autoplay="autoplay"
src="https://drive.google.com/uc?export=download&id=1N8HeT2-v9cA67Ee9W3SWSLmHNY-9n75x">Your browser does not support the
audio
element.crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
© मंजिरी पाठक
टॉप कॉलेज मधून MBA झालेली ती, लग्नानंतर नोकरी किंवा फॅमिली business जॉईन करायची इच्छा बोलून दाखवली तिने त्याला, त्यावरचं त्याचं उत्तर तिला दुखावून गेलं- तुम्ही बायका असतात इमोशनल, तुमची सगळी अक्कल गुडघ्यात, multitasking जमणार आहे की तुला? उगाच एक ना धड भराभर चिंध्या अस होईल, एकाच वेळी तुला सांभाळता येनार आहे का घर आणि नोकरी/business, आले-गेले पाहुणे, सणवार. त्यापेक्षा घरी राहून घराकडे लक्ष दे, आई बाबांचं बघ काय हवं ते..
नात टिकाव म्हणून तिने वाद ना घालता त्याच म्हणणं स्वीकारलं..
आज 10 वर्षांनी तो कोमातून बाहेर आला होता, 10 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातातून कसाबसा बचावला पण मेंदूला मार लागल्यामुळे तो कोमात गेला.. आज 10 वर्षांनी त्याने पाहिलं काय तर-- त्याचे आई-वडील एकदम टूकटुकित, तीच आणि त्यांचं नात सून आणि सासू- सासरे याच्या पलीकडे जाऊन मुलगी- आणि आई वडील अस झालं होतं. त्याचा ज्वेलरी designing चा फॅमिली business आज कुठल्या कुठे पोचला होता, अगदी परदेशातून ऑर्डर होत्याच, पण वेगवेगळ्या फिल्म्स फेस्टिवल च्या शूटिंग साठी खास ऑर्डर होत्या त्यांच्या कडे, वर्षानुवर्षे तोंड न पाहणारे, दुखावून दूर गेलेले नातेवाईक आज परत एकत्र get-together करत होते.. तिने सतत पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र आणलं होतं.. आणि सर्वात महत्त्वाचं जे ऐकून त्याचा इगो गळून पडला ते म्हणजे जेंव्हा डॉक्टर म्हणाले lucky आहात अशी कर्तबगार बायको तुम्हाला मिळाली, तिच्या न थकता, हार ना मानता अविरत केलेल्या प्रयत्नांमुळे आज तुम्ही कोमातून बाहेर आलात..
तेवढ्यात ती दारातून आत आली, तिच्याकडे पाहत त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले, म्हणाला माफ कर मला, कळत नकळत खूप अपमान केला मी तुझा, पण तू मला समजून घेतलंस, आज मला हे या अपघाताच्या निमित्ताने realization करून दिल.. तिने हसत त्याला जवळ घेतलं आणि त्याला छातीशी धरून त्याला थोपटू लागली, प्रेयसी-बायको बरोबर आज ती त्याची आईही झाली होती.
तळटीप- कधीही अगदी नकळत सुद्धा तुमच्या आयुष्यातील स्त्रीयांना कमी लेखू नका.. कारण वेळ आली तर त्या हव्या त्या आव्हानाला सामोर जाऊन यश खेचून आणू शकतात.. स्त्री शक्तीला कृपया कमी लेखू नका.
© Manjiri Pathak
0 टिप्पण्या