आई-वडील
_____
आई + वडील = हेच जीवन
गणित खूप शिकलो पण हे आयुष्याचं गणित अनेकांना समजतं नाही !
० "आई- वडील" म्हणजे नक्की काय असतं?
० आयुष्य जगण्यासाठी देवाने दिलेलं, अँडव्हान्स पाठबळ असतं...!!!
० तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं, तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरण्यापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं...!!!
० "आई" तुमच्या
आयुष्याच्या गाडीचं योग्य
दिशा देणार "स्टीयरिंग" असतं...!!!
० तर अचानक आलेल्या संकटात सावरायला, "वडील"
म्हणजे "अर्जेंट ब्रेक" चा पर्याय असतं...!!!
० "आईचं प्रेम" हे रोजच्या आयुष्यात कामाला येणारं "बँक बॅलन्स" असतं...!!!
० तर "वडील" म्हणजे गरजेच्या वेळी मिळणारा तुमचा बोनस
किंवा "व्हेरिएबल पेमेंट" असतं...!!!
० "आई" म्हणजे, तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलचं "नेटवर्क" असतं...!!!
० आणि कधी "नेटवर्क" थकले;
तर "वडील" अर्जंट "SMS" असतं...!!!
० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "अँटीव्हायरस" असतं...!!!
० तर शोधून काढलेले व्हायरस संपवायचं "वडील"
crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
हे "क्वारनटाईन" बटण असतं...!!!
० "आई" म्हणजे तुमच्या
आयुष्यातलं "शिक्षणाचं विद्यापीठ" असतं...!!!
० तर "वडील" म्हणजे चालती बोलती अनुभवाची फॅकटरी असते...!!!
० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातली साठवलेली पुण्याई असते...!!!
० तर "वडील" म्हणजे कंबर कसून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते...!!!
० "आई" म्हणजे तुमच्या आयुष्यातला मागर्दशर्क गुरू असतो...!!!
० तर दाखवलेल्या वाटेवर "वडील" हा जवळचा मित्र असतो...!!!
० "आई" म्हणजे साक्षात भगवंत, परमेश्वर असतो...!!!
० तर त्या परमेश्वरापर्यंत पोचवणारा "वडील" एक संत असतो...!!!
० "आई" म्हणजे तुमचे शरीर, मेंदू, हृदय आणि मन असतं...!!!
० तर "वडील" म्हणजे भक्कम ठेवणारा पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं...!!!
० कधी वेदना झाल्यास तोंडी वाक्य "आई गं SSS" असतं...!!!
०आणि भले मोठे संकट आले की उच्चारात "बाप रे बाप" असतं...!!!
० परमेश्वर समोर आला तरी उभे राहायला वीट फेकलेल पुंडलिकाचं मन असतं...!!!
० त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं...!!!
म्हणूनच म्हणतो...
० परमेश्वर, अध्यात्म, भगवंत हे सगळे अजब गणित असतं...!!!
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं
०"आई- वडील" हे कनेक्शन असतं...!!!
० "आई- वडील" म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते...!!!
उगाचच नाही आपल्या संस्कृतीत
"मातृ देवो भव"अन् "पितृ देवो भव" असे म्हणलेलं आहे...🙏
आई - वडील असून सुद्धा जर ते आपल्या सोबत राहत नसतील तर या जगातील सर्वात महान सुखापासून तुम्ही वंचित आहात असे समजा !
खरंच आई वडिलांच्या सेवेसाठी कधीही नाही म्हणू नका कारण जग हे पाहतोय ते आई -वडिलामुळेच🙏
🌹 धन्यवाद 🌹
॥ संस्कार मिशन ॥
0 टिप्पण्या