तु जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा...

 🪷 तु जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा...!!


हिंदी चित्रपट सृष्टीत असंख्य गाणी तयार झाली अगदी मोजता न येणारी परंतु काही गाणी विरुंगुळा देतात तर काही आनंद , काही रडवतात तर काही हसवतात पण एखादं च

गाणं अस असतं की त्याला किती ही वेळा ऐकले तरी त्या गीता तुन प्रत्येक वेळी एक वेगळी च अनुभूती येते , अनुभव येतो 


              तुम्ही म्हणाल हेच गीत मी का निवडले ?  लिहिण्या साठी ...  . तसे तर हे गाणं एक प्रियसी प्रियकराला उद्देशुन म्हणते हा ढोबळ मानस पण हे गाणं ऐकताना

मला विविध व्यक्तीरूपे दिसली... मी ती अनुभवली ..तुम्ही सुद्धा रात्री 11 किंवा 12 च्या सुमारास हेडफोन वर घरा च्या टेरिस किंवा शुभ्र चांदण्या मध्ये रात्री ऐका व अनुभवा गीतकार राजा म्हेनदी अली खान यांनी  लिहिलेली व मदन मोहन यांनी संगीत दिलेली

ही अजरामर रचना .....


            " आई " या नावा ची अशी प्रेमळ भाकरी आहे की प्रत्येक जण ठेश्या सारख्या बापा सोबत खात असतो च त्या ठेश्या शिवाय भाकरी .....नक्की च अधुरी  ..पण " आई " नावा ची ती.. स्वतः चटके सहन करून आपले पोट भरणारी व आपण तृप्त होऊन ढेकर दिला तर च  तीचे पोट भरते..अशी ती फक्त आई च....

अगदी दाडी करतांना जरी रक्त आलं तरी ती 

कासावीस होते ..ती ते पाहु शकत नाही ..

आपण उदास असलो किंवा टेन्शन मध्ये ती चटकन ओळखते ..आपला मुड जसा असेल तसाच तीचा मुड असतो आपण हसलो तर ती हसणार अन रडलो तर तिच्या डोळ्यात पाणी येणार ........ती एक आधार असते 

आई नावा च छत्र जो पर्यंत डोक्यावर असते 

तो पर्यंत तिची उपस्थिती जाणवत नाही पण हे

छत्र जेव्हा जाते ना तेव्हा भूमी सुद्धा कमी पडते पळण्या साठी  पण हीच आई गेल्या नंतर सुद्धा म्हणते ....

   

















 तु अगर उदास होगा 

तो उदास होंगी मैं भी

नज़र आऊ या ना आऊ

तेरे पास हुंगी मैं ही

तु कही भी जा रहेंगे गा

मेरा साया साथ होगा  !!


      घरात लहान असणं हे नेहमी एक शाप असल्या सारखेच आहे. त्यातल्या त्यात एकमेव बहीण भाऊ व मोठी बहीण असल्या वर तर विचारूच नका .आई बाबा चा जेव्हढा धाक त्याहुन अधिक ताई चा धाक असतो .

ती मोठा  " ताईपणा " ती मिरवत असते.

अगदी मी कोणता शर्ट घालावा कसा भांग पाडावा पावडर लावावी किंवा नको हे ती ठरवीत असते ..  मी लहान असल्या मुळे किराणा सामान आणतांना जेव्हढे पैसे उरायचे ते मी साठवुन ठेवायचो राखी पौर्णिमेला तीला काही गिफ्ट घेण्या साठी .मी पूर्ण पैसे खर्च करून तिला काही तरी गिफ्ट आणायचो 

पण तिचे कधी समाधान झाले च नाही दर वेळी ती भांडायची ओवाळणी साठी .. ती जो पर्यंत घरात होती तो पर्यंत घर म्हणजे आमच्या भांडणा मुळे भरलेले होतं ...मला आई पेक्षा कण भर जास्त माझी ताई ओळखत होती मी लहान असल्याने मला थोडं उशिरा कळले तिचे प्रेम ...ती सासरी जातांना माझ्या गाला वर हात फिरवून एव्हढेच म्हणाली....

 

 मैं अगर बिछड़ भी जाऊ

कभी मेरा गम न करना 

मेरा प्यार याद करके 

कभी आंख नम न करना 

तु जो मुडके देख लेगा 

मेरा साया साथ होगा ...!


दोन भिन्न लिंगी एकत्र येतात व त्यातून जन्म घेतो एक जीव ..तो जन्मता च कोणा चा मुलगा होतो किंवा मुलगी ..कोणाचा भाचा तर पुतण्या ..कोणा च नातु तर पणतू .. जन्म झाल्या सोबत च तो जीव शाब्दिक नाती घेऊन जन्म घेतो पण तो जेव्हा चालतो बोलतो ...तेव्हा एक नाते तयार करतो  अगदी रक्ता च्या नात्या पलीकडले ती असते 


" मैत्री "


खरं तर आई नंतर सर्व लाड पुरवले जातात या मैत्रीत ...हक्काने रुसण्या ची जागा मैत्री ..भांडायची जागा म्हणजे मैत्री ..बर असे मित्र  मैत्रीणी कायम सोबत राहतीलच असे नाही . पण ते मित्र मैत्रिणी कायम आठवणीत

राहतात ...प्रेरणा देतात ते सोबत असतात तेव्हा त्यांचे महत्व कळतं नाही..पण दुरावतात तेव्हा जगण्यात एक पोकळी निर्माण होते . 

सहज बोलता बोलता मित्र म्हणतो 

" तेरे लिये जान भी  हाजीर है यार ...!! "

यात तो किंवा ती आपल्या साठी काही जीव देणार नसते पण एक आधार असतो एक प्रेरणा , प्रेम असते .आपल्या साठी कोणी तरी आहे किंवा आपण सुद्धा स्पेशल आहोत ही भावना तयार करते "मैत्री" 

    हेच कॉलेज च्या कट्ट्या वरील मित्र  जे कधीच डोळ्यात पाणी येऊ देत नसत खिसा रिकामा असतांना मनाने श्रीमंत होती तेच मित्र दुरावतात तेव्हा ..

छळतात मन व्यकुळ करतात पण त्यांना आठवुन सुद्धा ... ते कायम सोबत असतात व म्हणतात  ....









   

 कभी मुझको याद करके

जो बहेंगे तेरे आंसु

तो वही पे रोकलेंगे 

उन्हें आके मेरे आंसु

तु जिधर का रुख करेंगा

मेरा साया साथ होगा .... !


                 तदेव लग्नं सुदिनं तदेव

                 ताराबलं चंद्रबलं तदेव |

                 विद्याबलं दैवबलं तदेव

                 लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि || 

                 मंगल ..शुभमंगल सावधान ..!!


इथून सुरू झालेला असतो दोघांचा प्रवास ...सुरवाती चे गोड स्वप्नवत दिवस कधी लवकर धावून जातात कळतं ही नाही दोघेही 

" आपण " कायम असेच राहुत या भ्रमात असतात . गुलाबी मिठीतले , स्पर्श सुखा चे हे मंतरलेले दिवस , सतत सोबत असावे असे क्षण कधी निघून जातात कळतं ही नाही .

 नकळत एक एक जवाबदारी , दुनियादारी मध्ये  " तो " अडकत जातो ..या सर्वा मध्ये चालत असतांना मात्र " तीला " कायम गृहीत धरत असतो खरं तर तीची पण काही तक्रार नसते असे नाही पण " ती " सुद्धा स्वतः साठी अशी उरलेली च नसते 

                       प्रत्येक यशा ची शिखरे " तो "

सर करत असतो.. " ती " कौतुक करत असते. अपयशाने खचुन गेला तर धाप देत असते

तीचे स्वतः चे असे अस्तिवात च उरलेले नसते

इतकी " ती " त्याच्या मध्ये मिसळुन गेलेली असते तिच्या स्वतःची अशी सुख किंवा दुःख उरलेली च नसतात " तो " म्हणजेच मी यातली " मी " सुद्धा ती वयक्तिक स्वतः आरश्या समोर  तिला दिसत नाही इतकी ती त्याच्यात मिसळुन गेलेली असते अगदी जन्मो जन्मा साठी ...


मेरा गम रहा है शामिल 

तेरे दुःख में तेरे गम मैं

मेरे प्यार ने दिया है 

तेरा साथ हर जन्म मैं 

तु कोई जनमः भी लेगा 

मेरा साया साथ होगा ..!! 


           " ती "  ची हीच भावनिक भावना असते .....  


    कुठल्यातरी मुलाखती मध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर ला विचारले होते ड्रेसिंग रूम मध्ये हेड फोन वर तु कुठले गाणे ऐकत असतो त्यानें सांगीतले   होते 

" तु जहाँ जहाँ चलेगा .... " 

 स्वर्गीय भारतरत्न गाण कोकिळा लता दीदी यांच्या कारकिर्दीत त्यांच्या ही फार जवळ चे असणारे हे गीत ...  आपण तर फार लहान आहोत 😊  


अनंत सुतनासे , बीड 

निरकरा चे शब्द 

मो 9850164958

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या