crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
संकटाच्या प्रत्येक पैलूस स्पर्श करणारा
व वास्तव दर्शन घडवणारा...
पुन्हा पुन्हा वाचावसा वाटणारा मार्मिक लेख
"चला संकटभ्रमंती करूया..."
' आपल्या जीवनात संकट येऊच नये' असं
न वाटणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.
जीवनातील बऱ्याच प्रसंगी मनात येणारा हा विचार. साध्या साध्या गोष्टीनाही'संकट' हे लेबल लावणारी मंडळी आजूबाजूला खूप मिळतील..'संकट' यावर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा लेखनप्रपंच मांडावसा वाटला..
मग 'संकट' कशाला म्हणावं बरं?
'संकट'या शब्दाचा नेमका अर्थ तो कोणता?'
'संकट'या शब्दाचा नेमका अर्थ पुढिल उदाहरणातून अधिक चांगला समजू शकेल..एका घरालाअचानक आग लागली. मध्यरात्रीची ती वेळ.आगीचा तांडव वाढू लागला. घरातील माणसं जीव वाचवण्याच्या आकांतानं धावत होती.घरातील सर्व माणसे शर्थीच्या प्रयत्नाने आगीतून बाहेर पडली.. परंतु घरातील कारभाऱ्याला मात्र बाहेर पडण्यास यश येत नव्हते.. कारण डोक्यावरती आगीची लोट... पायावर अवजड कपाट पडलेलं..एक हात जळत्या लाकडाखाली.खऱ्या अर्थानं तो
संकटात होता..
"एक अशी परिस्थिती जिथ सर्व बाजूनी अडचणींचा हल्ला होतो नि हातपाय हलवणही कठिण होतं.मार्ग काढण तितकस सोपं नसतं तेव्हा त्या परिस्थितीला संकट म्हणावं.."
मागच्या फांदीवर मधमाशा नि समोरच्या फांदीवर साप अशी दुहेरी पेचाची अवस्था म्हणजे संकट.
मग आता विचार करा असे प्रसंग कितीवेळा आपल्या जीवनात आतापर्यंत आले आहेत.
फार तुरळक हेच बहुतेकांच उत्तर असावं. हो ना?.दुसरं म्हणजे आता हेही लक्षात आलं असेल कि आपण छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतो. साध्या अडचणींवरही 'संकट'हा शिक्कामोर्तब करण्याची घाईआपल्यापैकी बऱ्याच जणांकडून होते असं नाही वाटत?
"माझ्या आयुष्यात पावलोपावली संकट..संकट आणि मी हे समीकरण ठरलेलं..संकटामुळे मला काही करताच आलं नाही.."काही लोकांकडून वारंवार येणारी हि वाक्य. ज्याचा अनुभव तुम्ही कधी तरी घेतला असेल किंवा घेतही असाल.
'संकट'आल्यानंतर काय केलं जातं?
संकट आल्यावर बऱ्याचदा त्याचा सामना करण्याआधीच मैदानातून माघार घेतली जाते..
संकटांना तोंड न देता भेकडपणे
एक तर आयुष्य संपवने यासारखे विचार केले जातात किंवा संकटाचा बाऊ करून सहानुभूतीच्या पदराखाली स्वतः ला लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो.
मनात संकटाला फार मोठं केलं जातं कि त्यापुढे पर्यायाचे सर्व दरवाजे बंद झाल्याचं भासू लागतं आणि सर्वत्र अंधकार दिसू लागतो.
हा सर्व प्रकार म्हणजे आपणच आपलं आयुष्य बेचव करण्यासारखं आहे.
कारण कोणतच संकट कायमच नसतं..
ती येतात नि जातात.मात्र त्यामागची प्रतिक्रिया
खूप महत्त्वाची असते.
संकट आल्यावर नेमकं काय करावं?त्याचा सामना कसा करावा?
'संकट' मग ते लहान असो कि मोठं सर्वप्रथम
मनाचा तोल जाऊ न देता ,ढळू न देता काही काळ शांत राहावं..मनात संकट मोठं होण्याआधी संकटापेक्षा मोठं व्हावं म्हणजे त्याबद्दलची भीती नाहीशी होईल. आणि त्यामुळे मानसिकता चांगली राहण्यास मदत होईल.काही संकट तर अशी असतात कि तिथे काहीही न करता फक्त उभा राहणं,टिकून राहण आवश्यक असतं. ती झलक दाखवतात नि निघून जातात.. पण तेवढाही संयम काहीजनाकडून दाखवला जात नाही.असं म्हंटल जातं कि"There is no Problem
Which have no Solution.."
संकटकाळी मनाने जेवढं सक्षम राहू तेवढं हा खडतर वाटणारा मार्ग सुकर वाटू लागेल.
संकटकाळी हातपाय गाळायचे..रडत बसायचं..सहानुभूती मिळवायची यामुळे ते संकट दूर होणार आहे?नक्कीच नाही. उलट यावेळी त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधावेत.
धैर्याने येणाऱ्या संकटांचा सामना करता यावा. संकटांपासून पळ न काढता त्याचे हल्ले निर्भीड, निडर होऊन झेलने त्यासोबत दोन हात करण्याची हिम्मत देते...
येणाऱ्या प्रत्येक संकटास ठासून हेच सांगावं
"तू कितना भी बडा होकर आ
मेरा हौसला..मेरी हिम्मत
तुझसे भी ज्यादा बुलंद है
मुझे ना कोई रोक सकेगा
ना तोड सकेगा..ना तो मिटा सकेगा
अपना एक ही वसूल है
झुकेगा नही साला..."
आयुष्यात संकट येऊच नये..असं वाटनं
योग्य आहे की नाही?
आयुष्यात संकट येऊच नये हे वाटनं नक्कीच योग्य नाही..कारण
आयुष्यात संकटच नसतील तर काही काळ
छान वाटेल पण ठराविक कालावधीनंतर आयुष्य निरर्थक नि निर्जीव वाटू लागेल..
संकटाच्या विस्तवावर चालण्यामुळेच अनेक जण घडले मग ते आंबेडकर असोत कि आजच्या सिंधुताई.त्यांच्या समोर संकट उभा होत म्हणून तर त्यांनी क्रांती घडवली..
संकट.. संकटसमयी मिळणारी साथ.. त्यातून बाहेर पडण्याची धडपड..यातून जीवन जगण्याची कला अवगत होते..
म्हणून जीवनात संकटेआवश्यक आहेत..
काय पटतंय का??
संकटाभोवतीच्या या लेखन भ्रमंतीने तुम्हाला
संकटात तर टाकलं नाही ना??
आपलं मत जरूर कळवा... जास्तीत शेअर करा.. जेणेकरून बरेचजण हि 'संकट भ्रमंती'करू शकतील...
लेखक - सुरेश तळेकर....
ऑडिओ बुक - FMmarathi Inc©
crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
0 टिप्पण्या