निर्णय... मराठी कविता | Darshana kulkarni Nirnay motivational poem mp3

 Poem : निर्णय














style="display:block; text-align:center;"

data-ad-layout="in-article"

data-ad-format="fluid"

data-ad-client="ca-pub-7384059194066495"

data-ad-slot="7297264882">










ठेच लागली तर 

सावर स्वतःला.

वाट भरकटली तर

आवर स्वतःला.

.

नविन निर्णय घेताना

तू नेहमीचं का अडतो?

लोकं काय म्हणतील याचा

तुला का फरक पडतो?

.

बोलणाऱ्यांच काय आहे

ते तर बोलतच राहणार.

त्यांची कामगिरी ते 

चोख बजावणार.

.

टिका होणार

पाय खेचले जाणार.

तुझ्या संघर्षाची जाणीव

इतरांना नाही होणार.

.

तुझ्या विचारांची प्रगल्भता

तुझ्या कृतीतून दिसु दे.

नाठाळांच्या नादी लागण्यात

अर्थ नाही हे लक्षात असू दे.

.

काय चुक, काय बरोबर

ही निवड तुझी असू दे.

बाकी तू तुझ आयुष्य

पुरेपूर जगुन घे.


- दर्शना कुलकर्णी pune

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या