जरुर वाचा
संकटे ही क्षणभंगुर असतात त्यांचा सामना करा
autoplay="autoplay"
src="https://drive.google.com/uc?export=download&id=11lnr-9HlA1sFEUxQ8YCXyWXVPI5AUeBy">Your browser does not support the
audio
element.crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे* आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही .!
मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत .
आपण गेल्यानंतर पुढे काय होणार* याची मुळीच चिंता करु नका . कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?
जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल ...!
तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका . त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या . स्वतःचे भविष्य घडवू द्या . त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका .
मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या , त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर , स्वतःच्या आवडी निवडीवर करा .
जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही , हे देखील लक्षात ठेवा .
तुम्ही कदाचित*l चाळीशीत , पन्नांशीत किंवा साठीत असाल , आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत . पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही .
या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात . पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल . तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
एक दिवस आनंदा शिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात , हे लक्षात असू द्या.
आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर , उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल , आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल , तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत .
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा . त्याची जपणूक करा आणि हो, तुमच्या मित्रांना/मैत्रीणींना कधीही विसरु नका , त्यांना जपा . हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
मित्र-मैत्रीण नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो .... आयुष्य खुप कमी आहे* , ते आनंदाने जगा ...
प्रेम मधुर आहे , त्याची चव चाखा..!
*क्रोध घातक आहे* , त्याला गाडुन टाका..!
*संकटे ही क्षणभंगुर आहेत* , त्यांचा सामना करा..!
डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण *माथ्या आड गेलेले* "जिवलग" परत कधीच दिसत नाही ....
0 टिप्पण्या