तु खूप वेगळी आहेस
डोळे मिटुन जेव्हा स्वतःला शोधशील, तेव्हा कळेल,
तु खुप खास आहेस.
आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास आहे.
मग प्रवासात कधी दरी,
कधी पर्वत.
कधी वादळ,
तर कधी वाळवंट आहे.
कधी ऊन,
तर कधी मुसळधार पाऊस आहे.
कधी गालिचे,
तर कधी काट्यांची फौज आहे.
पण नजर लक्ष्यावर असेल,
तर प्रवास हा एक मौज आहे!
अशा असंख्य लक्ष्यांची तुझी आस आहे.
डोळे मिटुन जेव्हा स्वतःला शोधशील.
तेव्हा कळेल,
तु खरंच खुप खास आहेस.
वेदनांचे स्वतःचे एक महत्त्व आहे.
त्या सहन केल्यास तरच
तुझ एक 'अस्तित्त्व' आहे.
पण जर हार मानुनि गेलीस.
तर मात्र पराभवाचे प्रभुत्त्व आहे.
प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर,
कधी शुभेच्छा,
तर कधी शिव्या-शाप आहे.
दुर्लक्ष केलस तर कळेल, तुला तर तुझ्या स्वप्नांचाच इतका व्याप आहे!
काहीही झाले तरी डगमगु नकोस, तुझ्यात प्रचंड साहस आहे.
.
डोळे मिटुन स्वतःला शोधशील तर कळेल.
तु खरच खुप खास आहेस!
माझ्या सगळ्या छान आणि सुंदर , स्वतःचे कर्तृत्व गाजवणाऱ्या मैत्रिणी आणि समस्त महिलांना समर्पित!
💐🙏
0 टिप्पण्या