🙋🏻♀️🙋🏻♂️
*अन्न जपावे*
*विटण्याआधी*
*नाते जपावे*
*तुटण्याआधी*
*शब्द जपावा*
*बोलण्याआधी*
*अर्थ जपावा*
*मांडण्याआधी*
*रंग जपावे*
*उडण्याआधी*
*मन जपावे*
*मोडण्याआधी*
*वार जपावा*
*जखमेआधी*
*अश्रू जपावे*
*हसण्याआधी*
*श्वास जपावा*
*पळण्याआधी*
*वस्त्र जपावे*
*मळण्याआधी*
*द्रव्य जपावे*
*सांडण्याआधी*
*हात जपावे*
*देण्यासाठी*
*भेद जपावा*
*खुलण्याआधी*
*राग जपावा*
*भांडणाआधी*
*मित्र जपावा*
*रुसण्याआधी*
*मैत्री जपावी*
*तुटण्याआधी!*
🤷♂️
सोमव्रत मी😊
0 टिप्पण्या