अतुलनीय ह्युमन कम्प्युटर ...(शकुंतला देवी) incredible human computer | audiobiography mp3 Audiobook

 







www.FMmarathi.in




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


"अतुलनीय ह्युमन कम्प्युटर"

       बहुतेक सगळ्या व्यक्तींच्या आवडीनिवडी, आचारविचार, मतं ही वयापरत्वे म्हणा,वा परिस्थितीनुरुप म्हणा किंवा स्वतःच्या अनुभवां मुळे म्हणा हे बदलतातच.नुसतेच बदलतात असे नव्हे तर कधीकधी अमुलाग्र फरक पडतो.

         मला शाळेत साधारणपणे सातवीपर्यंत गणित ह्या विषयाची तशी नावडच.खरतरं माझे आजोबा हे हाडाचे गणिताचे शिक्षक,गणितात प्रचंड हुशार. बरेचवेळा अशी विषयामध्ये नावड उत्पन्न होणे,त्या विषयात गोडी वा रस न वाटणे ह्यासाठी खूपसारी निरनिराळी कारणं पण असतात म्हणा. त्यापैकी एक कारण शाळेत तो विषय शिकविणा-या शिक्षकांना पण स्वतः घ्याव्या लागणा-या मेहनतीविषयी अनास्था असणं हे होय. परंतु जसं हायस्कूल ला गेले तसं आजोबांनी सूत्र हातात घेतली,ते स्वतः मला शिकवायला लागले, जयंत रानडे सरांनी आणि अचेलीया सरांनी गणित ह्या विषयातील भिती संपूर्णपणे घालवून हा विषय आवडीचाच बनवून टाकला.गणित ह्या विषयाने मनाचा एक कोपराच व्यापून टाकला जणू आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणित, विज्ञान आणि इंग्रजी ह्या विषयाचे जवळपास दहा बारा वर्षे धो धो चालणारा स्वतःचा कोचिंग क्लास चालवून कित्येक विद्यार्थ्यांच्या मनातील गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयातील भिती,नावड,अनास्था मी पार पळवूनच लावली बघा.





       मला जरी लहानपणी गणित हा विषय आवडतं नसला तरी हा विषयं आवडणा-या विद्यार्थ्यांची संख्या पण काही कमी नव्हती.ह्या वरुन आठवले आज 21 एप्रिल."ह्युमन काँप्युटर"अशी ओळख असणाऱ्या गणितज्ञ विदुषी शकुंतलादेवी ह्यांचा स्मृतीदिन.

        नोव्हेंबर 1929 मध्ये सर्कशीत काम करणा-या एका सामान्य कन्नड ब्राम्हणाच्या पोटी ह्यांचा जन्म झाला. आपले आईवडील हेच आपले पहिले गुरु असतात हे सार्थ ठरवितं देवींच्या वडीलांना त्या तीन वर्षाच्या असतांनाच ह्यांच्या अलौकिक गणिती सामर्थ्याची कल्पना आली.वयाच्या 6 व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.शकुंतला देवी 1944 मध्ये लंडनला गेल्या .लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगालाच जणू बुचकळ्यात टाकले, चक्रावून सोडले.1976 

 साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी कम्प्युटर पेक्षाही अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली.इ.स. 1977 मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद काॅम्प्यूटर 'युनिव्हॅक'शी झाला. तेथे देवींनी एका 201 अंकी संख्येचे 23 वे मूळ 50 सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला काॅम्प्यूटरला 62 सेकंद लागले.18 जून 1980 मध्ये त्यांना 7686369774870 आणि 2465099745779 ह्या दोन संख्या गुणण्या साठी देण्यात आल्या .हे आकडे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडलेले होते .शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ 28 सेकंदामध्ये ह्या गुणाकाराचे उत्तर 18947668177995426462773730 अचूकपणे दिले. 13 आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त 28 सेकंदात पूर्ण केला. त्यांच्या ह्याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विराजमान झाले.शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अदभुत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्याची दाखल घ्यावी लागली . गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती.

भारतात परतल्यावर 1988 मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलीिोर्निया विद्यापीठा मधील मानसशास्त्र विभागाचे विशेष आमंत्रण आले. या विभागातील प्रा.आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रा.आर्थर जेनसन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले.कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येच घनमूळ काढणे किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी की शकुंतला देवी यांचे उत्तर हजर असायचे.

   2013 सालच्या एप्रिल महिन्यात,वयाच्या 83 व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी ह्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध  ह्युमन कॉम्प्युटर काळाच्या पडद्याआड झाला, पण स्वतःची अतुलनीय कामगिरी कधीच कुठल्याच मेमरीतून डिलीट होणार नाही अशी अफलातून कामगिरी करुनच. पुढे विद्याबालन ह्या अभिनेत्री ने त्यांची भुमिका निभवून त्यांच्या वर निघालेल्या चित्रपटात काम केले. त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.


                      सौ.कल्याणी केळकर बापट

                        9604947256

                        बडनेरा, अमरावती

                          21/04/2022




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या