°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
१) समयसूचकता चांगलीच -
एकदा बिभिषण दारात रांगोळीवर "राम"हे नाव काढतोय,हे ऐकून रावण रागावुन त्याला हजर करण्याचा हुकूम करतो. तेव्हा बिभिषण रावणास नम्रपणे म्हणाला :"मी दादा आणि वहीनींचे नांव काढतो आहे. रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी"...रावण खुश !
२) आयुष्यात आपल्याला सर्व धडे काही पुस्तकातूनच मिळतात असे नाही. काही महत्त्वाचे धडे आपल्याला काही नाती व व्यक्तींकडून सुद्धा मिळतात पुस्तकातून मिळणाऱ्या धड्यांची परीक्षा एकदाच होते पण ह्या बाहेरून मिळणाऱ्या धड्यांची परीक्षा आयुष्य भर रोजच होत असते.....!
३) आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरविते. आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरविते. पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवितो. अहो दिवा विझण्यासाठी दर वेळी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यात सुद्धा तेल कमी असू शकते ना.....!
४) आयुष्यात जोपर्यंत स्वतः वर परिस्थिती येत नाही तोवर माणसाला अनुभव येत नाही. सुख पाहून दिसते, आनंद देते पण दुःख हे अनुभव घेऊनच कळते. अहो ठेच माणसाला पडण्यासाठी नसते तर सांभाळून चालण्यासाठीच लागते....!
५) आपले कान व डोळे चार बोटाचे अंतर आहे हेच नेहमी सत्य व असत्या मधील अंतर आहे. पण आजकाल सत्या पेक्षा असत्यच पटकन स्वीकारले जाते. पोटात गेलेले विष बाहेर काढता येते पण कानात ओतलेले विष नाही निघत. असत्य काही काळ सत्य दाबुन ठेवेल पण सत्याच्या मग पुढे आलेल्या रूपाने असत्य नेस्तनाबूत होऊन जाते. अहो हरवलेले परत मिळते पण जे बदलले आहे ते नाही.....!
६) आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा... तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं ते, आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं ते...!
७) आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा असतो. गुंता जर झाला तर तो हळूहळू खूप संयमाने सोडवावा लागतो मग तो दोऱ्याचा असो वा आपल्या मनातील विचारांचा....! संयम नसेल तर मग दोराही तुटतो आणि आपणही. अहो संयमा अभावी आयुष्यातअनेक नाती तुटून जातात.
८) आयुष्यात जो काम करतो त्याच्याकडूनच चुका होतात. मात्र काही जणांचे आयुष्यच दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच जाते. लक्षात ठेवा तुमचे डोळे तेच लोक उघडतात ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो. आपली सगळी ताकद परकीयांपेक्षा स्वकीयांशी लढण्यातच जास्त खर्च होते.....!
९) आयुष्यात प्रत्येक जण सुखाच्या किल्लीच्या शोधात आहे. प्रश्न असा आहे की अहो सुखाला कुलूप लावलेच कुणी....? कुणाला तरी हारविणे सोपे असते पण कुणासाठी हरणे खूप अवघड असते. अहो अहंकारच सर्व अनर्थाचे मूळ आहे......!
१०) आयुष्यात सर्वगुणसंपन्न म्हणाले तर कोणी नसते. पण प्रत्येकात एक तरी गुण चांगला असतोच. मधमाशी जसे काटे सोडून फुलातील मकरंद घेते तसे आपणही करावे. अहो सगळा मानण्याचा खेळ असतो. दिव्याचा प्रकाश पहायचा की दिव्याखालील अंधार हा प्रत्येकाचा दृष्टिकोन राहतो......!
♣️♣️♣️♣️♣️♣️♣️
0 टिप्पण्या