एक व्यापारी होता, तो एका ट्रकमध्ये तांदळाची पोती घेऊन जात होता. एक पोते घसरले आणि ट्रकमधुन खाली पडले. थोड्याच वेळात तिथे काही मुंग्या आल्या आणि त्यांनी 10-20 दाणे घेतले,परत काही उंदीर आले आणि त्यांनी 100-50 ग्रॅम खाल्ले आणि निघून गेले, परत तिथे काही पक्षी आले त्यांनी सुध्दा थोडे खाल्ल्यानंतर तिथुन उडून गेले,परत तिथे काही गायी आल्या 2-3 किलो खाल्ल्यानंतर त्या सुध्दा तिथुन निघुन गेल्या सर्वांनी आप आपल्या पोटा पुरते घेतले... आणि मग परत तिथे एक माणूस आला आणि त्याने कोणाचाही विचार न करता संपूर्ण पोतेच गडबडीने उचलून घेतले आणि घरी घेऊन गेला....
सृष्टितील इतर सर्व प्राणी पोटासाठी जगतात, परंतु माणूस प्राणी स्वार्थासाठी जगतो.... म्हणूनच सर्वकाही जवळ असूनही सर्वात दुःखी व असमाधानी फक्त माणुसच आहे.....
आवश्यकतेनुसार स्वतःच्या इच्छेवर माणसाने नियंत्रण ठेवले पाहीजे,नाहीतर नको त्या ईच्छा वाढत जातात आणि परत दुखाःचे कारण बनून समोर येतात....
रस्त्यावर उभे असणाऱ्या जीवनाची आपली नजर सगळीकडे आहे,
परंतु कुठे तरी अशी पाटी दिसावी
कि त्यावर लिहिले असेल...!
"समाधान"
0. कि.मी. 😊😌
0 टिप्पण्या