—————-
मलेशियातून परततांना मी मौल्यवान म्हणून खरेदी केलेली एकच वस्तू ती म्हणजे बिली लिन या मलेशियन लेखकाचं 'डेअर टू फेल' म्हणजे 'अपेशी होण्याचं धाडस करा !’
हे आग्रही पुस्तक ! यशाचं कौतुक करणारी अगणित पुस्तकं असता अपयशाची भलावणकरणारी ही अक्षरगाथा माझ्या माहितीतली एकमेव!
पुस्तकाच्या पहिल्याच पानावर गळ्यात पाटी अडकवून रस्त्यावर सँडविचेस विकणाऱ्या सिरिकूट हायकून याचं छायाचित्र आहे. एकेकाळी शेअर दलाल म्हणून अब्जाधीश असणारा हा माणूस दक्षिण-पूर्व आशियात आलेल्या मंदीच्या लाटेने अक्षरशः रस्त्यावरआलेला, मात्र हिंमत न हारता धीरानं त्यानं शून्यातून आयुष्याची फेरउभारणी केलेली! 'जोवर मी चोरी करत नाही वा कुणालाफसवत नाही तोवर मला कुठल्याही व्यवसायाची लाज नाही' ही मुजोर निष्ठा हे त्याचं एकमेव भांडवल !
आर्थिक मंदीत सिरिकूटसारखे कितीतरी लोक मलेशिया आणि सिंगापूरमध्ये भुईसपाट झालेत. कोसळलेली असली अर्थव्यवस्था उभी करायची म्हणजे तिला मानवी टेकू द्यावे लागतात, आणि त्या साठी प्रथम माणसं उभी करावी लागतात. ती उभी करायला प्रेरणा देणं हाच या पुस्तकाचा हेतू आहे. म्हणूनच लेखकानं आपलं पुस्तक त्यांना अर्पण केलं, ज्यांना अपार प्रयत्न करूनही अपयश आलं, वा जे प्रचंड उंची गाठूनही नंतर कोसळले. अपयशावर मात करण्याची प्रेरणा देणाऱ्या या आधुनिक गीतेला तिकडच्या राजकीयनेत्यांनी उचलून धरलं. उदाहरण म्हणून तिथले उद्द्योग मंत्री मुस्ताफा महंमद म्हणतात " चुका होतील या धास्तीनं प्रयत्नच सोडूनदेणारे असंख्य केवळ त्यामुळेच व्हावे तसे होऊ शकले नाहीत, म्हणून प्रथम त्यांची अपयशाची धास्तीच घालवायला हवी!"
'यश अनुभवानं येतं, पण तो अनुभव मात्र बराचसा अपयशातनं येतो' या काहीशा विनोदी वाटणाऱ्या वचनाआड किती गंभीर अर्थदडलेला आहे हे मला प्रथमच 'डेअर टु फेलनं' जाणून दिलं. अपयशाकडे बघण्याचा एक जरासा वेगळा दृष्टिकोन जगण्याचा सारा संदर्भ आणि अर्थच बदलून टाकू शकतो हा साक्षात्कार त्यात आहे. यश ही कुठल्याही अखंड प्रयत्नांची सांगता असते. त्या साठी सातत्यानं प्रयत्न करावे लागावेत यातच अपयश गृहीत आहे, म्हणून मान खाली घालावी लागावी असं त्यात काहीही नसतं. बसुनबहुतेकांकडे ओळखण्याची मानसिकता नसल्यानं ते यशापलीकडे बघतात पण अलीकडे मात्र नाही. म्हणूनच अमेरिका शोधणारायशस्वी माणूस म्हणून सर्वांनी कोलंबसाची ओळख ठेवली, पण तत्पूर्वी त्याच शोधात किती तरी कोलंबस अपेशी ठरले आणि दगावलेही याची कुणी दखल घेतली नाही. या सगळ्यांचा कोलंबसाच्या यशात वाटा आहे, कारण त्यांनीच त्याला प्रेरणा आणि उत्तेजन देणारी धाडसी दर्यावर्दीपणाची परंपरा अपयशातून टिकून ठेवली म्हणूनच समुद्रसफारीला निघालेला आपला मुलगा पुनःकदाचित दिसणार नाही ही आशंका असूनही कुणी अमेरिकन आई मुलाला आडवी झाली नाही!
सगळं विज्ञान आपल्याकडे पाश्च्यात्यांकडून यावं, सगळे शोधही त्यांनीच लावावे हा केवळ योगायोग मानता येत नाही. ती 'कौम' सर्वार्थानं वरचढ आहे असंही नाही.
जिथं प्रयत्न हाच कौतुकाचा विषय होतो तिथे अपयशाची धास्ती नसते. उलट ते पचवण्याची हिम्मत येते. विज्ञानाचा जन्म युरोपमध्ये व्हायला हीच धारणा कारणीभूत आहे. विज्ञान ही यशोगाथा नसून तो प्रयत्नांचा इतिहासअसतो म्हणूनच त्यात यशासोबत अपयशाचीही सन्मानानं नोंद होते. एकदा हे मानलं की ती एकूण जीवननिष्ठाच बनते.
'डेयर तो फेल' या पुस्तकाचं मलेशियात अभूतपूर्व स्वागत झालं आणि सॅंडविचेस विकणाऱ्या सिरीकुटच्या एखाद्या हिरोप्रमाणेटी.व्ही. वर शेकडोंनी मुलाखती प्रसिद्ध होऊन त्यातून हजारोंना प्रयत्नांची नवी दिशा गवसली. मला तर वाटतं की जागतिक चढाओढीनं धास्तावलेल्या आपल्या भारतीय समाजाला असल्याच मानसिकतेची गरज असल्यानं या पुस्तकाचं सर्व भारतीय भाषांतून भाषांतर व्हावं. म्हणजे सर्वसामान्यांना आपण कुठे कमी पडतोय हे समजेल तरी ! सुरक्षिततेच्या विकृतश्या अवास्तवओढीपायी आज आपण कुणाला आत येऊ द्यायचं नाही आणि आपणही बाहे पडायचं नाही अशा एका बंदिस्त तुरुंगात स्वेच्छेनं अडकलो आहोत. ज्या समाजात या अंतर्बाह्य परिपूर्ण सुरक्षितता हाच खऱ्या यशाचा निकष बनतो त्या समाजातून धाडस हद्दपार होतं. त्या समाजातल्या आया दर्यावर्दी सफरीवर जाणाऱ्या मुलाला आशीर्वाद निरोप देत नाहीत. तर 'पाण्याजवळ जाऊ नको, हकनाकमरशील' असा दम भरून घरीच बसवतात!
तात्पर्य :
आपल्याकडे कुणी धाडसानं काही वेगळं करायला गेला तर त्याला उत्तेजन तर मिळतच नाही उलट त्याची कुचेष्टा वअवहेलना होते!
या न्यायानं एखादा वायू दलात गेला तर त्याला मुलगी द्यायला वधूपिता सहजासहजी तयार होत नाही. कारण काय तर म्हणे नोकरी जीवाच्या जोखमीची! त्याच्या पेक्षा दुय्यम का असेना कायम सरकारी नोकरी असणारा लग्नाच्या बाजारात भावखाऊन जातो! परिणाम हा की असल्या विकृत धरणांमुळे तरुण पिढी साहसांपासून दुरावते. आज अपरिहार्य झालेल्या चढाओढीतटिकायचं असेल आक्रमक चढाईपेक्षा बचावात्मक लढाईतच जीवाला अधिक धोका असतो हेच नेमकं 'डेअर टू फेल'नं हेरलं.
राजकारण आणि समाजकारणात वरील 'डेअर टू फेल' अध्यात्म स्वीकारून आशियातले थायलंड, मलेशिया,व्हिएतनाम,फिलिपाइन्स आदि सगळेच देश पुढारलेत, वधारलेत, आणि चीन तर अमेरिकेची बरोबरी करू बघतोय, मग आपण भारतीय रखडत मागं का? हा प्रश्न उभा होतो. या संदर्भात अन्य देशांनी 'समस्येला आव्हान म्हणून स्वीकारल्यास ती संधी बनते' हे विकासाचं सूत्रस्वीकारून त्याचा पुरेपूर लाभ उचलला. या तुलनेत
*भारतीय जनमानसात आली समस्या कौशल्यानं टाळणं हीच जगण्याची सर्वोत्तमकला जनमान्य झाली आहे.* तिचा भाग म्हणून टोप्या घालणं म्हणजे फसवेगिरी हा हुशारी म्हणून सद्गुण ठरलाय. यात नवसाच्या गोंडस नावाखाली देवाला आवळा देऊन त्याच्याकडून कोहळा उकळणे ही लाच जिथे भक्ती म्हणून सर्वमान्य झालीय तिथे शासनातआणि राजकारणात लाच-लुचपत होण्यात गैर ते काय? देवळाजवळील दुकानात पूजेच्या म्हणून किडक्या खारका आणि सुपाऱ्यास्वस्त म्हणून मिळणं हा केवळ योगायोग मानायचा का? सध्या देशात 'धरम का धंदा' तेजीत असणं हे मग कशाचं लक्षण आहे? भक्ती आणि इमान यांची जिथे खरेदी-विक्री होते तिथे कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, न्याय आणि नीतिमत्ता या बाबी कवडीमोल ठरणारनाही तर काय? सारी वृत्तपत्रं कोटी अब्जात झालेल्या घोटाळ्यांच्या आकड्यांनी बरबटलेली असणं हे अन्य काय दाखवतं?
*फुगवलेल्या आकडेवारीतून विकास झाल्याचं मानणं हा मंगळसुत्रचा आकार-वजनावर पातिव्रत्य मोजण्यासारखं आहे.* दुर्दैवानंजनतेनं पण हे विकृत वास्तव नाईलाजानं का होईना स्वीकारलं आहे. म्हणून जनतेनं सरकारला फसवणं आणि सरकारनं जनतेलाअसा 'मेरी गो राउंड' खेळ सध्या सर्वत्र सुरु आहे.
थोडक्यात यूरोप अमेरिकेत गेलेले भारतीय तिथे चमकतात हा भारतीय बुद्धिमान चढाओढीत सक्षम असल्याचा पुरावा आहे. देशांतर्गतहे होऊ नये याचा अर्थ प्रगतीचे अडथळे समुहाअंतर्गतच आहेत. आव्हानं टाळणारी पराभूत मानसिकता हाच यातला मुख्य अडसर. पारंपरिक अध्यात्माने मनी बाणलेली *"ठेविले अनंते तैसेचि राहावे देवावर भर ठेऊनिया' ही ती परम तृप्तीची भावना! नकारी मानसिकतेतून आलेला हा वर्तमानकालीन कर्तृत्वहीन न्यूनगंड घालवण्यासाठी मग शॉर्टकट म्हणून आपण भूतकाळा कडे वळतो आणिआणि त्याची वैभवशाली खोळ घालून स्वतःचीच पाठ थोपटतो!* नपुंसकानं आपला बाप मर्द होता म्हणून प्रौढी मिरवण्यासारखा हा करुण विनोद आहे!
मनोहर सप्रे
💐💐🙏🙏
0 टिप्पण्या