autoplay="autoplay"
src="https://drive.google.com/uc?export=download&id=1NLP2BD6Oerw5pdghrzVSxKvyqMRK5Ukz">Your browser does not support the
audio
element.crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
स्वित्झर्लंडमधल्या Zurich मध्ये जगामधल्या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होत. जगातले उत्तोमोत्तम किल्ले तिथे मांडण्यात आले होते, इजिप्तचे, ग्रीसचे, रोमचे, रशियाचे, चीनचे, जपानचे आणि जगभरातल्या गडकोटांमध्ये सर्व जगात सर्वोत्तम ठरला तो माझ्या महाराजांचा राजगड. शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते तेव्हा राजगड बांधायला सुरवात केली आणि शिवराय २६ वर्षाचे झाले तेव्हा राजगड बांधून पुरा झाला. जगभरातल्या अभियंत्यांनी शिवाजी महाराज या अभियंत्याला मुजरा केला.
रायगडावर नगारखानाच्या खाली कितीही हळू आवाजात बोललो तरी सिंहासनाजवळ आजही स्पष्ट ऐकू येत. ध्वनी क्षेपकाचा शोध लागण्यापूर्वी ध्वनी क्षेपकाशिवाय ऐकू येण्याची ही तंत्रप्रणाली शिवाजी महाराजांनी रायगडावर निर्माण केली. आता..आज.. आमच्याकडे ग्राम स्वछता अभियाने आली रायगडावर आणि कुठल्याही किल्ल्यावर साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी बांधलेली शौचालयं, बंधिस्त गटार योजना आजही आम्हाला विस्मय चकित करते. झाडं लावा झाडं जगवा आज आम्ही सांगतो. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज ज्या गडावर गेले त्या गडावर आंब्याची बाग लावली, ज्या किल्ल्यांवर गेले तिथे वनराई फुलवली. काही वर्षांपूर्वी राजमाचीचं काम चालू होतं. साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला अँटीचेंबर्स राजमाचीच्या खाली सापडला. हि अँटीचेंबर्स संकल्पना आत्ताची, महाराजांनी त्यावेळी अस्तित्वात आणली. महाराजांनी या गडकोटांच्या आधारावरच असे कैक वैज्ञानिक दृष्टिकोन नवे निर्माण केले. आपल्या हालचालींची आपल्या लोकांना माहिती देता यावी यासाठी शिवाजी महाराजांनी या गडकोटांचाच उपयोग केला. कुठलं लाकूड जाळल्यावर काळा धूर येतो, कुठला लाकूड जाळल्यावर पांढरा धूर येतो यावर संकेत ठरायचे शिवाजी महाराजांचे. तानाजी कोंढाणा घ्यायला गेला , कोंढाणा जिंकला आणि कोंढाणा जिंकण्याची बातमी कळावी म्हणून मावळ्यांनी गवताच्या गंजी पेटवल्या, पांढरा धूर अस्मानात भिडला आणि तो पांढरा धूर महाराजांनी राजगडावर बघताच महाराज कडाडले " गड फते " म्हणजे पांढरा धूर हे विजयाच्या संकेताची खूण आहे. एखादी अशुभ बातमी असेल काळा धूर केला जायचा, तो रायगडावर केला जायचा, रायगडावरचा काळा धूर राजगडावर दिसायचा, राजगडावरचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा प्रतापगडावरचा काळा धूर पाटणच्या दाते गडावर दिसायचा, पाटणच्या दाते गडावरचा काळा धूर पन्हाळ्यावर दिसायचा. पन्हाळ्याच्या काळा धूर सामान गडावर दिसायचा, सामान गडावरचा काळा धूर रांगण्यावर दिसायचा. महाराष्ट्रातल्या ३६० किल्ल्यांवर एका तासाच्या आत मेसेज पोहचायचचा काय झालय. हे सगळं साडेतीनशे वर्षांपूर्वी. शिवाजी महाराजांनी गडकोटांवरून तर निर्माण केलं. एखादा गड एखादा दुर्ग म्हणजे कोणी स्थापत्य कलेचा उत्तम नमुना तर उंचीने इतका मोठा कि आभाळाच्या कुशीत घुसलेला. कुणी यशवंत गडासारखा तोफांशी मारा करण्याची अद्भुत क्षमता लाभलेला, कुणाला निसर्गाचं बेलाग संरक्षण तर कोणाच्या उरात निखळ पाण्याचे झरे, हे सारच अद्भुत. या गडकोटांचे तट, द्वारं, महाद्वारं, जंग्या, या गडकोटांवर जाण्याचे मार्गही बिकट, दुश्मनांची कोंडी करण्याची त्यांची अद्भुत रचना, गडावरील तळी, टाकी...
शिवाजी महाराजांनी रायगडावर गंगासागर नावाचा तलाव निर्माण केला. १९७२ च्या दुष्काळात महाराष्ट्रातील सगळ्या विहरी कोरड्या पडल्या पण रायगडावरच्या गंगासागर तलावात मात्र तुडुंब पाणी होत. ती शिवकालीन पाणी योजना दिसते ना ती या गडावरच, या गडावरचा अंबरखाना, आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आमचं धान्य किडतंच. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी अंबारखाने असे तयार केलेत, ते धान्यगृह असं तयार केलय कि तिथे किडी मुंगीचा प्रादुर्भाव होतच नव्हता. उंदीर कीड वाळवी त्याला लागतच नव्हती, नव्हताच कसला उपद्रव. या गडकोटांवर बांधलेले दारुखाने, खजिना, खलबत खाना, पीलखाना, उष्टरखाना, दफ्तारखाना, तटबंधी, चिल्कत, मेठ, माची, बालेकिल्ला, बघत राहावं विस्मयचकित व्हावं आश्चर्यचकित व्हावं असं असं अगदी. या साऱ्या डोंगररांगांवरचे हे दुर्ग एकमेकांशी बांधले गेलेत ते राष्ट्रनिष्ठेने, राष्ट्रभक्तीनं प्रत्येक गडकोट म्हणजे राष्ट्राचं धगधगतं चैतन्य. हे गडकोट स्वराज्याचे, महाराजांचे, मावळ्यांचे काही शतकानु-शतकांपासून खडे असलेले, काळाचा प्रचंड गाभारा आपल्या उरात साठवलेले. ऋतू मागून ऋतू गेले, दिवसांमागुन दिवस गेले ऊन वारा पाऊस वीज यांचा माराच न्हवे तर दुश्मनांच्या वारानाही वर्षानुवर्षे झेलत असलेले हे गडकोट काळाच्या त्या साऱ्या खुणा अंगावर वागवत ते अजूनही भक्कमपणे खडे आहेत. उद्याच्या काळाशी टक्कर द्यायला. पण तीनशे वर्षांपूर्वी यांच्या अंगाखांद्यावर माणसांची दाटी असायची, पाखरं भिरभिरावी तशी माणसं भिरभिरायची. अनेक घटना प्रसंग, युद्ध, राजकारण, राजनीती, कूटनीती, चाली, प्रति चाली, कायदे, नियम, फैसले, हे सारं यांच्या कुशीतूनच तर चालायचं, साऱ्या साऱ्या घटनांचे हे केंद्रस्थान,मध्यवर्ती ठिकाण, जणू मुक साक्षीदारच. शिवरायांच्या शंभूराजांच्या पराक्रम गाथा यांच्या अंगाखांद्यावरच तर घडल्या. त्यांचे बोल त्यांनी ऐकलेले , त्यांचा सहज स्पर्श त्यांनी अनुभवलेला. घोड्यांच्या टापा त्यांच्या खिंकाळन्याची सवय. हर हर महादेव च्या किलकाऱ्या, जय भवानीचा जागर आणि आक्रमकांची दीन दीन एल्गार आणि आरोळी, आक्रोश, किंकाळ्या, युद्धाची रणशिंगे, दुमदुमलेल्या गर्जना आणि मावळ्यांचा आनंद, तो उत्साह सारं सारं या गडकोटांनी अनुभवलंय न्हवे..... हे सारं जगलेत ते, केवढं सारं आठवणींचं भांडार असेल त्यांच्या उरात ?
🚩 *जय शिवराय* 🚩
*🚩गर्जा महाराष्ट्र माझा!!🚩*
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
0 टिप्पण्या