देहाचे आवरण गळूनिया गेले
मोकळे आकाश झाले
स्वरूपाचे गाव कळले
भरुनी अवकाशी
बाह्यांतर व्यापले
कणाकणांतून उरले
स्वरूपाचे रूप कळले
सोहंम् सोहंम् नादातूनिया
विश्व सारे डोलले
स्वरूपाचे गान आता
स्वरूपी कळले
अंतर्बाह्य शीतल
तेजाने उजळले
सोहंम् सोहंम् गाता गाता
रूप गावी ठाकले
#downloadabhang #marathiaabhang #अभंग #मराठीगाने #mp3abhang
0 टिप्पण्या