#कोण_आहे_तिकडे...| भय कथा | Horror Audiostory free Marathi Audiobook







www.FMmarathi.in





style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">



 #कोण_आहे_तिकडे

रात्रीची वेळ आडगाव नावाच्या अनोळखी गावात निघालेले माने रस्ता चुकले.व्यवसायाने शिक्षक असलेल्या मानेंची त्या गावातील शाळेत बदली झाली होती.त्यांना तातडीने कामावर रूजू होण्याचा आदेश आला होते.मानेंनी रात्रीच निघण्याची तयारी केली‌.अवजड सामानाने भरलेल्या दोन बॅगेत त्यांचा सगळा संसार होता.मागील काही वर्षापासून ते एकटेच होते.त्यांच गाव दूर एका दुर्गम भागात होत.गावात थोडीफार शेती आणि त्यांच जुन घर होत.शेती पडीक असल्याने त्यात गवत वाढल होत.लोक तिथं आपली गुर चारायची.गावातील घर आता मोडकळीस आल होत.घराची देखभाल करणार तिथं कोणीच नव्हतं.आईवडील गेल्यापासून ते बंद होत.आईवडील गेल्यानंतर माने एकटे पडले होते.ते एकाजागी स्थिर सुध्दा नव्हते.त्यांची सतत बदली व्हायची‌.या गावातून त्या गावात ते नुसते फिरत राहायचे.माने सतत आनंदी राहायचा प्रयत्न करायचे.त्यांच्या स्वभावामुळे जिथे जाईल तिथे ते लोकप्रिय व्हायचे.


आडगावात जाण्यासाठी भल्या पहाटे एस.टी होती.त्यांनी अगोदर रिझर्व्हेशन केले होते.पहाटेच्या वेळी आपल्या अवजड सामानाने भरलेल्या बॅग घेऊन ते बाहेर पडले.शेजारी राहणारा त्यांचा एक विद्यार्थी गाडी घेऊन बाहेर उभा होता.कडाक्याच्या थंडीत एवढ्या पहाटेही जवळपास राहणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक निरोप द्यायला आले होते.न कळत मानेंचे डोळे पाणावले.ध्यानीमनी नसताना अचानक झालेल्या बदलीमुळे निरोप समारंभ ठेवता आला नव्हता.सरांची बदली झाल्याचे मुलांना रात्री उशीरा समजले होते.जमवलेल्या पैशातून आणलेले पेन आणि एक गुलाबाचे फुल त्यांनी सरांना दिले.मुलांनी दिलेली भेट घेऊन मानेंनी त्यांचा निरोप घेतला.माने गेल्यावर मुलं बराच वेळ तिथ उभी राहिली.विद्यार्थ्यांने आपल्या सरांना एस.टी डेपोत सोडले.सरांची एस.टी येईपर्यंत तो तिथेच थांबला.एस.टी आल्यावर विद्यार्थ्याच्या डोक्यावरुन हात फिरवत मानेंनी त्याचा निरोप घेतला.एस.टीत फारशी गर्दी नव्हती.मानेंची सीट शेवटून दुसरी खिडकी शेजारी होती.पंधरा मिनीटाने वाहक आला‌.सगळ्यांचे तिकीट तपासून त्याने डबल बेल वाजवली.गाडी सुटताच मानेंनी सीटवर मान टेकवली‌.रात्री झोप कसली ती झालीच नव्हती.सीटवर मान टेकवताच ते झोपी गेले.जाग आली तेव्हा सुर्य उगवला होता.गाडी एका स्थानकावर चहापाण्यासाठी थांबली होती.सर्व प्रवासी खाली उतरत होते.प्रवाशांची गर्दी आता वाढली होती.सर्व सीट आरक्षित होत्या.बहुतेक मधल्या एखाद्या स्टॉपवर ते बसले असावे...


"गाडी फक्त दहा मिनीट थांबणार आहे..."कंडक्टर एकच वाक्य वारंवार बोलत होता.मानेंना बराच आळस आला होता.खाली उतरुन त्यांनी तोंडावर पाणी मारले.गरम चहा पिल्यावर त्यांना तरतरी आली.ते पुन्हा एस.

टीत जाऊन बसले.आता त्यांना झोप येणे शक्य नव्हते.हळूहळू सगळे प्रवासी एस.टीत जमले.प्रवाशांची संख्या बरोबर आहे का तपासून कंडक्टरने डबल बेल वाजवली.त्या स्थानकावरुन पुढे गेल्यावर गाडी डोंगरी भागात आली.दूरपर्यंत डोंगर आणि लहान-मोठ्या टेकड्या दिसत होत्या.खालचा रस्ता लहान पण बऱ्यापैकी चांगला होता.या डोंगरी भागात छोटी छोटी गावं होती.गावात लहान मंदिर,घर आणि एखाद दुसरे दुकान सोडले तर काही नव्हत.गावातील लोकांकडे जनावरे भरपूर प्रमाणात होती.प्रत्येक घरासमोर जनावरांचे गोठे होते.डोंगरावर मेंढ्यांचे कळप,गाई,म्हशी चरताना दिसत होत्या.शहरापासून लांब एकांतात असणारी ती गाव मानेंना खुपचं आवडली.शहर ईथून बरंच लांब होत.एस.टी सोडली तर दुसरं वाहन रत्यावर दिसत नव्हती.


दुपारनंतर एस.टी पुन्हा एका स्थानकावर जेवणासाठी थांबली.दिवस मावळे पर्यंत आपण आडगावात पोहोचू असे मानेंना वाटले.दिवस मावळून अंधार झाला तरी ते गाव आले नाही.एस.टी खूप दुर्गम भागात आल्यासारखी वाटत होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी होती.काटेरी झाडाच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या होत्या‌.त्या गावाच्या नावाची पाटी कुठे दिसत नव्हती.बाकिचे प्रवासी वाटेत कुठे ना कुठे उतरले होते.आता पुढच्या सीटवर एक दोन प्रवासीच उरले होते.


कंडक्टरने मानेंना आवाज दिला.बहुतेक मानेंचा स्टॉप आला होता.आपल्या बॅग घेऊन माने पुढे गेले.ड्रायव्हरने एस.टी साईडला घेतली.माने खाली उतरल्यावर एस.टी धुरळा उडवत निघून गेली.एस.टी दूर गेल्यावर मानेंना तिथली शांतता जाणवली.एका दगडावर त्या गावाचे नाव आणि एक बाण दाखवला होता.गाव त्या रस्त्यापासून आत होते.समोर एक माळरान होते.तिथे तुरळक झाडी आणि गवत होते.एक बॅग पाठीवर आणि दुसरी हातात पकडून मानेंनी ते रान पार केदे.पुढे गर्द झाडींनी वेढलेली टेकडी होती.गाव त्या पलीकडे होते.टेकडीखाली असलेल्या बोर्डवर तसे लिहीले होते.ती टेकडी आडगावच्या हद्दीत येत होती.दिवस थंडीचे आणि त्यात अंधारही जास्त होता.आकाशात चंद्र,चांदण्या काही नव्हतेच.आजची रात्र अमावस्येची तर नसेल.विचार करत ते टेकडी चढू लागले.दाट झाडींमुळे तिथे भयंकर थंडी होती.अगदी रक्त गोठवणारी.त्यांच्या अंगावर फक्त एक साधा शर्ट होता.त्यांनी बॅगमधील चादर अंगाभोवती लपेटून घेतली.तरीही म्हणावी अशी ऊब मिळत नव्हती.शरीर थरथरत होते.दातांवर दात वाजत होते.हातपाय थंड पडत चालले होते.झाडीतून मार्ग काढत माने पुढे चालले होते.टेकडी लहान होती.पण तिचा विस्तार जरा मोठा होता.जेमतेम पस्तीस वय असलेल्या मानेंना पाच दहा मिनिटातच दम लागू लागला.बराच वेळ चालल्यावर आपण रस्ता चुकलोय हे त्यांना समजले.आजुबाजूला फक्त दाट झाडी होती.कितीतरी प्रकारची आंब्याची,चिंचेची वडाची,पिंपळाची...काहींची तर नावे सुध्दा त्यांना माहित नव्हती.माने फिरुन फिरुन एकाच जागी परत येत होते.ते प्रचंड थकले होते.दोन मिनीटे शांतपणे बसण्या योग्य जागा कुठे मिळत नव्हती.जमीनीवरच्या वाळलेल्या पालापाचोळ्यातून सळसळत जाणाऱ्या जीवांची त्यांना भीती वाटत होती...


आता काय करायचे हा विचार करत असताना त्यांना ढोलचा आवाज आला.तो आवाज दूर कुठूनतरी येत होता.कोणीतरी ढोल वाजवत होत.सगळा जीव एकवटून ढोलवर थाप मारत होत.एवढ्या रात्री कोण ढोल वाजवत असेल.तो ढोलचा आवाज त्यांना विचीत्र वाटत होता.त्या आवाजा सोबत प्रचंड गलका त्यांच्या कानावर पडत होता.बरीच लोक एकत्र रडत,विव्हळत होती.त्या आवाजाने मानेंच्या जीवाचा थरकाप उडाला.कोणीतरी सांगितलेली गोष्ट त्यांना आठवली.अमावस्येच्या मध्यरात्री वेताळाची पालखी निघते.त्यामध्ये सगळी भूतच असतात.जोरजोरात किंचाळत वाटेल येईल त्या माणसाला ती भूत आपल्यासोबत घेऊन जातात.कधीकाळी वाचलेल्या भुतांच्या गोष्टी त्यांना आठवू लागल्या.पिंपळाच्या झाडावर मुंजा राहतो.चिंचेच्या झाडावर हडळ...आता त्यांना झाडांचीही भीती वाटू लागली.तोच मानेंना ऊजेड दिसला आणि त्यांच्या जीवात जीव आला.काही अंतरावर एकामागोमाग एक माणसं शांतपणे चालली होती.सगळ्यात पुढे असणाऱ्या दोघांच्या हाती मशाल होती.माने पळतच तिकडे गेले.सगळ्यात मागे असणाऱ्या माणसाला त्यांनी गाठले.त्याला आपली अडचण सांगितली.ती लोक आडगावची होती.नुकताच एकाचा अंत्यविधी करुन ती परत चालली होती.गावची स्मशानभूमी टेकडीपलीकडे होती.दोन तीन गावात मिळून एकच स्मशान होते.ती लोक फार घाईत होती.सगळे झपझप पावल टाकीत निघाले होते.त्या माणसाने मानेंना आपल्या मागे यायला सांगितले.ढोलचा आवाज अजून थांबला नव्हता.


"एवढ्या रात्री हा ढोलचा आवाज कुठून येतोय?"मानेंनी विचारले.


"ते काही विचारु नका.आज अमावस्या आहे.लवकरात लवकर गावात पोहोचले पाहिजे...."त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला टाळत तो माणूस म्हणाला.


काही वेळातच सगळे गावात पोहोचले.त्या माणसाने मानेंना आपल्या घरी राहायला जागा दिली.घरात पाय ठेवण्यापुर्वी त्या माणसाने थंड पाण्याची बादली अंगावर ओतली.मानेंनाही तसे करायला सांगितले.एवढ्या थंडीतही मानेंनी थंड पाण्याची बादली अंगावर ओतून घेतली.त्याचे घर लहान होते.एकच लहान खोली होती.अंगण मात्र मोठे होते.त्यात गुरांचा गोठा होता.आपल्यामुळे यांना त्रास होऊ नये म्हणून माने गोठ्यातच झोपले.गोठा उबदार होता...त्याने मानेंना एक गोधडी दिल्याने थंडी वाजायचा प्रश्नच नव्हता...माने निवांत झोपी गेले.


सकाळी जाग आली तेव्हा ऊन बरच वर आल होत.त्या माणसाचे आभार मानून माने त्यांची राहायची सोय केलेल्या घराकडे निघाले.तो एक दुमजली वाडा होता.वाड्यात एक छोटे कुटुंब राहत होते.तो वाडा त्यांचाच होता.बाहेरुण वरच्या मजल्यावर खूप खिडक्या दिसत होत्या.दुसऱ्या मजल्यावर बऱ्याच खोल्या असणार होत्या...मानेंनी वाड्यात प्रवेश केला.मोठ्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर एक अंधार बोळ लागल.त्याच्यापुढे पडवी असल्याने प्रकाश होता.तिथे एक अगदीच वयस्क बाई भिंतीला पाठ टेकवून बसली होती.समोर तिची काठी पडली होती.तिचे वय बरेच होते...चेहऱ्यावर,हातावर सुरकुत्या पडल्या होत्या...एका डोळ्यात मोतीबिंदू होता.ती सोडली तर दुसर कोणी तिथे दिसत नव्हत...मानेंनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला...तिला माने घरात आलेले पाहुणे वाटले...

"कवाशीक आलास..."डोळे किलकिले करत ती म्हणाली आणि काठी हातात पकडूण उठण्याचा प्रयत्न करु लागली.माने तिला थांबवू लागले.पण तिला बहुतेक कमी ऐकू येत असावे.तिची एकटीची बडबड चालू होती.


"सदा गेलाय शेताकड..."काठीचा आधार घेत ती उभी राहिली.ती कमरेत वाकलेली आजी तुरुतुरु चालत पुढे जाऊ लागली...एका खोलीबाहेर उभी राहत तिने आवाज दिला...

"किसना एक किसना..."तसा खोलीतून दहा-बारा वर्षांचा एक मुलगा बाहेर आला...त्याच नाव‌ कृष्णा आजी त्याला किसना म्हणायची.तो बराच हुशार होता.त्याचे आई-वडील शेतात गेले होते.त्यांनी माने येणार असल्याचे कृष्णाला सांगितले होते.कृष्णा मानेंना वरच्या मजल्यावर जाणाऱ्या एका अंधाऱ्या जीन्याकडे घेऊन गेला.तो स्वतः मात्र वर गेला नाही.आजीने त्याला वर जाऊ दिले नाही.मानेंना वरच्या मजल्यावर ची एक खोली दिली होती.माने जीना चढून वर गेले.वरचा मजला वापरात नसल्याने सगळ्या खोल्यांना टाळे होते.त्यांना दिलेल्या खोलीची अवस्था वाईट होती.फरशीवर धूळ साचलेली,भिंतीवरच्या रंगाचे पापुद्रे खोलीभर पसरलेले.खोलीला चार लहान गज असलेली एक खिडकी होती.तिच्यातून भरपूर प्रकाश आत येत होता.खोलीला जोडूण असलेल्या एका रुमचा दरवाजा बंद होता.दरवाजाखाली मोठी फट होती...खोलीची अवस्था पाहुण माने एकटेच हसू लागले.त्यांना आपले जुने दिवस आठवले.प्रत्येक नवीन ठिकाणी त्यांना अशीच खोली मिळायची...

"सगळे आयुष्य यातच जाते कि काय..."स्वतःशीच बडबडत त्यांनी झाडू हाती घेतला‌.सफाई करणे गरजेचे होते.सुमारे तासाभरानंतर खोली राहण्या योग्य झाली.थकलेल्या मानेंनी जमीनीवर अंग टाकले.


त्यांना जाग आली ती कोणीतरी त्यांना आवाज देत होत.वाड्याचे मालक सदाशिवराव शेतातून परत आले होते.त्यांचा आवाज अगदीच अस्पष्ट येत होता.खाली येऊन माने त्यांच्याशी गप्पा मारु लागले.बोलण्यावरुन वाड्याचा मालक आणि त्याची बायको साधी वाटत होती.सदाशिवरावांकडे भरपूर शेती होती.तोच त्यांचा मुख्य व्यवसाय होता.एकूण चार जणांच कुटूंब होत.बघता बघता अंधार पडला.मानेंचे आजचे जेवण सदाशिवरावांकडे होते.गावाकडची लोक लवकर जेवण करुन झोपतात.जेवण ऊरकले तेव्हा नऊ वाजले होते.माने शतपावली करायला बाहेर गेले.बाहेरची शांतता आणि अंधार बघून परत माघारी वळाले.आपल्या खोलीत जाऊन नुसतेच पडूण राहिले.सोबत आणलेले पुस्तक वाचत असताना त्यांचा डोळा लागला....मध्यरात्रीची वेळ असावी.मानेंची झोप चाळवली.अर्धवट झोपेत आपल्या आसपास कोणीतरी सावकाश पाय घासत चालल्याचा भास त्यांना झाला...डोळ्यासमोर एक विचीत्र दृश्य आले...मानेंना आपले मृत आईवडील दिसले.त्यांच्या आसपास कधीही न पाहिलेली माणसं उभी होती...ती माणसं अगदी भेसूरपणे रडत होती...मधेच घशातून विचीत्र आवाज काढत होती.त्यांच्या डोळ्यातून काळे रक्त निघत होते.खाली मान घातलेला एक जण अगदी शांतपणे ढोल वाजवत होता.त्याचा चेहरा नीटसा दिसत नव्हता.दिसत नाही तेच बरे आहे.चेहरा बघण्यासारखा नक्कीच नसणार.समोर पांढऱ्या चादरीने झाकलेले प्रेत होते.अचानक सोसाट्याचा वारा सुटला...प्रेतावरची चादर बाजूला झाली.त्या पांढऱ्या चादरीखालचे प्रेत स्वत: मानेंचे होते.प्रेत पाहताच सगळे मोठ्याने रडू लागले.पण खाली मान घातलेला तो अजूनही शांतपणे ढोल वाजवत होता.एवढी भीती मानेंना आजपर्यंत कधी वाटली नव्हती.पांढरा शर्ट आणि सदरा घातलेला तो माणूस सामान्य खेडूत वाटत होता.डोक्यावरील पांढऱ्या टोपी खाली असलेला चेहरा का त्या लपवला होता‌.तो थोडा काळपट सुजलेला दिसत होता.पुढचे दात ओठांची सीमा ओलांडून बाहेर आले होते.त्याची मान,हात पायांचे तळवे सगळेच काळपट होते.त्यावर मोठमोठे केस होते...




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


"माने..."या आवाजासरशी ते दचकून उठले.काय होत ते...मृत आईवडील...ती माणसं...आता आलेला आवाज हा भास नक्कीच नव्हता.मानेंनी लक्ष देऊन ऐकलं तो ढोलचा आवाज अजूनही खोलीत घुमत होता.मानेंनी समोर पाहिल आणि त्यांची किंकाळी घशातच अडकली...


क्रमश...

#अमित राऊत..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या