माती सांगे कुंभाराला ... Mati Sange Kumbharala Marathi Audiostory

 .... व्यवसाय जगत.....।

.......... माती सांगे कुंभाराला........................

.................................... दत्तात्रय पांडुरंग मानुगडे..।

..... मंडळी पूर्वीपासून व्यवसाय किंवा धंदा ज्या माणसाला जो व्यवसाय किंवा धंदा येतो त्याप्रमाणे व्यवसाय जगात अजूनही तरलेली आहे. आवडीनुसार ही मंडळी व्यवसाय जगत मध्ये आढळून येते शिवाय यांच्या आजोबा-पणजोबा पासून ही मंडळी वीतभर पोटासाठी व्यवसाय करीत आहे असे चित्र दिसून येते. व्यवसायावरून या मंडळींना संबोधले जाते आणि त्यांची ओळख या जनतेशी होते एवढे मात्र निश्चित. या वितभर पोटासाठी चाललेली ही धडपड दिसून येते पण ही माणसं प्रामाणिक असतात त्यांचे अंतकरण नारळातील पाण्यासारखं निर्मळ असत व्यवसाय करणारी माणसं यांचे संबंध गिराई काशी असतात. ग्राहकांना देव माणू न स्वतःचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. दिवसभर रस्त्याच्या कडेला किंवा बाजाराच्या ठिकाणी त्यांची दुकाने दिसून येतात जसा माणूस पैसा वरती प्रेम करतो त्याप्रमाणे माणसावर प्रेम करण्याची कला या माणसाजवळ असते म्हणूनच या मंडळी चा व्यवसाय अजून पर्यंत चालू आहे हे नाकारता येत नाही..।

.... कुंभार समाजातील माणसांना मा ती प्रसन्न असते माती पासून चिखल तयार करणे आणि चिखल पायाने तुडवून त्या चिखला चा एकजीव करून चुली मडकी रांजण. सणाच्या वेळी नागोबा गणपती बैल अशा वस्तू तयार करून बाजारात विकतात त्यापासून त्यांना याकामी पैसे चांगले मिळतात. परवा मला महादेव नारायण कुंभार कारागीर चिखलाची बैल करून विकत असलेला दिसला त्यांचा हा व्यवसाय वडीला पासून चालू आहे असे त्यांच्या तोंडातून ऐकावयास मिळाले. गेली पन्नास वर्ष हा त्यांचा व्यवसाय चालू आहे या व्यवसायावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. परवा त्यांना मी सहजच म्हणालो कसा आहे तुमचा व्यवसाय ते म्हणाले हल्ली बाजारामध्ये प्लास्टिकच्या वस्तू आल्यामुळे या व्यवसायाकडे काही माणसे कमी प्रमाणात बघतात. शिवाय प्लास्टिकच्या वस्तू पाण्यामध्ये लवकर विरघळत नाहीत त्यामुळे प्रदूषण निर्माण होते माती सारख्या वस्तू पाण्यामध्ये लवकर विरघळतात पण प्लास्टिकच्या वस्तू पाण्यावर तरंगतात हीच मोठी खंत आहे. मी माझ्या वडिलान पासून हा कुंभाराचा व्यवसाय करीत आहे याची जाण मला पूर्णपणे आहेत त्यामुळे माझा हा व्यवसाय बरा चालतो. आम्ही कुंभार लोक माती तुडवून करतो पण आम्हाला माती प्रसन्न असल्यामुळे मी आमच्याशी बोलते आणि म्हणते माती सांगे कुंभाराला. पाय मज तुडवी शी तुझाच वेड्या शेवट आहे माझ्या पायाशी. ते पुढे म्हणाले माणूस आयुष्यभर कष्ट करून बायकामुलांना सांभाळून शरीर झिजून जाते एकदा शरीर झिजले की ते जाळल्यानंतर त्याची माती होते शेवटी मातीचा देह मातीत जाणार सर्वांचा शेवट होतो. म्हणून या मानवाने जिवंत आहे तोपर्यंत सर्वांना चांगले बोलावे आई-वडिलांची सेवा करावी कोणाची निंदा करू नये स्वतःची नजर चांगली ठेवावी यातच माणसाचा भोलेपण आहे. आतापर्यंत या जगामध्ये कोणी काही ही घेऊन गेला नाही फक्त त्याचं नाव घेतले जात बाकीचे त्या माणसाची निशाणी या जगामध्ये राहत नाही. हे कुंभार मामा माझ्याशी मनसोक्तपणे बोलत होते यावरून मला एक समजले ही व्यक्ती साधी नाही ज्ञानी आहे व्यवसाय करत करत या व्यक्तीने माणसे जोडली आहे. ही कला त्यांच्या अंगी मला दिसून आली. व्यवसाय करण्याची पद्धत प्रत्येक माणसाजवळ आहे पण तो व्यवसाय प्रामाणिकपणे केला पाहिजे यातच आमच्यासारख्यांच बर आहे. बैल पोळ्यापासून गवर गणपती पर्यंत आमचा धंदा चांगला चालतो शिवाय थोडक्या भांडवलामध्ये मातीचा व्यवसाय चालतो. परंतु बैलाला लावायचे रंगाचे दर भडकत आहेत पण वाडवडिलांपासून चालत आलेला व्यवसाय बंद करून चालत नाही कारण शेवटी हे पोट आहे. या वीतभर पोटासाठी व्यवसाय करणे भाग आहे हे कुंभार मामा माझ्याशी मनसोक्त बोलत होते हे ऐकून मला फार बरे वाटले आणि मी त्यांच्या जीवनाचा विचार करू लागलो वीतभर पोटासाठी संसाराला झगडणारी माणसं सुख आणि दुःख झेलत जीवनाची वाटचाल करीत आहे हे विशेष आहे. धन्यवाद मंडळी...।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या