माझी लाडकी मनू ... Mazi ladki Manu | short Audio story

 






www.FMmarathi.in




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


एक अनुभव

माझी लाडकी मनू

         तशी माझी नी तिची भेट माझ्या सहकारी शिक्षिका यांच्या मुलाच्या मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या लग्नात वाशेरे, तालुका अकोले येथे झालेली.लग्न समारंभ आटोपला नी आम्ही सर्व जेवायला बसलो.तेव्हा आमच्या समोर दोन छोट्या इटुकल्या पिटुकल्या मुली त्यांचा छोटा भाऊ ,आई आणि आजी जेवायला बसले होते.ती छोटी इटुकली माऊ माझ्याकडे पाहून लाजून मारून मटकून जेवत होती .तिला तिच्या आजीने सांगितले होते की तुला शाळेत जायचे आहे ना?मग बघ तुला पहिलीला ह्या मॅडम आहेत बरका. तेव्हापासून ती सारखी माझ्याकडे बघून हसून लाजून पळायची. मलाही जरा गंमत वाटली जेवण आटोपल्यानंतर मला रहावले नाही. तिच्याजवळ जाऊन तिला कुशीत घेऊन विचारले तुझं नाव काय आहे बाळा?तिची छोटी बहिण बोलली ती ना मनी आहे. पण तिची आई बोलली तिचे नाव कार्तिकी बनकर आहे अशाच खूप गप्पा मारल्या आणि काही दिवसांनी तिचा फॉर्म मी घरी जाऊन भरला.तिला माझ्याबद्दल खूप लळा लागला. तेव्हा मी त्यांना बोलले ही अशी का चालते. त्यांच्या घरी गेल्यावर तिच्या आईने तिची घडलेली कहाणी सांगितली कमी भाड्याच्या खोलीत ते राहत होते.वाहनांची सतत वर्दळ असलेल्या वस्तीत त्यांचे घर होते. पायाचे स्नायू हवे तेवढे परिपक्व नसल्याने चालण्यात असमतोलपणा जाणवत होता मनीचा..तेव्हा त्यांना मी विचारले काय झाले आणि कसे तर त्या बोलल्या ही तीन वेळा कोमात जाऊन आलेली,अर्थात ती यमराज रिटर्न होती पुढील आयुष्य तिला बोनस म्हणून मिळालेले... हो असेच समजा तीन वेळा गाडीसमोर आल्याने अपघात झालेला म्हणून तिची तबियत अशी आहे. काय करणार गरिबीला लाज नसते कुठं खर्च करणार एवढा.... 

         मे महिन्याची सुट्टी संपली आणि शाळा सुरु झाली शाळेच्या पहिल्याच दिवशी मनी गेट मधून डुलत डुलत शाळेत येत होती तिला पाहताच क्षणी आम्हां दोघींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले .तिला मी फक्त वर्ग दाखवून ऑफिस मध्ये गेले कारण आज सर्व मुलांचा शाळेचा पहिला दिवस होता जास्त कोणाचा परिचय नसल्याने मी मनीशी कोणाशी ओळख करून दिली नाही. बेल झाली परिपाठ होऊन सर्व मुलं वर्गात गेली मी ही वर्गात गेले सर्वांनी नमस्ते मॅडम म्हणून स्वागत केले. सर्वांचा ओळख मी सांगायला लावली सर्वजण मुक्तपणे बोलू लागली मनी आपली पुढे येऊन बोटं दातात चावून आळे, पिळे देत मनी बोलली

थोडीशी अबनॉर्मल दिसल्याने मी पहिल्याच दिवशी मनीबद्दल सर्व मुलांना सांगितले.आणि त्यादिवशीपासून ती सर्वांच्या गळ्यातील ताईत झाली. ती गाणी कृतीयुक्त छान म्हणायची पण पेन्सिलीने तिला लिहिण्यास येत नव्हते .दोन चार दिवसांनी तिच्या आवड,कला,कल लक्षात घेऊन माझ्या टेबल शेजारी तिचा बेंच टाकला.तिला व दोन बाकीच्या मुलांना मी शालेय साहित्य देऊन रेषा/रेघा मारणे मुळाक्षरे ,अंक , इंग्रजी मुळाक्षरे असा थोडा थोडा सराव सुरु केला तिच्या मुडनुसार तिला अभ्यास मी देत असे. तिच्यासाठी आम्ही दोघी खाली बसू लागलो ..तिच्या हातात हात धरून बोटाने गिरवून तिला सुरुवातीला अंक शिकविले तिला खूप गंमत वाटू लागली.. रोज तिला मी काही न काही देत असे चॉकलेट,पेन्सिल वही,कंपास रबर त्यामुळे ती उत्साहाने लिहू,वाचू लागली तिला पाहून कोणी असे म्हणणार नाही की ही सात वर्षाची आहे वर्गात सर्वात मोठी वयाने तिचं होती. थोडी कुपोषित असल्याने स्थूल होती..माझ्या वर्गासमोर जिना असल्याने चढताना -उतरताना सर्व विद्यार्थी काळजी घ्यायचे एक एक जण तिला जिना चढ उतरताना मदत करी.दोन-तीन महिन्याच्या सरावाने ती साधारण आता चालू लागली.आणि ती म्हणायची पण बगा मॅलम मी कशी चालते हा हां... बोलण्यात तिची एक लकब होती मला खूप खूप आवडायचे तिचे बोलणे आमच्या स्टाफमध्ये पण सर्व चिडवू लागले मॅडम आली तुमची लाडकी मनी माऊ.. माझ्या वर्गातील सर्वेश नाईकवाडी अतिशय हुशार विद्यार्थी मी जेवढी काळजी मनीची करायचे तो पण तेवढीच काळजी घेत असे. ती जिण्यावरुन पडू नये म्हणून तो रोज डब्यात खिचडी आणून देत असे.तिची आई रोज डबा देत नव्हती त्याची अनेक कारणे न सांगितलेलेच बरी. मात्र त्यांच्या घरी शुक्रवारी किंवा बुधवारी दुपारी मटणाचे जेवण असायचे.तेव्हा ती आल्याबरोबर मला सांगायची मॅलम मी ना दुपारी मटाण खायला जाणार तेव्हा, पोरं खूप हसायची .मी येऊ का म्हटले तर हात माझा घेऊन ओढायची खूप गमतीशीर आणि माझं लाडकं व्यक्तिमत्व होते ती. माझ्यामुळे तिच्यात आमूलाग्र बदल झाला हे तिच्या घरातील सर्व येऊन सांगत होती.ते म्हणायचे आम्हांला या पोरीची गॅरंटीच नव्हती ती शाळेत बसेल.पण शाळेतून घरी आल्यावर सारखं तुमचं नाव सारखं घेत असते आणि दप्तर घेऊन सारखी लिहीत बसते.माझ्या सय्यद मॅडमनी लिव्हायला सांगितले. ती जर एकही दिवस शाळेत आली नाही तर कधी तिला घ्यायला मी ,तर कधी मुलं तिच्या घर जवळ असल्याने घरी जायची.म्हणजे तिची इतकी सवय झाली होती की, ती नसली की जसे जेवणात मीठ नसल्यावर जेवण आळणी होते तसेच वर्गात तिचे महत्व होते .मात्र अचानक पहिलीच्या सरत्या वर्षी त्यांचे सर्व कुटुंब त्यांच्या औरंगाबाद गावी परतले. जेव्हा आम्हां सर्वांना समजले तेव्हा भयाण शांतता वर्गात झाली पहिलीच वर्ग असून सर्व चिडीचूप झाली.मी मुलांना म्हणाले आपली लाडकी मनी गेली आपल्याला सोडून औरंगाबादला. आता परत येणार नाही. वर्गातील सर्व तिची आजही आठवण काढतात. अधून मधून तिला फोन करत असते मी तेव्हा ती बोलते मला यायचे आहे अकोल्याला, पण पप्पा येऊ देत नाही. तिकडे ती शाळेत जाते याचे मला आजही समाधान आहे .असे अनेक प्रसंग 22 वर्षातील काळात मला आलेले .आणि मनाला स्पर्शून गेलेले आजही स्मरणात आहे. काही आठवणी किती गोड आणि सुखद असतात. ज्या आयुष्यभर लक्षात राहतात.त्यातील हा एक माझा अनुभव.

       तिचे ते बदकासारखे चालणे,बोबडे बोलणे, अचानक लाजाळू होणे,मिटूमीटू खाणे डोळ्यासमोरून प्रतिमा हटता हटत नाही .मी एक ज्योती गांगुर्डे नावाची मुलगी इयत्ता तिसरीपासून उच्च शिक्षणापर्यंत दत्तक म्हणून घेतली आहे.मनीच्या आईलाही मी सांगितले होते हिचा सर्व खर्च मी करेन जोपर्यंत शिक्षण घेईल तोपर्यंत. पण ती मधेच गाव सोडून गेली मला मुलींची आवड असल्याने मी आजही तिला खूप खूप मिस करते तिचे आवडते गाणे कानात आजही गुणगुणते-----

*पाऊश पडतो शर शर शर*

*घली चला रे भल भल भल*

*पाऊश वाजे धडम धुदुम*

*धावा धावा ठोका धूम*


सौ दिलशाद यासीन सय्यद,अकोले,अहमदनगर

9850923961

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या