव एका छाेट्याशा कर्मा ने जे जेाडताे ते हजाराे वर्ष भेागावे लागते 

कथा आहे महाभारतातील ! 

कर्ण चारित्र्यवान, दानशूर होताच तितकाच तो प्रजेसाठी सतत जागृत होता. त्याच्या दारी आलेल्याला कधीही त्याने रिकाम्या हाताने पाठवलं नव्हतं.

 प्रसंगी अगदी स्वतःची कवच कुंडले सुद्धा रूप बदलून आलेल्या इंद्राला देऊन टाकली होती ! 

इतकं सगळं असताना शेवटच्या महायुद्धात कृष्णाने अर्जुना करवी कर्णाला बाण मारायला लावून मारले. 

हे अनेकांना न उलगडलेले कोडे ! 

तेच कोडे रुक्मिणीला सुद्धा पडलेले !

युद्ध संपल्यावर कृष्ण जेव्हा घरी आला तेव्हा तिने त्याला विचारले  ,


"कर्ण सर्व बाबतीत निर्दोष होता तरी तुम्ही त्याला का मारले..?"


त्यावर कृष्णाने सांगितलं की, 

"नक्कीच कर्ण दानशूर होता, 

चारित्र्य संपन्न होता. याचकाला कधीही त्याने विन्मुख पाठवले नाही, अशी अनेक चांगली कामे (कर्म) त्याने केले. 

मात्र जेव्हा अभिमन्यूने लहान वयातही कौरवांचा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश केला होता तेव्हा खरेतर त्याने सर्वाना जणू पराभूत केलेच होते त्यामुळे तिथून बाहेर पडणे इतकेच बाकी होते. मात्र बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता अन त्याचा फायदा घेऊन कौरवांनी त्याला मारले. त्यावेळी मरताना अभिमन्यूने त्याच्या जवळच उभ्या असलेल्या कर्णाला पाणी मागितले. कर्णाच्या पाठीमागेच जवळ एक खड्डा होता ज्यात स्वच्छ पाणी होते. मात्र तिथले पाणी आणून अभिमन्यूला दिले तर दुर्योधनाला वाईट वाटेल, त्याला ते आवडणार नाही असं समजून कर्णाने पाणी दिले नाही. आणि मग तहानेने व्याकुळ झालेल्या अभिमन्यूने तडफडत प्राण सोडला !

*त्यामुळे कर्णाने आयुष्यभर केलेल्या सर्व चांगल्या कर्मावर पाणी फिरले !*

त्यामुळे "कर्म परत येतेच" याप्रमाणे नंतरच्या महायुद्धात कर्णाच्या रथाचे चाक त्याच खड्यात अडकले जिथे पाणी साठले होते (जे कर्णाने अभिमन्यू ला पाजले नाही) त्यामुळे त्या खड्यातच रथाचे चाक अडकणे हे कर्म परत येणे आहे. त्यामुळे त्याने चांगल्या केलेल्या कर्माचा एका वाईट कर्माने नाश झाला. 

त्यामुळे त्याला मरावे लागले !

तात्पर्य:

सातत्याने आपल्या कर्माची परतफेड  होत असते  हे नक्की आहे.

चांगले काम करत रहा.

वाईट कधीच कुणाचे करू नका. मग तुमच्या चांगल्या कर्माचे फळ चांगलेच तुम्हाला मिळणार !

नाहीतर तुमचे जहाज खूप चांगले आहे. मजबूत पण आहे. सुंदर देखील आहे.

मात्र त्यात तळाशी एक बारीक छिद्र असेल तर ते जहाज नक्कीच आज न उद्या बुडणार.

एक वाईट काम सगळ्या चांगल्या कामावर बोळा फिरवते, हे कायम लक्षात असुद्या .

👏💐दंडवत प्नणाम 💐👏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या