विशेष लेख : छ.शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळणारे जिवन मंञ.. Audiostory in mp3

वीर शिवाजी
छोटीसी फौज लेकर स्वराज्य स्थापन करणे ओ भीड चुका था मुगलों से
 क्या कारण था
 सिर्फ् और सिर्फ अन्याय, गुलामी से मुक्त करणेे धरती और लोगोंको

 मित्रांनो 
कधी विचार करून पाहिला आहे का छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या हिंदू धर्माचा काय झालं असतं हे तुम्ही सर्वच जाणता...
(साधा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो) 

मित्रांनो तुम्ही काय म्हणता मला माहित नाही पण स्वराज्य निर्माण झालं हे फक्त आणि फक्त माँ जिजाऊ च्या शिक्षणामुळे तिच्या मेहनतीने तिने केलेल्या दगडी मनामुळे तिने केलेल्या त्यागामुळे/बलिदानामुळेच, 

तुम्ही म्हणाल हे कसं! हो मी अगदी बरोबर बोलतो आहे तर ऐका त्यावेळी मोगलांशी शत्रूत्व म्हणजे हातानेच आपल्या खून करून घेणे होते, हे माहीत असताना देखील जिजाऊने त्या माऊलीने स्वतः चा पुत्र स्वराज्याची निर्मिती साठी मातृभूमीला अर्पिला आणि तीच त्याच्या पहिली गुरु बनली .. . 

तो शिक्षण घेताना,प्रशिक्षण घेताना अनेक वेळेस निराश झाला, हरला, पडला परंतु माँ जिजाऊ ने त्या छ्याव्यास अनेक महापुरुषांच्या ,देवतांच्या ,विरांच्या शौर्याच्या/पराक्रमाच्या कथा सांगून त्यास परत परत प्रेरित केले आणि पुन्हा उठून लढण्यास तयार केले... 

 मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे ,लोखंडाचा अवजार होण्यासाठी त्याला आधी गरम आगीत ते तापवावे लागतं,आणि मग त्यावर घावावर घाव घालून त्याचे धारदार शस्त्र तयार होते. 

 हे त्या मा जिजाऊ ला माहित होते, 

आज मी महाराजांच्या जीवनावर खोल अभ्यास करून काही जगण्याची आणि जीवनातील जिवन मंत्र खाली संग्रहित करत आहे....

(याचा पूर्ण अभ्यास करा आणि हे इतरांना नक्की शेअर करा) 

  1. बालपण :- बालपण जिवनात खूप महत्त्वाचे आहे, हे वय खूपच चंचल असते आणि आपण जे काही शिकतो ते आपल्या कायम लक्षात राहते.       
  2. शिक्षण आणि संस्कार :- मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे शिक्षण आणि संस्कार 
  3. मानवी वृत्ती : देवाने प्रत्येक माणूसच वेगळा तयार केला आहे, प्रतेकाचे व्यक्तीमत्व वेगळे आहे. त्यासाठी प्रत्येक जीवाचा आणि मानवाचा आदर करा आणि प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करा.
  4. सुरूवात महत्त्वाचे :- गोष्ट मोठी असो वा लहान प्रथमतः तीची सुरूवात कशी झाली आणि कोणी केली याला खूप महत्त्व आहे.  आणि मुख्यता सुरुवात करण्याला महत्त्व आहे. 
  5. अद्ययावत राहणे :- जिवनात प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक दिवशी  एकच गोष्ट करत बसण्यापेक्षा, कधी तरी नवीन शिकण्याची भूक माणसाला असायलाच हवी.  आणि माणसांनी काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून द्यायला हवेच
  6. चौकस आणि प्रयोगशील :- माणसाने प्रत्येक नविन गोष्टींची चौकशी केली पाहिजे , जी गोष्ट आपल्या ला आवडते किंवा ना आवडते तीचा एकदा जिवनात प्रयोग करून नक्की पाहिले पाहिजे. 
  7. योग्य निर्णय आणि नियोजन :- निर्णय जर योग्य नसेल तर त्याचे परिणाम हे खूपच हानिकारक असतात यासाठी निर्णय हा योग्य वेळ योग्य विचार करूनच ठरवावा. 
  8. भविष्य तयार करणे आणि जगणे :- जगातील एखाद्यी अवघड गोष्ट आणि अशक्य गोष्ट ते पहिले स्वप्नच असते, त्यासाठी स्वप्न पहा आणि स्वप्न पूर्ण करा.
  9. ठेच/चूक आणि शिक्षण :-  माझ्यामध्ये आयुष्यातील सर्वात गुरु कोण असेल तर ती आपली चूक आणि आपल्याला लागलेली ठेच होय , कारण हेच की आपल्याला शिकवतात तितका आपल्याला कोणी शिकवत नाही.  आणि ह्या गुरूपासून मिळालेला धडा आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करत राहतो. 
  10. दोन पर्याय :- आयुष्य फार मायावी आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी पावलोपावली प्रत्येक गोष्टीला दोन भागांनी दोन रूपांनी एका चांगल्या आणि एका वाईट रुपाने आपल्या समोर मांडतो त्यातील आपल्याला सांगते बाजू ओळखता आली पाहिजे नाही आणि तिचा योग्य वेळी योग्य वापर करता आला पाहिजे
______________________________________
लेखक : अर्जुन अप्पाराव जाधव   
मु.नंदनशिवनी ता.कंधार जि.नांदेड
         



विविध डिझाइनची छ.शिवाजी महाराजांची फोटो असलेली

•••Mobile Cover नक्की पहा आणि खरेदी करा•••







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या